Home ताज्या बातम्या २१दिवसांच्या ‘लॉक डाऊन’च्या मध्येही;जीवनावश्यक सेवा पूर्वी प्रमाणेच सुरळीत राहील -विभागीय आयुक्त डाॕ.म्हैसेकर

२१दिवसांच्या ‘लॉक डाऊन’च्या मध्येही;जीवनावश्यक सेवा पूर्वी प्रमाणेच सुरळीत राहील -विभागीय आयुक्त डाॕ.म्हैसेकर

55
0

पुणे,दि.२४ मार्च २०२०(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- -प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात २१ दिवसाचा ‘ लॉक डाऊन’ जाहीर केला असला तरी या काळात सर्व जीवनावश्यक सेवा पूर्वीप्रमाणेच सुरळीत सुरू राहणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त डाॕ.दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.

जनता कर्फ्यूच्या काळात तसेच राज्यात लागू असलेल्या कलम १४४ च्या अधिसूचनेत नमूद केलेल्या बाबी तशाच सुरु राहतील. २१ दिवसाच्या ‘लॉक डाऊन’च्या घोषणेमुळे जीवनावश्यक बाबींच्या पुरवठ्यासह जीवनावश्यक सेवांवर कोणताही परिणाम होणार नाही. विनाकारण दुकानात गर्दी करू नका.कोणीही घाबरू नये. सर्व आवश्यक ती खबरदारी घ्यावी. घराबाहेर पडू नये . कोरोनाविरोधात आपली ही अत्यंत महत्त्वाची लढाई सुरू असून सर्व जनतेने संयमाने या परिस्थितीत सहकार्य द्यावे , असे आवाहन त्यांनी केले आहे.

Previous articleनागरिकांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सरकारच्या सूचनांचे पालन करावे- उद्धव ठाकरे
Next article21 दिवसांच्या ‘लॉकडाऊन’च्या काळात काय ‘चालू’ आणि काय ‘बंद’- पुणेजिल्हाधिकारी नवल किशोर राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

18 − eight =