Home ताज्या बातम्या कोरोना विरुद्धच्या लढ्यात काम करणारे सर्वाचे मनोधैर्य,आत्मबल वाढवण्यसाठी “सलाम तुमच्या सामाजिक कार्याला...

कोरोना विरुद्धच्या लढ्यात काम करणारे सर्वाचे मनोधैर्य,आत्मबल वाढवण्यसाठी “सलाम तुमच्या सामाजिक कार्याला हा उपक्रम” -आमदार सुनिल शेळके

132
0

तळेगाव,दि.२ मे २०२०(प्रजेचा विकास न्युज प्रतिनीधी):-कोरोना वाढता प्रादुर्भाव आणि त्या विरुद्धच्या लढ्यात जीवधोक्यात घालुन काम करणार्‍या माणसातल्या देवदूतांच्या कार्याची तुलना करता येत नाही,त्यांच्या कतृत्वाला नमन सेवाभावी वृत्तीने ते आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यांचे मनोधैर्य,आत्मबल वाढवण्याच्या हेतुने सलाम तुमच्या सामाजिक कार्याला हा उपक्रम राबविला जात आहे. लॉकडाऊन असल्याने अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करणारे नगरपरिषद, ग्रामपंचायत, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, पोलीस, मेडिकल दुकानदार, अंगणवाडी सेविका, सफाई कर्मचारी,अरोग्य विषयक उपक्रम राबविणारे काही मंडळे, संस्था, सामाजिक कार्यकर्ते, अन्नदान-करणारे तसेच अत्यावश्यक सेवा पुरविणारे सर्व आपल्या जनतेसाठी काम करत आहेत.सर्वांचे समाजाप्रती काम खरंच उल्लेखनीय आहे.मावळ तालुक्यातील काम करत असलेल्या सर्वांचा सन्मान केला.

अखंड महाराष्ट्राच्या ऐकतेसाठी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. राज्याच्या प्रगतीसाठी,सर्व घटकाचे महत्त्वाचे योगदान दिसते. सगळेजण एकत्र येऊन विकासासाठी, संकटांवर मात करण्याची यापुढे खरी गरज आहे. कामगार, कष्टकरी महाराष्र्टाचे पोशींदा शेतकरी व्यक्तींचा सन्मान देणे महत्त्वाचे ठरत आहे. संवेदनशीलता बाळगून त्यांचा सन्मान करत कार्यकर्तृत्वाला खरा सलाम आहे.महाराष्ट्र दिनानिमित्त संपुर्ण मावळ तालुक्यातील अशा व्यक्तींच्या कार्याचा सन्मान करत अहोत असे आमदार शेळके यांनी सांगितले.

Previous articleकोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देहुरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाची २४ तास हेल्पलाईन नंबर सुरु
Next articleकोरोना-देहुरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत,किराणा दुकाने, चिकन – मटण विक्री आठवड्यातुन सोमवार,मंगळवार व बुधवार स.०९ ते दु.१ वा.पर्यत राहणार चालु

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

18 − 6 =