Home ताज्या बातम्या 2500-3000 लोकांची जेवणाची सोय कम्युनिटी किचन मधुन करत अहोत-नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ

2500-3000 लोकांची जेवणाची सोय कम्युनिटी किचन मधुन करत अहोत-नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ

69
0

विकासनगर,दि.९ मे २०२०(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- कोरोना प्रादुर्भाव वाढल्याने अनेक लेबर कामगार ज्यांच्या हातावर पोट आहेत गाव राज्य जिल्हा हा सोडून आले परप्रांतीय मजूर यांचे होणारे हाल व त्यांना एक मदतीचा हात म्हणून नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ हे लॉक डाऊन सुरू झाल्यापासून अन्नधान्याचे किट वाटप करत आहेत पण लॉक डाऊन अजून वाढत चालल्याने लोकांची होणारी उपासमार पाहता चिंचवड विधानसभेचे कार्यक्षम आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी-चिंचवड महानगरपालिका अंतर्गत कार्यक्षम नगरसेवक बाळासाहेब ओहाळ यांच्या पुढाकाराने 28 एप्रिल पासून कम्युनिटी किचन विकास नगर मध्ये सुरू करण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अति. आयुक्त अजित पवार व सहाय्यक आयुक्त संदीप खोत यांनी प्रभाग क्रमांक 16 कम्यूनीटी किचनला भेट दिली. यावेळी यावेळी पक्ष नेते नगरसेवक नामदेव ढाके व बिभीषण चौधरी व प्रभाग क्रमांक 16 मध्ये या कम्युनिटी किचन सर्व देखभाल व कार्य पाहणारे कार्य करणारे प्रभाग क्रमांक 16 चे कार्यक्षम नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ,भाजप महिला नेत्या अल्काताई पांडे, तसेच त्यांचे सहकारी सुरेश नायर, संदीप कडलक,संभाजी भोसले, गजानन काळे राजू दळवी, अमोल नागरे,रोहित ओव्हाळ, विनायक दळवी, गजानन काळे, सुरेंद्र मांगे,मनोज थोरवे,पञकार के पी अॅडम,गणेश गायकवाड,विशाल जाधव,मंगेश,अमोल नांगरे,अंजया रामोशी आदी.कार्यकर्ते तसेच पञकार हे सर्व जन सोशल डिस्टन्स ठेवत उपस्थित होते या या किचन मधून दररोज दोन वेळचे जेवण दोन दोन ते तीन हजार लोकांना रोज दिले जाणार, त्यामुळे महापालिकेचं सहभाग असल्याने पालिकेचे सहाय्यक आयुक्त यांनी स्वतःहून आज भेट देत कार्याची दखल घेऊन कार्यक्षम नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांच्या कार्याचे कौतुक केले.तसेच (दि.७)गुरुवार बुद्ध पोर्णिमा आसल्याने सर्वाना जेवणा सोबत बुंदी (स्विट) देण्यात आले,या वेळी बाळासाहेब ओव्हाळ यांनी सर्वाना बुद्ध पोर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या,व सर्वानी असेच सहकार्य करा घरीच राहा,गर्दीचे ठिकाणे टाळा,हात स्वच्छ धुवा,मास्क वापरा सर्वानी काळजी घ्या.शासनाचे पुढचे आदेश येई पर्यंत पोलिस,डाॅक्टर,सफाई कर्मचारी,पञकार,अत्यावश्यक सेवा पुरवणारे या सर्वाचे मनोबल कमी होणार नाही याची काळजी घ्या कोरोनाला हारवुया लवकरच परस्थिती अटोक्यात येईल.तो पर्यंत सहकार्य करा.

Previous articleकार्यक्षम नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांच्या पुढाकाराने विकास नगर मध्ये कम्युनिटी किचन
Next articleदेहुरोड मध्ये अंतर्गत राजकारणाला सुरुवात कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्षांन वर भडकले राष्र्टवादीचे शहरध्यक्ष

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

1 × three =