Home ताज्या बातम्या देहुरोड मध्ये अंतर्गत राजकारणाला सुरुवात कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्षांन वर भडकले राष्र्टवादीचे शहरध्यक्ष

देहुरोड मध्ये अंतर्गत राजकारणाला सुरुवात कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्षांन वर भडकले राष्र्टवादीचे शहरध्यक्ष

41
0

देहुरोड,दि११मे२०२०(प्रजेचा विकास न्युज प्रतिनीधी):-देहुरोड मध्ये अंतर्गत राजकारणाला सुरुवात कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्षांन वर भडकले राष्र्टवादीचे शहरध्यक्ष! सुनिल शेळकेन विरोधात वक्तव्य करत देहुरोड कॅन्टोन्मेट बोर्ड उपाध्यक्ष रघुवीर शेलार काय बोले व त्यास राष्र्टवादी काॅग्रेस देहुरोड शहर अध्यक्ष दाभोळे यांनी काय दिले प्रतिउत्तर (पहा व्हिडीओ)

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष रघुवीर शेलार काय बोलले आमदार सुनील शेळकेन बद्दल.

मावळ तालुक्याचे विद्यमान आमदार यांना देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष रघुवीर शेलार यांनी चमकू म्हणून संबोधले आज दि.10 मे रोजी देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अचानक घेतलेल्या पत्रकार परिषदेत शेलार बोलत होते मावळ तालुक्याचे चमकू आमदार किंवा त्यांचे कार्यकर्ते यांनी एक पेड न्युज बनवून सोडली आहे खोटी बातमी पेड वर्कस व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पसरवत आहेत विद्यमान आमदारांनी किंवा आत्ताच्या राज्य सरकारने देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाला कोणतीही मोठी किंवा भरीव मदत केलेली नाही जे साहित्य दिले आहे ते दोन ते तीन लाखाचे आहे त्याची बातमी 50 लाखाची केली आहे कोविड-19 कोणाचा प्रादुर्भाव चालू असताना देश शहर अडचणीत रस्ता असताना नागरिक उपाशी मरत आहेत त्यांच्या भावनांशी खेळत अहात, कुठली मदत दिली तर त्याच्यामध्ये आपला फोटो चिटकवून ते मदत देणे शासकीय मदत आली तर त्याच्यावरही फोटो चिटकवून देणे आमदारांनी शासकीय निधीतून मदत केलेली आहे त्यावर राजकारण करत असतील पण आमदार असेल किंवा त्यांचे कार्यकर्ते असतील त्यांना आमची विनंती आहे आम्ही सात वर्षे देहूरोड कॅन्टोन्मेंट सभागृहात मध्ये काम करत असताना आदरणीय मा.राज्‍यमंत्री बाळासाहेब भेगडे यांच्या माध्यमातून काम करत अहोत आणि कोणताही भेदाभेद केला नाही अन्नदानाचे किट बनवले तरी काँग्रेसच्या नगरसेवकांना आम्ही जास्त किट देऊ केले. कोणताही राजकारण याठिकाणी करत नाही आहोत आजही आमच्या सोबत काँग्रेसचे दोन नगरसेवक सभागृहांमध्ये काम करत आहेत आम्ही कधीही भेदाभेद करत नाही. जिथे गरज आहे तिथे आम्ही मदत करतो आमदारांना विनंती आहे तुम्ही देखील देहूरोड शहरा वरती विशेष लक्ष द्या,कोणत्याही चमकूगिरी साठी प्रसिद्धीसाठी काही करत असाल तर जनतेने तुम्हाला निवडुन दिलय तुम्ही जनतेचा आपमान करताय,तुम्ही व तुमचे कार्यकर्ते किंवा पेड वर्कर हे करत असतील त्यांना त्वरीत
थांंबवा,खोट्या बातमी पसरु नका असे ही शेलार म्हणाले

मदार शेळकेचे सहकारी अॅड.कृष्णा दाभोळे(अध्यक्ष-देहुरोड शहर राष्र्टवादी काँग्रेस)यांनी काय दिले प्रतीउत्तर

देहुरोड शहर राष्र्टवादी काँग्रेस अध्यक्ष या नात्याने बोलत आहे आज जी देहुरोड मध्ये देहुरोड कॅन्टोन्मेट बोर्डचे उपाध्यक्ष यांनी चमको आमदार म्हणून संबोधल्या बद्दलची चर्चा चालू आहे त्याबद्दल शहरध्यक्ष अॅड.दाभोळे यांनी राग व्यक्त करत बोलले मावळच्या कार्यसम्राट आमदार सुनील (आण्णा) शेळके हे लोकांमध्ये अनेक दिवसापासून काम करतात ते लोकांमध्ये काम करतात त्यामुळे ते सर्व लोकांना ज्ञात असून ते जनते मध्ये सुद्धा दिसत आहे आणि बिनबुडाचे आरोप करु नका. कोविड-19 अशा प्रसंगी आपण राजकारण करू नये संपूर्ण माहिती घ्यावी त्याचा पूर्ण अभ्यास करावा आणि आपण त्याबाबत स्टेटमेंट करावे आमदार हे कार्यरत असून ते लोकांमध्ये आहे आणि त्याबद्दल कुणालाही सांगायची गरज नाही तसेच अशा वेळी राजकारण करणे उपाध्यक्ष, प्रथम नागरिकाला शोभत नाही आणि राहिला चमकू शब्द आमदार लोकांमध्ये चमकणारच कारण त्यांच्या कार्यातून चमकतात आणि चमकणारा हिरा असतो तो कोळसा नसतो त्यामुळे त्याबद्दल कुणाचा पोटामध्ये पोटसळु यायची गरज नाही दुसरा प्रश्न 50 लाखाचा निधीचा खर म्हटले तर जे साहित्य दिलं ते स्थानिक आमदार निधी मधुन पन्नास लाख रुपये पूर्ण मावळ तालुक्यात साठी निधी मंजूर झाला होता त्यापैकी काही देहुरोड ला साहित्य दिले, मी स्वतः बातमी प्रसिद्ध केली कोठेही त्याबाबतचा 50 लाखाचा निधी एकटा देहुरोड कॅन्टोन्मेट ला दिला आसा कुठेही उल्लेख नाही ज्यांना कुणाला वाचण्यात आलेला असेल त्यांनी वृत्तपत्र किवा जिथे कुठे वाचले ते परत नीट वाचावे आणि 50 लाखाचा निधी देहुरोड कॅन्टोन्मेटला दिला असा कुठेही उल्लेख नाही शहानिशा करावी आणि बेछुट आमदारावर आरोप करू नये तसेच राजकारण करण्याचा प्रश्न आमदार कोणत्याही प्रकारचे राजकारण करत नाही ते पण कोणत्याही प्रसिद्धीला हपापलेले नाहीये आणि गेल्या साडेचार वर्ष कॅन्टोन्मेंट बोर्डचा कारभार कसा चालला आहे हे सर्व लोकांना माहिती आहे,बोर्डाची आर्थिक परिस्थिती काय आहे हे लोकांना माहिती आहे आणि राजकारण काय झाले हे सर्व संपूर्ण लोकांना ज्ञात आहे आणि याचा विशेष फटका कोणाला बसला,आणि जास्त अनुभव कोणाला आहे,उपाध्यक्ष यानाही याबाबत माहिती आहे त्यांनी जास्त स्वताची काळजी घ्यावी असे मत शहरध्यक्ष यांनी व्यक्त केले.

व्हिडीओ पहा देहुरोड मध्ये अंतर्गत राजकारणाला सुरुवात कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्षांन वर भडकले राष्र्टवादीचे शहरध्यक्ष 

Previous article2500-3000 लोकांची जेवणाची सोय कम्युनिटी किचन मधुन करत अहोत-नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ
Next articleपुढच्या महिन्यात पेमेंट यायला लेट झाला तर आपला पेमेंट लेट होईल- रघुवीर शेलार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

nine + eleven =