Home ताज्या बातम्या शरद पवारांचा स्वार्थी व अल्पसंख्यांक तुष्टीकरणाचा डाव-मिलिंद परांडे(विश्वहिंदू परिषद केंद्रीय महामंत्री)

शरद पवारांचा स्वार्थी व अल्पसंख्यांक तुष्टीकरणाचा डाव-मिलिंद परांडे(विश्वहिंदू परिषद केंद्रीय महामंत्री)

50
0

बजरंग दलाची अखिल भारतीय बैठक शुक्रवारी, शनिवारी चिंचवडमध्ये

सीएए विरोधात कायदा हातात घेणा-यांवर कायदेशीर कारवाई करावी-मिलिंद परांडे(विश्वहिंदू परिषद केंद्रीय महामंत्री)
पिंपरी,दि. 21 फेब्रुवारी 2020,(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- ‘सीएएच्या’ विरोधामध्ये जे अनेक हिंसक आंदोलने देशभर सुरु आहेत. त्या पाठीमागे काही अल्पसंख्यांक तुष्टीकरण करणाऱ्या काही राजनीतिक दल, साम्यवादी दल व शक्‍ती, पीएफआय सारखे हिंसक मुस्लीम संघटन आणि मुस्लीम समाजाच्या एका मोठ्या गटाचा हात स्पष्टपणे दिसतो आहे. जे तथाकथित अहिंसक आंदोलने सुरु आहेत. उदा. दिल्ली, चेन्नई, मुंबई ई. त्यामध्ये ज्याप्रकारे देशविरोधी, हिंदुविरोधी घोषणा व भाषणे सुरु आहेत त्यावरून देशविरोधी शक्‍ती सुद्‌धा त्यांच्या पाठीशी आहेत का असे वाटते. अश्या सर्व प्रकारच्या हिंसक व देशविरोधी आंदोलनांची विश्‍व हिंदू परिषद निंदा करते व कायदा हातात घेणाऱ्या व तोडणाऱ्या सर्वांवर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी करते, असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी पिंपरी येथे केले.
विश्व हिंदू परिषदेच्या वतीने शुक्रवारी (दि. 21) पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेस विश्व हिंदू परिषद, पश्चिम प्रांत अध्यक्ष पांडूरंग राऊत, पश्चिम महाराष्ट्र प्रांत मंत्री विजय देशपांडे, विभाग मंत्री नितीन वाटकर आदी उपस्थित होते. यावेळी मिलिंद परांडे यांनी बजरंग दलाची अखिल भारतीय बैठक उद्या शनिवार व रविवारी (दि. 22,23 फेब्रुवारी) चिंचवड येथे आयोजित करण्यात आली असल्याची घोषणा केली. विश्व हिंदू परिषदेने जे देशभर हितचिंतक अभियान केले आहे त्यामध्ये ३० लाखांपेक्षा ‘अधिक आणि विशेषतः महाराष्ट्रात ३ लाखांपेक्षा अधिक हिंदू विश्व हिंदू परिषदेशी जुळले आहेत. आज शिक्षण, स्वास्थ्य, आर्थिक स्वावलंबन, कौशल विकास, महिला सशक्तीकरण इत्यादी क्षेत्रामध्ये १ लाखांपेक्षा अधिक सेवा कार्य सुरु आहेत. महाराष्ट्रात सुद्धा या सेवा कार्याची वाढ करण्याची योजना बनली आहे. कार्य वाढीच्या व आगामी कार्ययोजना बनविण्यच्या दृष्टीने दरवर्षी विश्व हिंदू परिषदेच्या विविध कार्यविभागांची (आयामांची) केंद्रीय बैठक आयोजित केली जाते. अशीच बैठक चिंचवडमध्ये होणार आहे.

तसेच राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी लखनौ येथे मशिदीसाठीच्या न्यास निर्माणाचा जो विषय अनावश्यक समोर आणला आहे. यावरून नवीन – नवीन विवादाचे मुद्दे निर्माण करून समाजातील तेढ जाणीवपूर्वक कशी वाढेल असाच स्वार्थी व अल्पसंख्यांक तुष्टीकरण यांचा डाव वाटतो. सुप्रीम कोर्टामध्ये श्रीराम जन्मभूमीच्या ऐतिहासिक सत्याची प्रतिस्थापना झाल्यामुळे विश्व हिंदू परिषदेने संपूर्ण देशभर २५ मार्च २०२० वर्षप्रतीपदा ते ८ एप्रिल २०२० श्री हनुमान जयंतीपर्यंत भव्य रथायात्रांचे आयोजन करून किमान २ लाख स्थानांपर्यंत भव्य रामोत्सवाचे आयोजन करण्याचा निश्चय केला आहे. त्याचबरोबर “दिनांक १९ फेब्रुवारी २०२० रोजी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाची पहिली व महत्वाची ‘बैठक संपन्न झाली. प.पू. श्री नृत्यगोपालदासजी महाराज यांची विश्वस्त व न्यासाचे पहिले अध्यक्ष म्हणून तसेच श्री चंपतरायजी यांची विश्वस्त व महासचिव म्हणून व आपल्यां महाराष्ट्रातील प.पू. श्री गोविंददेव गिरीजी महाराज यांची कोषाध्यक्ष म्हणून नियुक्‍ती झाली. याबद्दल विश्व हिंदू परिषद आनंद व्यक्‍त करते. आंदोलनाच्या दरम्यान जे मंदिराचे प्रारूप बनले त्याच स्वरूपामध्ये व ज्या दगडांची घडाई मागील अनेक वर्षापासून अयोध्येमध्ये सुरु आहे त्यांचा उपयोग करूनच श्रीराम जन्मभूमी मंदिराचे निर्माण व्हावे. ही हिंदू समाजाची अपेक्षा आहे. ती हा नवनिर्मित न्यास पूर्ण करेल हा विश्‍वास वाटतो. आर्थिक संबंधी व अन्य जे महत्वाचे निर्णय प्रथम बैठकीतच या नवनिर्मित न्यासाने घेतले आहेत. या गतिशील कृतीबद्दल न्यासाचे अभिनंदन. त्यामुळे श्रीराम जन्मभूमी मंदिराचे निर्माण लवकरच सुरु होईल असा विश्‍वास वाटतो, असेही विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी पिंपरी येथे सांगितले.

Previous articleऐतिहासिक बुद्धविहार, देहूरोडचा विकास महाराष्ट्र शासनातर्फे व्हावा!त्या ठिकाणी शासकीय प्रशासक नेमावा-बोधीसत्व जन जागृती संघ
Next articleमंगळवारी भटक्या विमुक्त जाती जनजाती समाजाचा पिंपरीत क्रांतीमोर्चा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

five × four =