Home औरंगाबाद डोंगरगाव,सिल्लोड मधील मागासवर्गीय (बौध्द) महिलांच्या हत्येच्या घटनेला १२ दिवस उलटुनही,अरोपी अजुन मोकाटच

डोंगरगाव,सिल्लोड मधील मागासवर्गीय (बौध्द) महिलांच्या हत्येच्या घटनेला १२ दिवस उलटुनही,अरोपी अजुन मोकाटच

0

तपास आधिकारी,ए पी आय किरण बिडवे(सिल्लोड पोलिस ठाणे)-

पी एम रिपोर्ट आलेले आहे त्यात दोघींचा मृत्यू पाण्यात बुडुन झाला आहे,काही टेस्ट आहेत त्या मंबई वरुन सीए आॅफिस जे तिकडे पाठवल्या आहेत ते आल्यावर पुढील गोष्टी समजतील व त्या अनुषंगाने तपासाची गती वाढेल, डोंगरगाव मधील विहिरीत पडुन मृत्यु झालेली महिला आणि लहान मुलगी ही घटना निंदनीय आहे,मी स्वतः तपास अधिकारी असून साक्षीदार गावातील लोक संशीयीत याकडे तपासाच्या दृष्टीने विचारपुस चालु आहे सर्व अँगलने पोलीस तपास करतील बलात्कार असेल मर्डर असेल अनेक बाबी असतील ह्या तपासले जातील व कायदेशीर कारवाई कायद्याच्या मार्गाने दोषींवर आरोपीवर केली जाईल त्यामुळे जनतेने पोलिसांना सहकार्य करावे व पोलिसांवर विश्वास ठेवा पोलिस नक्कीच ह्या गोष्टीचा छडा लावून दोषीवर कारवाई करतील.

सिल्लोड,दि.28फेब्रुवारी2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-डोंगरगाव, ता.सिल्लोड जि. औरंगाबाद मधे आणखी एक मागासवर्गीय (बौध्द) महिलांच्या अत्याचाराची व निघृण दुहेरी हत्येची घटना घडली ही अत्यंत निंदनीय घटना आहे,त्यामुळे दि.24 फेब्रुवारी ला पुण्याहुन रमाई महिला मंच(महा.राज्य) च्या अध्यक्षा भीमाताई तुळवे,समाजसेविका रंजनामाई कांबळे,रमाई महिला मंचच्या कार्यध्यक्षा मनीषाताई साळवे,आंबेडकर चळवळीतील महाराष्र्टाच्या सुप्रसिद्ध गायिका साधनाताई मेश्राम,बबीता चक्रनारायण,प्रजेचा विकास चे संपादक व लाॅर्ड बुद्धा टि.व्ही चॅनलचे प्रतिनिधी विकास कडलक,वंचीतचे नेते व आदिवासी भटका बहुजन संघटनेचे महाराष्र्ट राज्य अध्यक्ष माऊली तथा ज्ञानदेव सोनवणे,येडेश्वरी टुर्स ट्रव्हलचे विकास वनकळस पाटील,परमेश्वर जगताप,विश्वनाथ सरोदे,राजु प्रधान आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी डोंगर गाव येथे भेट दिली

पिडीत कुंटुबाशी भेटुन चर्चा करुन तेथील पोलीस प्रशासनाला भेटुन जाब विचारत चर्चा करुन निषेर्धात लवकरात लवकर दोषीना पकडुन कडक शासन करावे,अन्यथा तिव्र अंदोलन छेडण्यात येईल असे निवेदन अर्ज सर्व संघटने वतीने दिले.रंजनामाई कांबळे यांनी पिडित कुटुबांतील मुलास 5000रु चा चेक मदत म्हणुन दिला व आपणही सर्वानी मदत करावी व समाजातील या लहान मुलास शिक्षणासाठी आणि होतकरु होईपर्यंत सर्वानी साथ द्यावी असे अहवान कांबळे यांनी केले,माऊली सोनवणे यांनी खासदार आमदार सभापती व इतर स्थानीक नेत्यानी भेट न दिल्याची खंत व्यक्त केली व आमदार सत्तार यांना मंबई ला लोणावळ्यातुन जावे लागते लोणावळ्यात गाडी आडवुन धडा शिकवला जाईल,असे खुले अहवान सत्तार यांना दिले,तर भीमाताई तुळवे यांनी खंत व्यक्त करत पिडित कुटुबांना सात्वन पर मत व्यक्त केले.व सर्वानी दुखःद अंतकरणानी दोघी मायलेकींना श्रद्धांजली अर्पण केली,व लवकरच त्यांना न्याय मिळावा हि अपेक्षा व्यक्त केली.

या भेटीत वंचीतचे सिल्लोड तालुका अध्यक्ष कडुबा जगताप यांनी माहीती दिली,डोंगरगाव, ता.सिल्लोड जि. औरंगाबाद मधे आणखी एक मागासवर्गीय (बौध्द) महिलांच्या अत्याचाराची व निघृण दुहेरी हत्येची घटना घडली दि.17 फेब्रुवारी 2020 रोजी शहरातील घाटी वैद्यकीय रुग्णालयात डोंगरगाव ता. सिल्लोड जि. औरंगाबाद येथील मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला.सदर दुदैर्वी घटना कळाली असता तिथे वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते अमित भुईगळ, खालेद पटेल जिल्हा उपाध्य वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष कडुबा जगताप आदि कार्यकर्ते सोबत जावून त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेवून परिस्थिती जाणून घेतली.एक 32 वर्षाची महिला नाव वंदना रेऊबा बनकर/ साळवे व तीची लहान मुलगी भारती विलास साळवे (वय 7) यांच्या वर बलात्कार व खुन करुन त्यांच्या गुप्तांगात काड्या खुपसलेल्या अवस्थेत व डोळे , जीभ बाहेर निघालेले आहेत. त्यांची बाॅडी फाशी देवून खुन करुन तिन दिवसापूर्वी विहिरित टाकले व ती फुगून बाहेर आल्या नंतर हि गोष्ट उघडकीस आली आहे. सदर प्रकरणात मयतांच्या नातेवाईकांनी 3 दिवसापूर्वी मिसिंग तक्रार केल्यावर पण पोलिस प्रशासनाने निष्काळजी पणा केल्याचे दिसून आले आहे. अजुन आरोपींचा शोध लागला नाही, वंचित बहुजन आघाडीने मागणी केल्यानुसार सकाळी ईन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले.सिल्लोड तालुक्यात ही 8ते 15 दिवसातली दुसरी घटना आहे. जर अश्या नराधमांना कायद्याची जरब नसेल तर असे प्रकार वारंवार होतील. सिल्लोड तालुक्यात कायदा व सुव्यवस्था ढासळली असून , मागासवर्गीय/दलितांवर अन्याय व अत्याचार वाढल्याचे दिसून येत आहे. सदर प्रकरणात पोलिस प्रशासनाने लवकरात लवकर दोषी व्यक्तींना शोधुन अटक करण्यात यावी अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तिव्र अंदोलन करण्यात येईल पोलिस प्रशासनाच्या १० दिवस उलटून गेले तरी पोलीसानी कोणताही तपास केल्याचे दिसून येत नसुन प्रशासनाच्या विरूध्द आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिला आहे.असे प्रजेचा विकासचे प्रतिनिधीशी बोलताना कडुबा जगताप यांनी सांगीतले.

Previous articleरमाई नगर झोपडपट्टीचे त्याच जागेवरच पुनर्वसन करा.-गुलाब पानपाटील
Next articleरविवारी पिंपरीमध्ये सीएए विरोधात जाहिर सभा!नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

2 + 17 =