Home ताज्या बातम्या ऐतिहासिक बुद्धविहार, देहूरोडचा विकास महाराष्ट्र शासनातर्फे व्हावा!त्या ठिकाणी शासकीय प्रशासक नेमावा-बोधीसत्व जन...

ऐतिहासिक बुद्धविहार, देहूरोडचा विकास महाराष्ट्र शासनातर्फे व्हावा!त्या ठिकाणी शासकीय प्रशासक नेमावा-बोधीसत्व जन जागृती संघ

63
0

देहुरोड,22 फेब्रुवारी 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ डिसें. १९५४ रोजी तथगत भगवान गौतम बुद्धांची मुर्तीची स्वहस्ते स्थापना संरक्षण मंत्रालयाच्या अधिकारात येत
असलेल्या जागेत देहूरोड, पुणे या ठिकाणी केली. त्यामुळे त्या बुद्धविहारास ऐतिहासीक जागतीक महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे दर वर्षी २५ डिसेंबर रोजी महाराष्ट्रातून व अन्य राज्यातून लाखो भावीक दर्शनासाठी येत असतात. याची गंभीर दखल घेवून महाराष्ट्र शासनाने या ऐतिहासिक बुद्धविहारास पर्यटन स्थळ म्हणुन घोषीत केले असुन यास ‘क’ दर्जा दिला आहे. परंतु त्या ठिकाणी १९५४ रोजी बुद्धविहार या ठिकाणी बुद्धविहार समिती, देहूरोड हि अस्तित्वात होती. काही कालांततराने त्या समितीचे रुपांतर बुद्धविहार ट्रस्ट देहूरोड (रजि नं.ए/११९७/पुणे) याच्यात झाले व ते काम पाहु लागले. बुद्धविहाराची जागा सरंक्षण विभागा कडुन मिळण्याकामी सदर समितीने अर्ज केला होता. परंतु त्या अर्जाचा पाठपुरवठा झाला नसल्याने ते प्रकरण थांबले गेले. अशा परिस्थीतीमध्ये सन १९९२ रोजी बुद्धविहार कृति समिती (रजि नं. ई/१५४६/पुणे) पत्ता आंबेडकर नगर, देहूरोड येथे स्थापना झाली. बुद्ध विहार कृती समितीचे अध्यक्ष श्री. टेक्सास उर्फ सिताराम भाऊसाहेब गायकवाड हे होते व ते संरक्षण विभाग पुणे येथे वरीष्ठ हुद्यावर नोकरीस होते.ऐतिहासिक बुद्धविहाराची जागा रक्षामंत्रालयाने देण्याचे ठरविल्याचे पत्र मंजुर झालेची माहिती टेक्सास उर्फ सिताराम गायकवाड यांना कळल्याने त्यांनी बुद्ध विहार समिती ऐवजी बुद्धविहार कृति समिती हिच खरी समिती असुन संरक्षण विभाग, पुणे यांची दिशाभूल करुन व फसवणुक करुन दि. १६ जाने. १९९६ रोजी स्टेशन हेडकॉटर देहूरोड ऑफीसर पुणे यांच्याकडुन खरेदीखत करुन घेतली आहे. त्यामुळे बौद्ध
समाजामध्ये बुद्धविहार कृति समिती बाबत चिड निर्माण झाली आहे. बुद्धविहार कृति समितीचे अध्यक्ष सिताराम उर्फ टेक्सास गायकवाड हे चांगल्या प्रकारचा कलाकार व नाटककार असुन त्यास ऐतिहासिक बुद्धविहाराच्या जागेत बुद्धविहार व स्तूप सोडून तेथे महाराष्ट्रातील भव्य असे एकमेव नाटक कलामंच त्या ठिकाणी उभे करण्याचे त्याचे प्रत्यत्न आहेत त्यामुळे त्या ठिकाणी बुद्धविहार ट्रस्ट, देहूरोड (रजि नं. ए/११९७ पुणे) हि असताना देखील त्या ट्रस्टचे काहीही म्हणणे टेक्सास गायकवाड ऐकायला तयार नाहीत. त्यामुळे या दोन्ही संस्थेमध्ये गेली अंदाजे २५ ते ३० वर्षे वाद सुरु आहेत व कोर्टकचेरीमध्ये तसेच देहूरोड पोलीस स्टेशन या ठिकाणी तेंव्हा पासुन आज पर्यंत रोज ऐक मेका विरुद्ध अर्ज,गुन्हे व तक्रारी दाखल आहेत. त्यामुळे ऐतिहासिक बुद्धविहाराचा विकास थांबला असुन त्यामुळे विकास होणे. शक्यच नाही. त्यामुळे बौद्ध समाजाच्या ४००० नागरिकांच्या सही साक्षी निशी बोद्धिसत्व जन जागृती संघ, देहूरोड पुणे (रजि नं. महा/रजि.नं. १७७२ / २०१९/पुणे)यांच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या दरबारी मा. जिल्हाधिकारी सो., पुणे. यांना दि. २०/१२/२०१९ रोजी तसेच महाराष्ट्र राज्याचे धर्मादाय आयुक्त मुंबई मा. श्री.स.ग.मेहरे साहेब तसेच महाराष्ट्र राज्याचे समाज कल्याण आयुक्त, पुणे यांना निवेदन देण्यात दिले आहे.

बोधीसत्व जन जागृती संघाच्या खालील मागण्या आहेत

१. ऐतिहासिक बुद्धविहार देहूरोड, पुणे या ठिकाणी तातडीने प्रशासकीय प्रशासक नेमावा.
२. ऐतिहासिक बुद्धविहाराचा विकास महाराष्ट्र शासनाच्या वतीने करण्यात यावा.ऐतिहासिक बद्धविहाराचा वर्धापन दिन २५ डिसेंबर रोजी असल्याने समाज कल्याण खाते पुणे यांच्या वतीने कायमस्वरुपी ५ लाख रुपये निधी राखून ठेवावा व समाज कल्याण खात्यातर्फे वर्धापन दिन साजरा करण्यात यावा.
४.ऐतिहासिक बुद्धविहार देहूरोड ही जागा संरक्षण मंत्रालय विभागाकडुन वर्गीकरण करुन महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण खात्याच्या नावे करुन घेण्यात यावी अशा बाबतची मागणी केली असुन या मागणीकडे ऐतिहासिक बुद्ध विहाराचे व मावळ मतदार संघाचे पालक आमदार या नात्याने लक्ष देवून मा. जिल्हाधिकारी, पुणे यांच्या सोबत या विषयावर बैठक घेवून या मागण्या मार्गी लावाव्यात व सर्वात प्रथम ऐतिहासिक बुद्धविहार या ठिकाणी चाललेला वाद त्वरीत थांबवण्या करिता, त्याठिकाणी शासकीय प्रशासक त्वरीत नेमण्यात यावा.
अशी मागणी आम्ही महाराष्ट्र शासनाकडे बोधीसत्व जन जागृती संघाने केली आहे व आमदार सुनिल शेळके या कडे निवेदन अर्जा द्वारे केली आहे.या वेळी बोधीसत्व जनजागृती संघाचे अध्यक्ष संगीता नानी अशोक वाघमारे,उपाध्यक्ष परशुराम दोडमणी,सचिव विजय पवार,सहसचिव महेश गायकवाड,कार्याध्यक्ष अशोक कांबळे,सदस्य अरिफ मुजावर,गणेश जावळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.अशी माहिती सचिव विजय पवार यांनी प्रजेचा विकासला दिली.

Previous articleबुद्धविहार कृती समितीचे सेलडिड रद्द करा व विशेष बांधकामाची परवानगी देऊ नका- बोधिसत्व जनजागृती संघाची मागणी
Next articleशरद पवारांचा स्वार्थी व अल्पसंख्यांक तुष्टीकरणाचा डाव-मिलिंद परांडे(विश्वहिंदू परिषद केंद्रीय महामंत्री)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

2 × 2 =