Home ताज्या बातम्या रमाई नगर झोपडपट्टीचे त्याच जागेवरच पुनर्वसन करा.-गुलाब पानपाटील

रमाई नगर झोपडपट्टीचे त्याच जागेवरच पुनर्वसन करा.-गुलाब पानपाटील

90
0

रावेत,दि.26 फेब्रुवारी 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनीधी):-
रमाई नगर झोपडपट्टी गेल्या २० ते २१ वर्षापासून वास्तव्यास आहेत. आम्ही त्याठिकाचे लाईट बिल, घरपट्टीमहानगरपालिकेस कररुपी पैसेही भरतो. परंतु आपल्या कार्यालयाच्या मार्फत नोटीस न देता प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनी आमच्या झोपड्या जमिनोध्वस्त केल्या. काही कुटुंबात गरोदर महिला आहेत. तर बाळंतीण आहेत. तसेच १२वीच्या वार्षिक परीक्षा चालू असताना आपण व आपल्या कर्मचा-यांनी कोणत्याही प्रकारची सहानुभूती न दाखवता
राक्षसीवृत्तीची कारवाई केली आहे. आम्ही तीन शब्दात निषेध करतो. आम्ही आपणांस सांगू इच्छितो की,२०१९ पर्यंतच्या रामाईनगरमध्ये राहणाऱ्या सर्वांना आहे त्याच जागेवर पुनर्वसन करावे. अन्यथा जन्मानसाच्या रोषाला सामोरे जावे लागेल.

याची आपण नोंद घ्यावी.असे गुलाब पानपाटिल म्हणाले व अधिकारी चर्चा व्यवस्थित करत नाहीत खाजगी प्रॉपर्टी चे मालक असल्यासारखे बोलत आहेत, जनतेचे सेवक असून बिल्डर धारकांचे गुलाम आहे याविरोधात कोर्टात धाव घेऊन कागदपत्रांची शहानिशा करून कायदेशीर मार्गाने प्राधिकरणाला जाब विचारून अधिकारी मोठ्या बिल्डिंग धारक जे दोन मजली तीन मजली बांधकाम करत आहेत त्यांच्यावर कारवाई करत नाही आणि ह्या गरीब पोट भरायला आलेल्या हातावर पोट भरणाऱ्या ह्या लोकांवर कारवाई करते आणि बिना नोटीस देता यांना कारवाई करण्याचा अधिकार कोणी दिला,भारतीय संविधानानुसार ह्या भारतातील गरीब व्यक्ती भिकारी जरी असेल तरी त्याच्या सांभाळ करण्याची जबाबदारी ही सरकारची आहे त्यामुळे सरकारने कोणालाही बेघर न करता सर्वांना घरे दिली पाहिजे आहेत या झोपड्या पुनर्वसन करून दिले पाहिजे असे मत निषेधार्थ व्यक्त केले.

अधिकारी प्रमोद यादव- प्राधिकरणाच्या अतिक्रमण जागेवर जे पत्र्याचे शेड मारल्या त्या काढल्या कारण ती जागा आमची म्हणजेच प्राधिकरणाची आहे जेवढे पत्र्याची शेड आहेत तेवढेच पडले, जुन्या रमाबाई नगरच्या झोपडे आहेत त्यांना हात लावलेला नाही, झोपडी लागत प्राधिकरणाच्या जागेत असणाऱ्या पत्रा शेड वर कारवाई करण्यात आली आहे शक्य आहे तेथे SRA राबवण्यात येतील, भिंतीचे वॉल कंपाऊंड रमाबाई नगर झोपडपट्टी लगत केले जाईल.

देवेंद्र तायडे(वंचीत बहुजन आघाडी अध्यक्ष पि.चि शहर):-प्राधिकरणाने सर्व रिपोर्ट घेऊन कारवाई करायला पाहिजे तसेच कारवाई करण्याआधी नोटिसा देखील दिल्या पाहिजे नोटीस देण प्राधिकरणाची जबाबदारी होती पण प्राधिकरणाने कोणतीही नोटीस न देता हे झोपड्या पाडलेल्या आहेत त्यामुळे अनेक जनतेच्या मनामध्ये विविध प्रश्न निर्माण झाले आहेत अनेक लोकांचा संसार रस्त्यावर आला आहे त्यास जबाबदार कोण त्यामुळे प्राधिकरणाच्या प्रशासन अधिकाऱ्यांनी तात्काळ याकडे लक्ष दिले पाहिजे व सर्वांना हक्काची घरे व झोपडपट्टी पुनर्वसन दुसऱ्या जागी त्यांनी केले पाहिजे

बाळासाहेब ओव्हाळ नगरसेवक – यांच्या घराकडे मोर्चा फिरवण्यात आला त्यावेळी बाळासाहेब ओव्हाळ यांच्याकडे गेलेल्या या मोर्चाला बाळासाहेबांनी त्यांच्याशी चर्चा करून त्यांना शांत करून सर्व कागदपत्रांची शहानिशा करून दोन दिवसानंतर आपण निर्णय घेऊ वेळ आली तर उपोषणही करू जुन्या झोपडीधारकांना कोणताही धक्का लागणार नाही सर्वांना SRA च्या माध्यमातून घरे मिळवून देण्याचा प्रयत्न करू सदर प्राधिकरणाने मलाही न कळवता अचानक पणे कारवाई केली आहे आणि लोकांच्या घरातील संसार भांडीकुंडी बाहेर न काढता त्यांनी जे काही कारवाई केली हे बेकायदेशीर आहे किमान नोटीस दिली असते तर त्यावर काहीतरी तोडगा काढता आला असताहा

मोर्चा गुलाब पान पाटील (वंचीत बहुजन आघाडीचे युवक अध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर)यांच्या नेतृत्वा खाली काढण्यात आला त्यांना रमाई महिला मंच महाराष्र्ट राज्याच्या अध्यक्षा भीमाताई तुळवे पाठींबा देत सहभागी झाले,रिपब्लिकन सेने चे पि.चि प्रमुख संघटक हौसाराव शिंदे,सरला उपरवट,साधना मेश्राम,लता रोकडे,बनसोडे ताई,वेणुताई गायकवाड,कुसुम गवळी,रेश्मा आत्तार,राधा कुचेकर,मंगल कसबू,विजया थोरात,बेबी पवार,सुलभा हिंगे,रुपाली गव्हाळे,मिरा चव्हाण,सिमा गोटे,निलीमा कांबळे,व रमाबाई आंबेडकर नगर मधील सर्व रहदार,वंचीत रमाई महिला मंच चे पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleआमदार प्रणिती शिंदे यांच्या वक्‍तव्याचा निषेर्धात जोडे मारो अंदोलन
Next articleडोंगरगाव,सिल्लोड मधील मागासवर्गीय (बौध्द) महिलांच्या हत्येच्या घटनेला १२ दिवस उलटुनही,अरोपी अजुन मोकाटच

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

15 + 7 =