पुणे,दि.3 एप्रिल 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनीधी):-पुण्यातून ज्यांनी निजामुद्दीन येथील मरकज मध्ये सहभाग घेतला ती तबलीगीची 10 लोक ज्यांना होमक्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले होते ती पळून गेली आहेत. असे वृत्त काही वृत्तवाहिन्यांवर दाखवण्यात येत आहे, मात्र याबाबत विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर यांनी खुलासा केला आहे की, ही लोक 23 फेब्रुवारीला दिल्लीहून पुण्यामध्ये आली होती आणि पुण्यातच 6 मार्चपर्यंत होती. 6 मार्चला ही लोक शिरुरमधे शिफ्ट झाली, शिरुरच्या एका मजिदमध्ये ते थांबलेले होते. 1 एप्रिलला जेव्हा दिल्लीची निजामुद्दीनची घटना उघडकीस आली त्यानंतर त्यांना होमक्वारंटाइनचे शिक्के मारण्यात आले होते. मात्र ती लोक फरार झालेली आहेत. वैद्यकीय औषध घेवून जाणा-या ट्रकमधून ते फरार झाले असा पोलीसांचा अंदाज आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांचे मोबाईल नंबर आमच्याकडे आहेत. सीडीआरवरून त्यांचे ट्रेसिंग केल्या जात आहे. परंतू निजामुद्दीन येथील कार्यक्रमात सहभागाची जी यादी देण्यात आली आहे. त्यामध्ये या व्यक्तींची नाव नव्हती आणि ही त्यापैकी आहेत असे आमच्या रेकॉर्डवरून तरी स्पष्ट होत नाही. ती तबलीगीशी संबंधीत आहेत ही वस्तुस्थिती आहे, आणि म्हणूनच त्यांचा शोध सुरू आहे. मात्र ते पुण्यामध्ये 23 फेब्रुवारीलाच आले होते असेही विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी स्पष्ट केले.