पिंपरी,दि.०५मार्च २०२० (प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले
आणि भारतरत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा व विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात येणार असून दि. ११ ते १५ एप्रिल असे एकूण ५ दिवस कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे महापौर ऊषा उर्फ माई डोरे यांनी सांगितले.आज स्थायी समिती सभागृहात त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी त्या बोलत होत्या.
या बैठकीला पक्षनेते नामदेव ढाके, मनसे गटनेते सचिन चिखले, अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे,अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, फ प्रभाग अध्यक्षा योगिता नागरगोजे, ह प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे,नगरसदस्या अनुराधा गोरखे, मुलक्षणा धर शिलवंत, गीता मंचरकर, नगरसदस्य संतोष लोटे, सागर आंघोळकर संदिप वाघेरे, बाळासाहेब ओव्हाळ, माजी नगरसदस्य उत्तम हिरवे, मारुती भापकर, अतिरिक्त सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, निवृत्त कार्यकारी अभियंता शरद जाधव, सामाजिक कार्यकर्ते गणेश भोसले, तुकाराम गायकवाड, उत्तम कांबळे, निवृत्ती आरवडे, देवेंद्र तायडे, विकास कडलक,शेखर गायकवाड,बापू माने, धुराजी शिंदे, हौसराव शिंदे, माणिक निसर्गंध, प्रल्हाद कांबळे, संदिप साळवे, प्रविण कांबळे,अॅड. मिलींद कांबळे, युवराज वाघमारे, अर्जुन कदम, निलेश निकाळजे, बाळासाहेब रोकडे, प्रदिप युक्तर, वाया कांबळे, स्वप्नील पवार, अजय शेरखाने, दिलीप देहाडे, प्रमोद गायकवाड, विजय कांबळे, बळीराम काकडे,धम्मराज साळवे, अंजना गायकवाड, आकील मुजावर, दिलीप मोटा, सतिश पवार, शामाताई जाधव, मनोज गजभार, विनोद सरवदे, शेख कलिंदर शेख, दत्तात्रय सरकार आदी उपस्थित होते.
यावेळी विविध प्रबोधनात्मक सामाजिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांबरोबरच परिसंवाद, चर्चा सत्र,व्याख्यानमाला तसेच वक्तृत्व, निबंध स्पर्धा इ. कार्यक्रमांचे आयोजन करणेवावतच्या सूचना या बैठकीत करण्यात आल्या. तसेच वाहतूकीची कोंडी होणार नाही यासाठी उपाय योजना करणे व सुरक्षिततेच्या दृष्टीने
सीसी टीव्ही कॅमेरे बसविणे, युपीएससी/एमपीएससी च्या विद्यार्थ्यांचा सत्कार करणे, भव्य स्टेज मंडपाची व्यवस्था करने संपूर्ण मंडपावर पत्रे टाकण्याच्या सूचना करण्यात आल्या. याचबरोबर पिण्याचे स्वच्छ पाणी व वैद्यकीय पथकाची व्यवस्था करणेबाबत सुचना यावेळी करण्यात आल्या.दरवर्षीप्रमाणे या प्रबोधन पर्वाचे नियोजन करण्याच्या सूचना महापौर ऊषा उर्फ माई ढोरे यांनी अधिका-यांना दिल्या. महापुरुषांचे विचार सर्वांपर्यंत जाण्यासाठी प्रयत्न व्हावेत.महिलांसाठी पूर्ण एक दिवस
प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करणे तसेच वैधकीय सेवा पुरवणे,अरोग्य विषयक सेवा देणे,केंद्र व राज्य शासन तसेच महापालिकेचे उपक्रम जास्ती जास्त नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी माहिती देणारा स्टॉल उभारणे,मंडप उत्कृष्ट तसेच नौकरी व उद्योगधंदा मार्गदर्शन शिबीराचे आयोजन व कार्यक्रमाची प्रसिद्धी माध्यमे व विविध गोष्टीतुन करण्याच्या सूचना यावेळी महापौर ऊषा उर्फ माई ढोरे यांनी दिल्या.
Home ताज्या बातम्या महात्मा ज्योतीबा फुले,विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जंयती निमित्त पिंपरी चिंचवड महानगर...