Home ताज्या बातम्या खुलासा..लॉर्ड बुद्धा टिवी विकलेले नाही, फेसबुक आणि व्हाट्सएप वर येणाऱ्या बातम्या बदनामी...

खुलासा..लॉर्ड बुद्धा टिवी विकलेले नाही, फेसबुक आणि व्हाट्सएप वर येणाऱ्या बातम्या बदनामी करण्यासाठी आणि खोट्या – सचिन मून

93
3

लॉर्ड बुद्धा टिवी विकलेले नाही, फेसबुक आणि व्हाट्सएप वर येणाऱ्या बातम्या बदनामी करण्यासाठी आणि खोट्या – सचिन मून

नागपुर,दि.5 एप्रिल 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनीधी):-26 नवंबर 2010 (संविधान दिन) पासून टिवी ची सुरुवात दिक्षाभूमि येथून झाली. या टेलीविज़न क्षेत्रात काम करणाऱ्या मी सचिन मून, राजू मून, अमन काम्बले, सामाजिक कार्यकर्ता भैय्याजी खैरकर आणि प्रीतम बुलकुंडे आम्ही स्वत सुरुवातीला स्वत जवळचे काही पैसे टाकून किरायाने छोटेसे ऑफिस घेऊन या चैनल चे प्रसारण नागपुरातील काही केबल नेटवर्कच्या माध्यमातुन सुरु केले.विदर्भातील बौद्ध समाजामधे प्रचंड उत्साह निर्माण झाला, प्रत्येक घरोघरी केबल च्या माध्यमातुन लोकांनी या चॅनेल चे प्रक्षेपण पाहने सुरु केले.चैनल मधे प्रक्षेपित होणाऱ्या बुद्ध विहार अभियानाच्या अंतर्गत सुरुवातीला वर्षभर बुद्ध विहाराच्या मंडळाने आम्हाला दान देऊन आमच्यात प्रचंड उत्साह वाढविण्यात कुठलीही कमी होऊ दिली नाही, बुद्ध विहार मंडळाचे आजही मनापासून खुप खुप धन्यवाद.

लॉर्ड बुद्धा टिवी बघणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती, संपूर्ण देशभरातुन बौद्ध बांधवांचे फ़ोन सुरु होते हमारे गांव में चैनल क्यों नही दिखता लोकांचा प्रचंड उत्साह पाहुन आम्ही सुद्धा चैनल देशभर कशे पोहोचवता येईल याकरिता दिवसरात्र मेहनत करायला सुरुवात केली.
सुरुवातीला 2010 मधे चैनल फक्त लोकल केबल नेटवर्क चे चैनल होते, चैनल ची फीड आम्ही नागपुरच्या बाहेर घेऊन नाही जाऊ शकत होतो. देशातुन फोन येणे सुरुच होते. *देशभरात चैनल आपल्या बांधवांन पर्यन्त पोहोचविन्यासाठी सैटेलाइट शिवाय पर्याय नव्हता

मग सैटेलाइट वर जाण्यासाठी क़ाय केले पाहिजे, प्रसारण मंत्रलयाची परवानगी, किती पैसे लागणार, दर महिन्याला सैटेलाइट चे भाड़े किती भरावे लागणार, पैसा कसा उभा करावा हे सर्व प्रयत्न आम्ही 2010 ते 2011 या काळात करत होते।

माहिती आम्ही पूर्ण काढली, टेक्निकली सुद्धा आम्ही परिपूर्ण होतो, 9 लाख रुपये दर महिन्याला सैटेलाइट चे भाड़े लागणार होते, बाकी वेगळे दिल्लीच्या तरुण जैन सोबत आमचे संपर्क जुडले तो त्याचे स्वतःचे लाइसेंस लॉर्ड बुद्धा टिवी साठी दयाला तैयार झाला आणि आमची जुळवाजुळव सुरु झाली

2011 ची चंद्रपुर ची बुद्धजयंती

2011 मधे चंद्रपुर ला फक्त एक केबल ucn वर लार्ड बुद्धा दिसत होते, बाकी कोणी दाखवत नव्हते,आम्ही चंद्रपुरात बुद्ध जयंती निमित्य भीम गीतांचा कार्यक्रम आयोजित केला, बौध्द जनतेने कार्यक्रमाचे 500, 200, 100 अशे तिकीट घेऊन आम्हाला 9 लाख चंद्रपुरच्या बौध्द जनतेने दिले आणि त्यांचे उपकार आज सुद्धा आम्ही फेडू शकत नाही।

सैटेलाइट वर टाकण्याची तैयारी

9 लक्ष रुपये आल्यानंतर एक प्रचंड उत्साह आमच्यात होता पण सैटेलाइट भाड़े दर महिन्याला 9 लाख रुपये लागणार होते आणि बाकीच्या ख़र्च सुद्धा होता।
संपूर्ण देशात आपल्या बांधवांन पर्यन्त चैनल पोहोचविन्यासाठी सैटेलाइट हे एकच माध्यम होते. देशभर बाबासाहेब आणि बुद्ध यांचा विचारांचा प्रचार प्रसार करण्यासाठी थोड़ी रिस्क आणि प्रयत्न केले तर एक चांगले माध्यम उभे राहु शकत होते.

पण होते फक्त 9 लाख आणी वर्षभराच्या ख़र्च होता 1 करोड़ च्या वर, समोर जायचे होते तर रिस्क घेणे गरजेचे होते  संपुर्ण भारतातुन जनतेचे फ़ोन येणे कंटिन्यू सुरु होते।
शेवटी हिम्मतीने रिस्क घेतलीचं आम्ही दिले 9 लाख तरुण जैन ला आणि टाकले चैनल सैटेलाइट वर

2011 पासून लॉर्ड बुद्धा सैटेलाइट वर

आता दुसऱ्या महिन्यात दयाला पैसे नव्हते, ज्या दिवशी आपला टिवी सैटेलाइट वर सुरु झाला सर्वात अगोदर बारामती, परळी, कल्याण, औरंगाबाद च्या बौध्द जनतेने केबलवाल्यांना रिक्वेस्ट करुण किंवा कुठे जोरजबरदस्ती करुण चैनल सुरु करुण घेतले.अर्ध्या महाराष्ट्रात चैनल दिसने सुरु झाले, आमचा उत्साह द्विगुणित झाला, प्रतिनिधींची टीम वाढ़वली, कैमरामैन वाढ़वले सोबत ख़र्च सुद्धा वाढला.बुद्ध विहार मंड़ळने दान देने सुरु केले 50 हजार, 25 हजार काही 1 लाख, बुद्ध विहारा सोबत जोडलेल्या लोकांनी भरपूर मदत केली.
आता महाराष्ट्रात लोकांना घराघरात 24 तास बाबासाहेब आणि बुध्द दिसू लागले। दानाच्या माध्यमातून पैसे जमा होत होते, वाढदिवसाच्या जाहिराती सुद्धा येत होत्या पण खर्च इकडे वाढत होता आम्ही रिस्क घेऊन चैनल साठी भैयाजी खैरकर प्रकृति ची काळजी, कुठलेही मानधन न घेता 24 तास चैनल महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगढ़, गुजरात येथे कार ने रिस्क घेऊन फिरत होते।

कंपनी रजिस्टर्ड केली
सैटेलाइट वर चॅनेल सुरु होते दिवस जात होते, आम्ही विचार करीत होतो दुसऱ्यांचे लाइसेंस वापरन्यापेक्षा स्वत चे लाइसेंस का नाही घ्यावे, आपले स्वतचे लाइसेंस असले तर त्यावेळेस 5.30 लाख महिन्याला लागले असते सैटेलाइट चे.आम्ही रजिस्टर्ड कंपनी स्थापन केली आणि कारभार सुरु केला, टेलिपोर्ट क़ाय असते, ते स्वत उभारन्यासाठी क़ाय इक्विपमेंट्स लागतात, सैटेलाइट वर वीडियो अपलिंक कसा होतो, प्रसारण मंत्रालय ची परवानगी या सर्व टेक्निकल बाबी आम्ही शिकत गेलो।
आम्ही दर महिन्याला 9 लाख रुपये देत होतो, स्वत लाइसेंस आणि टेलीपोर्ट घेतल्याने खर्च सरळ अर्ध्या वर येणार होता.
सैटेलाइट हे प्राइवेट नसते, त्यावर भारत सरकार चे नियंत्रण असते,त्यावर आपल्याला स्पेस भाड़याने घ्यावा लागतो प्रसारण मंत्रालय ची दर वर्षाला फी भरून परमिशन घ्याची असते, त्यासाठी रजिस्टर्ड कंपनी कड़े 5 करोड़ चे नेटवर्थ लागते (आता 20 करोड़ झाले) कुठल्या कंपनी ला परमिशन दयाची हे सर्व प्रेजेंट गवर्नमेंट च्या हातात असते, सहजासहजी कोणालाही परमिशन डेट नाही, मोदी सरकार ने तर दिलेच नाही, असो ।

9 लाख दर महिन्याचा ख़र्च कमी कसा करायचा याकड़े आता लक्ष होते, स्वतच्या टेलिपोर्ट आणि स्वतःचे लाइसेंस आता घ्याचेच हे ठरवले । पण हे सर्व करण्यासाठी रजिस्टर्ड कंपनी कड़े 10 करोड़ असल्याशिवाय आम्ही प्रसारण मंत्रालय कड़े जाऊ शकत नव्हतो।
बुद्ध समाजातील काही मोठे व्यवसायी यांना सुद्धा भेटलो पण नकार मिळाला, आता इतक्या समोर गेल्यानंतर मागे वळने बरोबर नव्हते कारण जवळपास संपूर्ण महाराष्ट्र, गुजरात वर चैनल दिसने सुरु झाले होते, भैय्याजी निरंतर 24 तास चॅनेल लावन्यासाठी फिरत होते।
कोणी मोठ्या व्यक्ति ने मदत न केल्यामुळ आम्ही आपल्या लोकांना चैनलच्या माध्यमातून विनंती केली की चैनल भारतभर पोहोचविन्यासाठी टेलिपोर्ट लाइसेंस स्वत उभारण्यासाठी 5 वर्षासाठी 1 लाख देऊन मदत करावी आम्ही तुम्हाला व्याज सुद्धा देऊ हे सुद्धा आम्ही लोकांना आव्हान केले.
आपल्याला लागत होते 10 करोड़ पण कंपनी कड़े जमा झाले 3 ते 3.50 करोड़ ते सुद्धा जमा करायला 4 वर्ष लागले, कसा होईल टेलिपोर्ट उभा ? टेलिपोर्ट नाही करू शक्लो पण चैनल चे लाइसेंस स्वतचे घ्याचेच हे ठरवले होते.
भैय्याजी आणि मी घरदार सोडून 24 तास कार ने फिरूंन, मेहनत करुण 35 राज्यात चैनल पूर्ण सुरु करुण दाखवले।
एक दुख जरूर आज सुद्धा वाटते याच दरम्यान आमच्या सोबत असलेले सहकारी मित्र अमन काम्बले, प्रीतमभाऊ कंपनी पासून वेगळे झाले.
मित्रांनो 2012 पासून दर महिन्याला चॅनेल च्या खर्च 12 लाख रुपये सुरुच होता, हिम्मत हरलो नव्हतो, आज सुद्धा नाही हरलो, आपला समाज सोडून इतर कोणाकड़ेही भीक मागितली नाही. 2014 पर्यन्त चैनल चे लाइसेंस भाड़े ने सुरु होते, 9 लाख रुपये प्रतिमहीना देने सुरुच होते.

चैनल आणि भैयाजींचे आंदोलन

26 नवंबर संविधान दिवस हा भारतभर कसा साजरा होईल, भारतभर फिरता फिरता सरकारला आम्ही आमचे प्रतिनिधि निवेदन देऊन, चर्चासत्र टीवी च्या माध्यमाने घेऊन प्रचार प्रसार करीत होतो.ई.झेड. खोब्रागडे सर फार पूर्वी पासून नागपुरात त्यांचे संविधानाच्या जागर कार्य सुरु होते त्यात भर पडली लॉर्ड बुद्धा टिवी ची, भैय्याजी आणि आमच्या प्रतिनिधि ने सम्पूर्ण भारतात जनजागरण करुण सरकारला संविधान दिवस घ्याल भाग पाडले.

15 अगस्त और 26 जानेवारी के कार्यक्रमों में बाबासाहब का फोटो क्यों नही हे आंदोलन सुद्धा टिवी आणि त्यांचे प्रतिनिधि च्या माध्यमातून भैय्याजी ने केले आणि राज्य सरकारने अध्यादेश काढून फ़ोटो लावणे गरजेचे केले.भीमकोरेगांव महाराष्ट्रातील काही जिल्ह्यतिलच लोकांना माहित होते 2011 पासून आज पर्यन्त दर वर्षी दिवसभर लॉर्ड बुद्धा चैनल वर लाईव दाखवून, त्या लड़ाई च्या खरा इतिहास भारतभर लॉर्ड बुद्धा टीवी ने पोहोचवला, याला तुम्ही नाकारू शकत नाही.

6 दिसंबर चैत्यभूमि बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिवस ओबी वैन किरायाने आणून संपूर्ण भारताला एकही वर्ष खंड न पड़ता आज सुद्धा लाइव दाखवतो आहे, पहले कुठलेही टीवी दाखवत नव्हता, आता सर्वच चैनल त्यादिवशी बाबासाहेबांना श्रद्धांजलि देण्याकरिता कार्यक्रम दाखवितात , ते फक्त लॉर्ड बुद्धा टीवी ने केलेल्या जनजागृति मुळ

आदरणीय आनंददराजजी आंबेडकर यांचे इंदुमिल चे आंदोलन महाराष्ट्रातील सर्व बौद्ध जनतेपर्यन्त जागर करण्याचा वाटा लॉर्ड बुद्धा टिवी च्या आहेच।

वीर शिदनाक महार (भीमा कोरेगांव) यांची समाधी कलम्बी सांगली येथे शोधून त्यांचा इतिहास भारतभर पोहोचवीन्याचे काम सुद्धा लॉर्ड बुद्धा टीवीचेच .

1942 ला नागपुरच्या महिलांनी डॉ बाबासाहेबांना नागपुरात बोलावून अस्पृश्य महिला परिषद घेतली होती, लॉर्ड बुद्धा टिवी, संथागर फाउंडेशन व काही महिला मंडल ने पुढाकार घेऊन त्या परिषदेच्या आठवनी ला जीवंत करुण महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगढ़ येथे कार्यक्रम घेऊन महिलांन मधे प्रबोधन केले.

जिजाऊ माता जयंती, रमाबाई जयंती, फुले दाम्पत्य यांना भारतरत्न का नाही? अशे खुप कार्यक्रम करुण लोकांना कार्यक्रम घेण्यास प्रवृत्त केले।

पंढरपुर का मंदिर पहले बौद्ध विहार था पंढरपूरात जाऊंन तिथल्या प्रशासनाच्या डोक्यावर बसून भैय्याजी आणि लॉर्ड बुद्धा टीवी ने जनजागरण केले।

दीक्षाभूमि वरुण भारतात पहिल्यांदा  7 दिवसांच्या भीम महोत्सव कार्यक्रमाची सुरुवात करुण लोकांना आप आपल्या क्षेत्रात भीममहोत्सव घ्याला लावनारे फक्त एकमेव लॉर्ड बुद्धा टिवी।

अशे खुप प्रश्न लॉर्ड बुद्धा टिवी ने भारतात आपल्या लोकांना इतिहास माहित व्हावा यासाठी केले।

हा लॉर्ड बुद्धा टिवी फक्त बौध्दचं नाही पाहत होते तर इतर समाजाचे लक्ष सुद्धा या चैनल कड़े होते कारण टिवी आणि केबल नेटवर्क च्या माध्यमातुन आपण इतर समाजाच्या घरात शिरलो होतो।

हा शरद दहिया कौन

दर महिन्याला 9 लक्ष रुपये टेलपोर्ट आणि लाइसेंस ला जात होते, हा ख़र्च कमी करने गरजेचे होते, नाही स्वतचे टेलिपोर्ट झाले पण स्वतचे अपलिंकिंग डाऊनलिंकिंग लाईसेंस घेणे गरजेचे होते, स्वतःचे लाईसेंस मुड़ें आपले 3 लाख दर महिन्याला वाचनार होते।

2012 ला माझी भेट दिल्ली येथील न्यूज़ 24 च्या टेलिपोर्ट मधे शरद दहिया सोबत झाली, ते तेथील टेलिपोर्ट चे हेड होते, मी रोज त्यांचा संपर्क मधे होतो, व्यक्ति चांगले आहेत मनहुंन मी त्यांना विचारात गेलो ते मला सपोर्ट करत गेले, शरद दहिया मला टेक्निकली आणि प्रसारण मंत्रालय चे लाइसेंस कशे घ्याचे या संदर्भात मदत करत गेले.
2 ते 3 वेळेस मी लॉर्ड बुद्धा टीवी कंपनी कडून लाइसेंस घेण्याकरिता प्रसारण मंत्रालय ला अर्ज केला, पण त्यांनी तो फेटाळला, लाइसेंस देण्यास मंत्रालय ने सरळ मला नकार दिला, वेळ जात होता, दिल्लीला येनजान करण्यासाठी पैसे सुद्धा खुप जात होते।
एक चांगले गृहस्थ मनहुंन मी त्यांना त्यांच्या नावाने कंपनी बनवायला लावली आणि चैनल लाइसेंस साठी अप्लाई केले, शरद दहिया यांचा त्या कंपनी मधे 1 करोड़ च्या वर पैसे आणि बैंक गैरंटी सुद्धा मी दिली (बैंक ट्रांसेक्शन चे प्रूफ आहेत माझ्या कड़े) आणि 2015 ला आपले स्वतचे लाइसेंस आले आणि 9 लाख वरुण दर महिन्याच्या खर्च 5.30 लाख वर आला । कंपनी च्या पेपर्स वर नाव शरद दहिया यांचे होते पण ती कंपनी आणि लाइसेंस माझे होते।

टेलिपोर्ट /सैटेलाइट ला दर महिन्याला 5.30 लाख,ऑफिस ख़र्च, स्टॉफ पेमेंट, इतर असे दर महिन्याला 10 लाख ख़र्च होताच, तुमचे चैनल कोणी बघा किंवा नको बघा ख़र्च ठरला होता

लॉर्ड बुद्धा टीवी चे प्रक्षेपण संपूर्ण भारतात होते आज सुद्धा आहे, पावसाळ्यात आम्हाला 3 महीने फार भयंकर त्रास होतो, 3 महीने कुठेही फिरता येत नव्हते, जाहिराती नाही राहत, 3 महिन्यांचे 30 लाख कुठल्याही परिस्थिति मधे जमा ठेवावा लागतोच.

दिल्ली ला टेलिपोर्ट ला एडवांस पेमेंट केल्याशिवाय ते चैनल सैटेलाइट ला अपलिंक करत नाही.
या 2012 ते 2018 पर्यन्त कुठल्याही मोठ्या बौद्ध व्यवसायीकाने मागितल्यावर सुद्धा जाहिरात देत नाहीत.
अशा परिस्तिथि मधे आम्हाला समजले की टीवी चैनल सैटेलाइट चालवने, दैनिक पेपर चालवने सोप काम नाही, जाहिराती शिवाय दैनिक किंवा चैनल चालूच शकत नाही हे कळले.

लॉर्ड बुद्धा टीवी आपल्या बौद्ध समाजापर्यन्त मर्यादित असल्याने दूसरे लोक किंवा कंपन्या आपल्याला जाहिराती देत नाहीत, हे सुद्धा आमचा लक्षात आले।
मग प्रश्न होता चैनल चालवयचे कशे? आम्ही डॉक्टर्स लोकांना भेटून त्यांचे 22 मिनीट चे प्रमोशनल शो घेत होतो त्या माध्यमातम टेलिपोर्ट आणि सैटेलाइट चे 5.30 लाख निघायचे।
मैत्री संघ,वाढदिवस आणि इतर छोट्या जाहिराती च्या माध्यमातुन बाकी ख़र्च निघायचा।
भैय्याजी आणि मी सोबत प्रतिनिधि यांचे को-ऑर्डिनेशन परफेक्ट असल्यामुळ काम सुरळीत सुरु होते.
पावसाळ्यात 3 महीने काढ़ने फार जास्त कठिन होते. याचं दरम्यान भारतातून खुप गावांतुन लोकांचे फ़ोन यायचे हमारे यहां केबल नेटवर्क नही है डिश है चैनल हम भी रोज देखना चाहते।
अजुन एक नवीन रिस्क होती क़ाय करायचे अशे कितीतरी गांव खेड़े होते जिथे केबल चे जाळे नव्हते. परत रिस्क घेतली आणि सक्सेस सुद्धा झालो.
पैसे नसतांना सुद्धा बोललो वीडियोकॉन डिश सोबत, 2 करोड़ मागत होता, पैसे नव्हते, डिश मधे पार्टनर मनहुंन सोबत या ऑफर घेऊन परत आपल्या समाजाचे मोठे डॉक्टर्स, बिल्डर्स कड़े गेलो, आज सांगतो, उद्या सांगतो शेवटी नाही बोलले, 1 वर्ष त्यात गेला.
शरद दहिया ने दिल्ली ला बोलावले, टाटा स्काई ची ऑफर आली होती 5 ते 6 करोड़ घेतो टाटा स्काई, भारतातील मोठी कंपनी आहे टाटा स्काई. फार कमी बजट च्या ऑफर आला होता ते सुद्धा 3 वर्ष साठी, 50 लाख टोकन देऊन सुरु करायचे होते.
शरद दहिया मला बोलले टाटा स्काई पे आने के बाद दिल्ली से मेरी कंपनी मार्केटिंग करेगी तुम्हारे लिए, कमर्शियल विज्ञापन हम लेंगे, सरकार से विज्ञापन लेंगे तभी आप आगे बढ़ सकते हो।
आम्ही होकार दिला पैसे दिले शरद दहिया ला टाटास्काई ला दयाला आणि त्यांचा कंपनी ने आपल्या चैनल साठी मार्केटिंग सुरु केली. टाटा स्काई ने चैनल लॉन्च केले आपले.
आता भारतातला सर्व त्या पेक्षा जास्त बाहेरचा भाग सुद्धा कवर झाला.
टाटा स्काई वर आल्याबारोबर 8 दिवसांत वीडियोकॉन चे अधिकारी वर्ग 1 अप्रैल 2018 ला मला भेटायला पुणे येथून नागपुरात आले, तेव्हा सुद्धा पैसे नव्हते मी नाही बोललो, मग एक मार्ग काढला आणि 14 अप्रैल 2018 पासून विना पैसे देऊन फ्री मधे चैनल विडियोकॉन डिश ने लॉन्च केले.

2011 ते 2018 पर्यन्त 8 वर्ष भैय्याजी आणि माझे घरदार सोडून संपूर्ण भारतात चैनल कशे दाखविता येईल यात फिरण्यात गेले.
आपले बहुजन बांधव कशे या मीडिया क्षेत्रात येतील या साठी सुद्धा आम्ही गरीब मुलांसाठी डॉ आंबेडकर मीडिया स्कूल ची स्थापना करुण वीडियो एडिटिंग,कैमरा,न्यूज़ एडिटिंग, ग्राफ़िक्स डिज़ाइन 6 महिन्यात शिकवून ट्रेन केले काही लोकांना जॉब सुद्धा दिला आणि काही आज सुद्धा दुसऱ्या टीवी मधे जॉब करत आहेत.

मैत्री संघाच्या माध्य्मातुन गांवातुन शहरात आलेल्या किती तरी गरीब विद्यार्थयांना ज्यांच्या कड़े खायला सुद्धा पैसे नाहीत अश्या मुलांना भैय्याजी ने राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली पण फेस बुक साठी फ़ोटो काढली नाही. असो
लोकांना न्यूज़ मधे जास्त इंटरेस्ट राहतो, मनहुंन 2018 पासून जयभीम इंडिया न्यूज सुरु केली, बहुजन समाजा साठी स्वत चे न्यूज़ चैनल राहावे या साठी हा प्रयत्न टिवी वर सुरु केला होता. हळू हळू पूर्ण न्यूज़ चैनल 2020 किंवा 2021 पर्यन्त सुरु करायचे त्यासाठी सर्व राज्यात ऑफिस असणे गरजेचे असते, मुंबई येथे डॉ शांतारामजी खोब्रागडे ठाणे यांनी मदत केली, मध्यप्रदेश चे मोठे न्यूज़ ऑफिस भोपाल येथे लालबहादुर बौद्ध आणि राहुल भाऊ रंगारी यांनी उभे केले, छत्तीसगढ़ येथे भव्य मोठे न्यूज़ ऑफिस डॉ धाबरडे सर यांनी उभे केले. आपण समोर एक एक पायरी चढ़न्या प्रयत्न सुरु आहेच.

टाटा स्काई वर टाकून सुद्धा व्यवसायिक जाहिरात चैनल ला मिडने कठिन जात होते, चैनल मर्यादित असल्यामुळ प्रॉब्लम जात होता, डॉक्टर लोकांच्या जाहिराती जास्त दाखवले तर चैनल बघनारे प्रेक्षक ओरडत होते.
महिन्याच्या खर्च आता 12 लाख पर्यन्त होता

2018 ते 2019 या काळात चैनल वर जाहिराती येणे एकदम कमी झाले त्याचे कारण सोशल मीडिया फेसबुक आणि व्हाट्सएप्प आपले लोक जास्त वापरायला लागले त्यामुळ वाढदिवसाच्या जाहिराती आणि छोट्या जाहिराती मिळने बंद झाले.
डॉक्टर च्या जाहिराती वर सरकार ने बंदी घातली, चैनल ला नोटिस आले. 2019 च्या पावसाळ्यात अजुन जास्त प्रमाणात त्रास झाला, कस तरी शरद दहिया ला बोलून पावसाळ काढला, विधानसभा निवडणुका होत्या वाटल आपल्या पक्षाचे उमेदवार जाहिराती देतील पण नाही दिल्या, ज्या लोकांनी आम्हाला 1 लाख रूपयाची मदत केली होती त्यांचे देने सुरु होते आताही फार कमी लोकांचे दयाचे आहेत.या वर्षी ते सर्व कम्पलीट देने होईल.
शेवटी चैनल दिसंबर 2019 पर्यन्त कशेतरी शरद दहिया ने टेलिपोर्ट ला सांभडले जाहिराती च्या माध्यमातून एक रुपया सुद्धा न आल्याने कंपनी डबघाईस आली.
सोशल मीडिया स्ट्रांग झाल्यामुळ जाहिरातीवर फरक पड़ला, मनहुंन आम्ही सुद्धा सोशल मीडिया कड़े जास्त लक्ष देऊन ऑनलाइन लॉर्ड बुद्धा टीवी सुरु ठेवले फेसबुक आणि यूट्यूब वर.
सैटेलाइट चे पैसे दिसंबर 2019 नंतर भरायची जवाबदारी कैलाश मोरे अमरावती यांनी शरद दहिया ला भेटून घेतली, आम्ही सुद्धा काही बोललो नाही कारण चैनल चालने गरजेचे होते पण त्याला सुद्धा जाहिरातीच्या माध्यमातुन सैटेलाइट च्या किराया सुद्धा काढता आला नाही. शेवटी मी घेतलेल्या माहितीप्रमाणे 20 मार्च ला टेलिपोर्ट नी चैनल ची सैटेलाइट फ्रीक्वेंसी दुसऱ्या चैनल ला अलॉट केली.शरद दहिया ने प्रसारण मंत्रालय ला 20 मार्च ला अर्जी दिली चेंज द लोगो आणि लोगो चेंज करायचे पैसे सुद्धा त्यांनी भरले आणि 22 पासून दिल्ली लॉकडाऊन मुळ बंद झाली.
1 अप्रैल पासून सैटेलाइट फ्रीक्वेंसी दुसऱ्या चैनल ला गेल्यामुळ त्यावर रामायण दिसायला सुरुवात झाली पण लोगो लॉर्ड बुद्धा होता, लॉकडाऊन मुळ ही गड़बड़ झाली , कोरोनाचा प्रादुर्भाव दिल्ली ला जास्त प्रमाणात असल्यामुळ तिथे सर्व बंद आहे,सेक्युरिटी जास्त आहे, घराच्या बाहेर निघने फार मुश्किल आहे.
मी आपल्या सर्वांची माफी मागतो लॉकडाऊन उठल्या बरोबर शरद दहिया मंत्रालयात जाऊंन परमिशन घेऊन आपला Logo तो चेंज करणार आहे, कृपया थोड़ा वेळ द्यावा ही विनंती.
फेसबुक आणि व्हाट्सएप वर येणाऱ्या चैनल विकले ही बातमी साफ खोटी आणि बिनबुडाची आहे, चैनल चे लाइसेंस आपले स्वत चे आहे फक्त कंपनी दूसरी आहे.

आता प्रश्न रामायण चा

लाॅर्ड बुद्धा लोगो वापरुन टिवी ला रामायण वैगरे कार्यक्रम टेलीकास्ट झाले ते आम्ही पाठवले नाही किंवा सांगितले नाही, ते शरद दहिया यांनी ज्या कंपनीस दिले त्यांचा कंटेट आहे पण शरद दाहिया यांनी आमचा व आमच्या बौद्ध बांधवाचा विचार न करता लोगो वापरला त्यामुळे समाजाची नाहक बदनामी झाली त्या विरोधा आम्ही शरद दहिया यावर कारवाही करु व आपण आम्हाला आपलं चॅनल पुर्ववत होईल तो पर्यंत आपले सहकार्य असावे

लॉर्ड बुद्धा टिवी चैनल आम्ही विकलेले नाही, फेसबुक वर लाइव दिसते आहे, माझा हा व्हाट्सएप वाचल्यानंतर समाजाच्या कोणी व्यक्ति परत नव्याने सुरु करण्यास तैयार असेल तर मी टिवी लाइसेंस दयाल तैयार आहे आम्ही सुद्धा चैनल परत पहले सारखे सुरळीत करण्याच्या प्रयत्न करतो आहे.
व्हाटऐप्स आणि फेसबुक वर बदनामी करण्यापेक्षा एकदा खर तरी क़ाय विचारण्याचा प्रयत्न माझा मित्रा ने करायला पाहिजे होता.मी कुठे चुकलो असेल तर मला एक लहान भाऊ समजून माफ करावे.

आपला

सचिन मुन

असे प्रजेचा विकास चे संपादक विकास कडलक यांच्याशी बोलताना सचिन मुन यांनी हा खुलासा केला

Previous articleतबलीगीची 10 लोक ज्यांना होमक्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले होते ती पळून गेली या वृत्ताबाबत विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांचा खुलासा
Next articleपुणे विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २२९ ; दिवसभरात ८ जणांचा मृत्यू :-डाॕ.दीपक म्हैसेकर

3 COMMENTS

  1. Moon saheb tume jasa bolaley tasa beyaje khrekar Ka Bolat nahe teymantat Kailash Morey aahe tayna Bola me 2years zale baher aahe mala kahe mahet nahe asa Ka boltat bheyaji, phone pan gheyt nahet

  2. Bhai mala tumacha sobat bolayache aahe tumhim mala phone NP dya kiva mazya ya no var phone karu shakta pramod domaji moon 9527266223. 946178627 var karan vishay court case cha samandhit aahe chandrapur .

  3. डियर सचिन मुन सऱ आपल्याला एकच विनंती आहे कि आत्ता सुरु असलेल चँनल चे प्रोग्राम पाहता आपन आपला बुध्दा लोबो आनी नाव काढुन टाकावे ही विनंतीं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

twenty − seven =