Home ताज्या बातम्या मावळ-देहुरोड येथे 2कोरोना(कोवीड-१९) पाॅजीटिव्ह रुग्ण आढळले,३०एप्रिल ते ०३ मे पर्यंत देहुरोड राहणार...

मावळ-देहुरोड येथे 2कोरोना(कोवीड-१९) पाॅजीटिव्ह रुग्ण आढळले,३०एप्रिल ते ०३ मे पर्यंत देहुरोड राहणार संपूर्ण बंद

0

देहुरोड,दि.२९ एप्रिल २०२०(प्रजेचा विकास न्युज प्रतिनीधी):-कोरोना- देहरोड कॅन्टोन्मेंट हद्दीतील घरांचा सर्वे चालू असताना दिनांक २७ एप्रिल२०२० रोजी लक्ष्मीनगर, येरवडा, पुणे(हॉटस्पॉट झोन)च्या ठिकाणावरून स्वतःच्या वाहनाने शिवाजीनगर, देहूरोड येथे एका कुटुंबात काही व्यक्ती आल्याचे आढळून आले. सदर कुटूंबातील व्यक्तींना तत्काळ वाय.सी.एम. रुग्णालय या ठिकाणी तपासणीकरीता पाठविण्यात आले.आज बुधवार दिनांक २९ एप्रिल २०२० रोजी दैनंदिन माहिती घेतली असता सदर कुटूंबातील दोन मुलींचा कोविड-१९ चा रिपोर्ट हा पॉझिटिव आला व त्यानंतर तत्काळ कॅन्टोन्मेंट बोर्डाची वैधकीय टिम व पोलीस प्रशासन यांच्यामार्फत त्याठिकाणी सर्वे केला असता त्या ठिकाणा मधील मोठा धोका (High Risk) व कमी जोखीम (Low Risk) मधील व्यक्ती मार्गदर्शक सुचनानुसार ओळख(as per guidelines identify) करूनत्यांना क्वॉरंटाईन करण्यात आले. अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रामस्वरूप हरितवाल यांनी दिली.

तरी सर्वानी कोरोना विषयी आपल्या कुटूबांची काळजी घ्यावी व कोणीही घरातून बाहेर पडू नये व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन ही मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले.तसेच देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीमध्ये कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी गुरुवार दिनांक ३० एप्रिल २०२० ते रविवार दिनांक ०३ मे २०२० संपूर्ण बंद पाळण्याचे ठरविण्यात आले
आहे, सदर बंद कालावधीमध्ये फक्त औषधे दुकाने, दुध विक्री व हॉस्पीटल सेवा वगळता सर्व प्रकाराची दुकाने बंद राहतील अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी हरितवाल यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

2 × two =