देहुरोड,दि.२८ एप्रिल २०२०(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-चूक झाली तो गुन्हा झाला मान्य आहे आम्हाला,भावनेच्या भरात घडून गेलं-नगरसेवक गोपाळराव तंतरपाळे
–
नगरसेवक गोपाळराव तंतरपाळे(देहुरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड वार्ड क्र-४)
रविवारी (दि. 12 एप्रिल) शिवाजीनगर, देहूरोड येथे जी घटना घडली.बेकायदेशीर मृत देह जाळण्यात आला.त्यावर नगरसेवक गोपाळराव तंतरपाळे यांच्याशी भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधला असता यांच्याकडून माहिती मिळाली. की माझा खुलासा हा की चुक ती चुकच त्याला गुन्हाच म्हणतात मी माझ्या फोनवर ते करायला सांगितलं वॉचमनला तिथे गेल्यावर फोन लावून द्या त्यांना सांगा काॅस आॅफ डेथ सर्टिफिकेट मिळत नाही दवाखाने बंद आहेत रविवार आहे त्यात कोरोनाचे सावट त्यामुळे स्मशान दाखला मिळत नाही त्यामुळे विनंती केली असता वाॅचमन नाही म्हटला पण मी नगरसेवक गोपाळराव तंतरपाळे दादा बोलतो मदत करा सकाळी दाखला आणुन देतो त्यांनी मयत जाळून दिली आणि जी झाली ती चूक झाली तो गुन्हा झाला मान्य आहे,आम्हाला ,भावनेच्या भरात घडून गेलं पण चुक ती चुक झालेला प्रकार चुकीचा झाला इथून पुढे कोणीही कोणत्याही कार्यकर्त्याने अशी चुक करू नये,या प्रकरणामध्ये माझा नगरसेवक पद जाईल ते काढून टाकतील मला शो केस दिली आहे, देहूरोड पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहेत देहूरोड पोलिस स्टेशनचे क्राईम पी आय गोफणे सर यांच्याकडे तपास आहे,ते तपास करतील.कोणीही काॅस आॅफ डेथ असल्या शिवाय व स्मशान दाखला असल्या शिवाय मयत करु नये,आणि डेरींगही करु नये यातुन सर्वानीच धडा घ्यावा. क्राईम पी आय गोफणे सर यांच्याकडे तपास आहे,ते तपास करतील.चुकी च्या गोष्टींच सर्मथन गोपाळराव ततंरपाळे कधीच करणार नाही असे ही ते म्हणाले
श्रीजीत रमेशान
(नॅशनल आर टी आय कार्यकर्ता)
देहूरोड मध्ये काही दिवसापासून तुम्ही व्हिडिओ पहात आहात की बेकायदेशीररित्या एक महिला मयत देहुरोड स्मशानभूमीमध्ये जाळली गेली होती देहूरोड पोलीस स्टेशन मध्ये त्यावरती त्या लोकांवरती एक एफ.आय.आर दाखल आहे आता अशी बातमी येत आहे की देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड कडून देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड चे अध्यक्ष यांनी पंकज तंतरपाळे यांचे वडील नगरसेवक गोपाळराव तंतरपाळे यांना शो काॅस(कारणे दाखवा) नोटीस दिली आहे. बोर्ड नोटीसच्या उतरच्या प्रतीक्षेत आहे. येणाऱ्या दिवसात पाहायला मिळेल बोर्ड काय कारवाई करेल. आश्चर्याची गोष्ट हि आहे कि असे व्हिडीओ समोर आले आहे की जे आरोपी पंकज तंतरपाळे आहेत ते गाडी घेऊन फिरत आहेत त्यांच्यासमवेत गाडीत तीन जण आहेत.फेसबुकच्या माध्यमातून जनतेला लाईव्ह संदेश गाडीतून देत आहेत तोंडाला मास्क ही नाही.त्यांच्या विरोधात पण कारवाई झाली पाहिजे आम्ही मुख्यमंत्री कार्यालयाला तक्रार केली आहे मुख्यमंत्री कार्यालयाने पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांच्याकडे योग्य कारवाईसाठी ते पत्र पाठवले आहे त्यावरती ही गुन्हा दाखल होईल
नगरसेवक
रघुवीर शेलार
(उपाध्यक्ष-देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड)
देहूरोड स्मशानभूमीमध्ये विदाऊट स्मशानभूमी दाखला न घेता जो अंत्यविधी करण्यात आला आहे त्याबद्दल देहुरोड मध्ये बरीच चर्चा चालू आहे, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने ॲक्शन घेण्यात आलेली आहे देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर संजय खन्ना सर आमच्या कॅन्टोन्मेंट बोर्डाचे चे नगरसेवक ज्यांनी आपल्या पत्राचा वापर करून तो अंत्यविधी विदाऊट स्मशानभूमी दाखला पास् ने केला होता त्या नगरसेवकांना त्यांनी कारणे दाखवा नोटीस शो कॉस नोटीस दिलेला आहे त्या नोटीसचे उत्तर संबंधित मेंबर नगरसेवक देतील आणि त्यानंतर योग्य ती कारवाई बोर्डाच्या अध्यक्ष आणि कॅन्टोन्मेंट बोर्ड, संबंधीत विषयावरती करणार आहोत
देहुरोड मध्ये सासूच्या मृत्युनंतर डॉक्टरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र किंवा स्मशान दाखला न घेता सासूचा मृतदेहाचे केले होते दहन. याबाबत सुनेसह चार जणांनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (दि. 12 एप्रिल) शिवाजीनगर, देहूरोड येथे घडली.हि घटना समजताच श्रीजीत रमेशान (नॅशनल आर टी आय कार्यकर्ता) यांना माहिती कळताच त्यांनी सदर स्मशान भुमीत जाऊन माहिती घेऊन सर्व माहिती फोटो व व्हिडीओ बनवुन सोशल मिडियाच्या माध्यमातुन सदर घटना देहुरोड कॅन्टोन्मेट बोर्ड प्रशासन व पोलिस प्रशासनाच्या नजरे समोर आणुन दिली होती. देहुरोड कॅन्टोन्मेट प्रशासनाने तत्काळ चौकशी करुन अॅक्शन घेतली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार
१५ एप्रिल २०२० रोजी देहुरोड कॅन्टोमेंन्ट बोर्ड देहुरोड तर्फे महमदरफी अल्लाउददीन सय्यद (वय-५४वर्ष)-आरोग्य
निरीक्षक देहुरोड कॅन्टोमेंट बोर्डयांनी फिर्याद दिली असुन.अरोपी मयताची सुन१)श्रीमती शोभा शंकर शिंदे (वय वर्षे ४०)
२).पंकज गोपाळराव तंतरपाळे,(रा.देहुरोड)३).रेव सोलोमोनराज भंडारे(रा.देहुरोड)४).राजु मारीमुत्तु (रा देहरोड) ५).गोविंद मंचल(स्मशानभुमी तील वॉचमन ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे,
अरोपी शोभा शिंदे यांची सासु गंगुबाई बबन शिंदे (वय 82) यांचा शिवाजीनगर, देहूरोड येथे राहत्या घरी आजारपणा मुळे आणि वृद्धापकाळाने मृत्यु झाला.त्यानंतर त्यांचा अंत्यविधी करण्यासाठी नियमानुसार डॉक्टरांचे प्रमाणपत्र घेऊन कॅन्टोन्मेंट बोर्ड देहूरोड हाॅस्पीटल यांच्याकडून स्मशान दाखला मिळवून रीतसर अंत्यविधी करणे अपेक्षित होते. मात्र शिंदे यांनी वॉर्डातील नगरसेवक गोपाळ तंतरपाळे यांचा मुलगा पंकज गोपाळराव तंतरपाळे आणि अन्य काही जणांच्या मदतीने सासूचा अंत्यविधी केला. दरम्यान स्मशानभूमीतील वॉचमनने मयताचा स्मशान दाखला न पाहता त्यांना बेकायदेशीर पणे स्मशानभूमीत प्रवेश दिला.मृत्यू झालेल्या महिलेच्या मृत्यूचे कारण माहिती न करता मृतदेहाची विल्हेवाट लावली. याबाबत सुरुवातीला देहूरोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर भारतीय दंडविधान कलम 188, 297 आणि 201 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. देहूरोड पोलीस पुढील अधिक तपास करत आहेत