Home ताज्या बातम्या 21 दिवसांच्या ‘लॉकडाऊन’च्या काळात काय ‘चालू’ आणि काय ‘बंद’- पुणेजिल्हाधिकारी नवल किशोर...

21 दिवसांच्या ‘लॉकडाऊन’च्या काळात काय ‘चालू’ आणि काय ‘बंद’- पुणेजिल्हाधिकारी नवल किशोर राम

36
0

पुणे,दि.२४ मार्च २०२०(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- जीवनावश्यक वस्तू, औषधे, भाजीपाला, दूध या वस्तू वगळण्यात आलेल्या आहेत, असे जिल्हाधिकारी श्री. नवल किशोर राम यांनी कळविले आहे.(व्हिडीओ पहा.)

विभागीय आयुक्त कार्यालय,पुणे-
1) पुणे महानगर परिवहन महामंडळ लि.(पीएमपीएमएल) च्या दि.23/03/2020 रोजीच्या एकूण 21603 फे-यांपैकी20345 फे-या रदद केल्या होत्या. 1258 फे-यांमध्ये एकूण 10441 प्रवाशांनी प्रवास केलेला आहे. सद्यस्थितीमध्ये फक्त अत्यावश्यक बाबींसाठी फे-या सुरु ठेवलेल्या आहेत.एस. टी. बसेस यापुर्वीच बंद करण्यात आलेल्या आहेत.
2) देशाअंतर्गत विमान वाहतुकीबाबत पुणे विमानतळ येथे दि.23/03/2020 रोजी 58 आगमनांव्दारे 3184 प्रवासी आले आहेत. तसेच दि. 24 मार्च 2020 रोजी दु. 01.00 वाजेपर्यंत 22 आगमनांव्दारे 1370 प्रवासी आले आहेत. यापेकी 4 जणांना Home Quarantine च्या सूचना दिलेल्या आहेत. सदयस्थितीत Isolation ला कोणालाही पाठविलेले नाही. दि. 24 मार्च 2020 च्या मध्यरात्री 12.00 वाजेपासून देशांतर्गत प्रवासी विमान वाहतूक दि. 31 मार्च 2020 पर्यंत पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक यापुर्वीच बंद करणेत आलेली आहे.
3) कोरोना सांर्सगिक रुग्ण संख्येमध्ये पुणे विभागामध्ये एकुण 9 ने वाढ झाली असून आज दि.23/03/2020 अखेर एकूण रुग्ण संख्या 37 एवढी आहे. वाढ झालेल्या 9 रुग्णापैकी 3 रुग्ण पुण्यातील असून 2 रुग्ण सातारा आणि 4 रुग्ण इस्लामपुर (सांगली) येथील असून सातारा आणि सांगली येथील रुग्णांना सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.
4) पुण्यामध्ये सुरुवातीस दाखल झालेल्या 2 रुग्णांच्या चाचण्या आता निगेटीव्ह आल्या असून आज संध्याकाळी अंतिम चाचणी नंतर त्यांना सोडण्याचा निर्णय घेण्यात येईल.
5) कोरोना रुग्णाच्या सर्वेक्षणातंर्गत आज दि.23/03/2020 अखेर भेट दिलेल्या एकूण घरांची संख्या 260563 इतकी आहे. भेट दिलेल्या घरांतील व्यक्तींची संख्या 1102203 इतकी असून संदर्भीत केलेल्या व्यक्तीची संख्या 137 एवढी आहे.
6) विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये वैद्यकीय क्षेत्रामधील तज्ञ आणि डॉक्टरांची दि. 24.3.2020 रोजी बैठक आयोजित करण्यात आलेली होती. सदर बैठकीमध्ये विभागीय आयुक्त यांनी सर्वांनापुणे विभागामधील कोरोना विषाणू संक्रमणाची सद्यस्थिती तसेच पुढील काळामध्ये करावयाच्या संभाव्य उपाययोजना यावर सविस्तर चर्चा करून हॉस्पिटलमध्ये आयसोलेशन कक्ष, व्हेंटीलेशन व आवश्यक मनुष्यबळ पुरविण्याबाबत आवश्यक ते सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या.
7) पुणे विभागाची लोकसंख्या जनगणने प्रमाणे 2,34,49,049 असून सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फ़त यापकी 47.95 टक्के लोकसंख्येस अन्नधान्य वाटप करणेत येते. सध्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फ़त वितरणासाठी 1,99,625.89 मे. टन (प्रतीकार्ड 35 किलो निकष) उपलब्ध असून ते 63 दिवस पुरेल. खुल्या बाजारातील उपलब्धता ही 1,09,285.31 मे. टन असून हा साठा 48 दिवस पुरू शकतो.
8) वैद्यकीय आपत्कालीन सहाय्यासाठी हेल्पलाईन क्र.
अ) ससुन सर्वोपचार रुग्णालय – 18002334120
ब) पिंपरी चिंचवड मनपा – 8888006666
क) भोसरी रुग्णालय – 9552578731
ड) वाय. सी. एम. रुग्णालय – 020/67332222 आणि 020/27423456
इ) राज्य शासन नियंत्रण कक्ष – 020/26127394
फ़) राज्य शासन हेल्पलाईन – 104
ग) आय. डी.एस.पी. – 18002334130
ह) नायडू रुग्णालय (पुणे मनपा) –020/25506304 आणि 020/25506317
ज) पुणे मनपा (आपत्ती व्यवस्थापन) – 020/25506800
ल) जिल्हाधिकारी कार्यालय (आपत्ती व्यवस्थापन), पुणे – 020/26123371 (टोल फ़्री 1077)
म) जिल्हाधिकारी कार्यालय, पुरवठा शाखा, पुणे – 020/26123743 आणि 9420756760
9) अन्न व औषध प्रशासन हेल्पलाईन क्रमांक- 1800222365
10) नागरीकांनी अफ़वांना बळी पडू नये. तसेच शासनाकडून वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करून सहकार्य करावे. पोलीस यंत्रणा ही नियमनासाठी असून त्यांचेशी निष्कारण वाद घालू नये. आपल्या सुरक्षेसाठी कृपया घराबाहेर पडू नये. भाजीपाला व अन्नधान्याचा पुरवठा नियमित होईल याची प्रशासनामार्फ़त दक्षता घेण्यात येत आहे. तथापी, काही वेळा भाजीपाल्याची कमतरता भासल्यास डाळी, कडधान्ये यांचा वापर नागरीकांनी करावा. वृद्ध व असहाय्य व्यक्ती यांना शेजारधर्माचे पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Previous article२१दिवसांच्या ‘लॉक डाऊन’च्या मध्येही;जीवनावश्यक सेवा पूर्वी प्रमाणेच सुरळीत राहील -विभागीय आयुक्त डाॕ.म्हैसेकर
Next articleBREAKING NEWS- कोरोनाच्‍या दोन व्‍यक्‍तींना डिस्‍चार्ज-विभागीय आयुक्‍त डॉ. म्‍हैसेकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

thirteen − 8 =