देहुरोड,दि.29 डिसेंबर 2019(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-ऐतिहासिक धम्मभूमि देहूरोड बुध्दविहार या ठिकाणी बुद्ध आजची साप्ताहिक वंदना चा कार्यक्रम पार पडला,भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमरावजी आंबेडकर साहेब यांच्या आदेश जपत दर रविवारी पुन्हा साप्ताहिक वंदना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला,आज दिनांक 29 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता बुद्ध वंदना चा कार्यक्रम पार पडला सदर कार्यक्रम साडेबारा वाजेपर्यंत चालला कारण या कार्यक्रमांमध्ये अनेक सूचना आणि नियोजन करण्यात आले दर रविवारी सकाळी 11.00 वाजता सर्वांनी कुटुंबासमवेत शुभ्र वस्त्र परिधान करून वंदनेस हजर राहण्याची सूचना सर्वानुमते यावेळेस देण्यात आली कोणत्याही पक्षाचे राजकीय,अराजकीय,संघटनेचे विचाराचे पायतान काढून सर्वांनी विहारात आत येऊन बसायचं आणि बुद्धांनी सांगितलेला धम्म, बाबासाहेबांनी सांगितलेले विचार यावर धम्मप्रवचन व लोकशाहीच्या विचारविनिमय करून सर्वांसाठी विहारात येण्याची गोडी व धम्माची आवड निर्माण व्हावी यासाठी काही प्रवचनाचे विषय देऊन जी उपस्थित राहतील त्यांनी तो विषय निवडायचा आणि त्यावरच बोलायचे 12 महिन्याचा रविवारचे विषय दिले जातील असा उपक्रम साप्ताहिक वंदनेचा घेण्यात येईल व बारा महिन्यातल्या पौर्णिमा साजरा करण्यात येतील, विहारांमध्ये जो पण येईल तो फक्त आणि फक्त उपासक असेल,विहारात येणार्या सर्वाची नोंद घेऊण प्रजेचा विकास या आॅनलाईन चॅनला बातमी स्वरुपात प्रसिद्ध करण्यात येईल हि अपडेट सर्वाना मिळेल, सर्वानी दर रविवारी विहारात यावे आणि ह्या ऐतिहासिक धम्मभूमीचे वातावरण दर रविवारी मंगलमय ठेवावे,व दर साप्ताहिक वंदनेला येणारे सर्वाचा ग्रुप फोटो घेण्यात येईल,असे अव्हान सर्वानुमते करण्यात आले,या वेळीविकास कडलक,सुमेध भोसले,संजय ओव्हाळ, सुनिल कडलक, दादू गायकवाड, अॅड. रुपवते,राजेश्री जाधव,भीमाताई तुळवे,रेखा सुधीर ढोकळे,शारदा ताई गायकवाड, अनुसया अशोक कांबळे,मंदाताई जाधव,मालन ताई पोपट बनसोडे, पोपट खंडोजी बनसोडे, यल्लेश शिवशरण, सुरेश भालेराव, संजय शेंडे,दिपक ताटे, श्रीरंग ओव्हाळ,किशोर कांबळे, काशिनाथ कांबळे,दिपक भालेराव, कुंडलिक खरात,गुलचंद बनसोडे, अरुण बनसोडे,अजय उकरडे,अमर भगत,परकाळे पी एस, सुतकर एम पी डी आर अमराले, अमर चौरे,किरण शिरसागर, अॅड.गुलाबराव चोपडे, रामचंद्र जगन्नाथ वजदे, सिद्धार्थ रामचंद्र माने,अंकुश कानडी, सविता सागर सोनवणे,प्रकाश सदाशिव ओव्हाळ, सुनील मनोहर तुरकर,गिरीश मोहन वाघमारे,राजा अवतार,राजू गायकवाड, प्रतीक कांबळे,प्रणव तरकसे, आदी उपासक-उपासिका या वंदनाच्या कार्यक्रमास उपस्थित होते
Home ताज्या बातम्या ऐतिहासिक धम्मभुमी देहुरोड बुद्धविहारातील साप्ताहिक बुद्धवंदना ट्रस्ट व समाजातील कार्यकर्त्या कडुन पुन्हा...