नवी दिल्ली, 3 मार्च 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-देशभरात 1 ते 7 मार्च 2020 दरम्यान जनऔषधी सप्ताह साजरा केला जात आहे. या निमित्त आरोग्य तपासणी शिबीर, जनऔषधी परिचर्चा, जनऔषधी का साथ यासारखे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
या सप्ताहात रक्तदाब तपासणी, मधुमेह रुग्णांची तपासणी, डॉक्टरांचा मोफत सल्ला आणि मोफत औषध वाटप विविध जनऔषधी केंद्रांवर केले जात आहे. सामान्य जनतेलाही जनऔषधी केंद्रांवर विकल्या जाणाऱ्या औषधांचा दर्जा आणि किंमतींबाबत जागरुक केले जात आहे.
सध्या देशात 700 जिल्ह्यांमधून जनऔषधी केंद्रांची संख्या 6,200 वर पोहोचली आहे. 2019-20 या आर्थिक वर्षात एकूण विक्रीने 383 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. यामुळे सामान्य नागरिकांची सुमारे 2200 कोटी रुपयांची बचत झाली आहे. ही योजना शाश्वत आणि नियमित उत्पन्नासह स्वयंरोजगाराचा उत्तम स्रोत देखील पुरवत आहे.(Release ID: 1604989)