पुणे,दि. ८ एप्रिल २०२०(प्रजेचा विकास न्युज प्रतिनीधी):-पुणे विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २२९ झाली असून दिवसभरात दुर्दैवाने ८ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती विभागीय आयुक्त डाॕ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
कोरोनाबाधित २२९ रुग्णांमध्ये पुणे जिल्हा १४४,सातारा ६,सांगली २६ व कोल्हापूर ३ असे आहे.आज ८ जणांचा मृत्यू झाल्याने आता ही संख्या १६ पर्यंत पोहचली असल्याचे सांगून ते म्हणाले,मात्र ३३ जण बरे होऊन घरी गेले आहेत.
पुणे महानगर पालिकेने शहरात २५ फ्लू क्लिनिक सुरू केले आहे.जेणे करून लक्षणे दिसली तर तातडीने उपचार करता येईल.
मृत्यू झालेल्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचा समावेश अधिक आहे,त्यामुळे कुटुंबातील व्यक्तींनी काळजी घेण्याची गरज आहे,असे आवाहनही त्यांनी केले आहे.
पुणे शहरामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे महानगरपालिकेमार्फ़त उपाययोजना करण्यात येत असून महानगरपालिका क्षेत्रातील काही भागात संचारबंदी जाहीर करण्यात आलेली आहे. तसेच पुणे महानगरपालिकेचे 25 दवाखाने सकाळी 8.00 वाजेपासून संध्याकाळी 8.00 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याबाबत आदेश देण्यात आलेले आहेत.शिवाय नागरिकांसाठी पुणे महानगरपालिका व पुणे सिटी कनेक्ट यांच्या संयुक्त विद्यमाने , कनेक्टींग संस्थेच्या सहकार्याने कोरोनाविरुद्ध वस्ती मित्र हेल्पलाईन (मुख्यत्वे वस्त्यांमधील नागरीकांसाठी) क्र. 020-25506923 /24/25 अशी सकाळी 10.00 ते संध्याकाळी 6.00 या वेळेमध्ये सुरू करण्यात आलेली आहे.
आजपर्यंत विभागामधील 21,11,242 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 87,10,795 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 706 व्यक्तीना अधीक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.
Home ताज्या बातम्या पुणे विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २२९ ; दिवसभरात ८ जणांचा मृत्यू :-डाॕ.दीपक...