Home ताज्या बातम्या आमदार अण्णा बनसोडे यांनी जाणून घेतल्या नागरिकांच्या समस्या

आमदार अण्णा बनसोडे यांनी जाणून घेतल्या नागरिकांच्या समस्या

96
0

पिंपरी,दि.5 नोव्हेंबर 2019(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मला पिंपरी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी जवळपास 20 हजार मतांचे मताधिक्य दिले. माझा विजय हा लोकनेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली मागील कालावधीत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत झालेल्या विकास कामांचे फलित आहे. मला विजयी करण्यात आकुर्डी गावठाण व प्राधिकरण परिसरातील मतदारांचे महत्वपूर्ण योगदान आहे. ही बांधिलकी जपत चालू वर्षी मिळणा-या विधानसभा विकास निधीतून जास्तीत जास्त निधी प्रभाग क्र. 14 मधील विकासकामांसाठी देऊ असे, आमदार अण्णा बनसोडे यांनी सांगितले.
पिंपरी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार अण्णा बनसोडे यांनी सोमवारी (दि.4) आकुर्डी प्रभाग क्र. 14 मधील विविध सोसायटीतीतील पदाधिका-यांशी संवाद साधला. आकुर्डी येथे आयोजित केलेल्या या बैठकीत आमदार बनसोडे यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. अनेक सोसायटीतीतील नागरिकांनी त्यांना लेखी निवेदने दिली.
यावेळी नगरसेवक जावेद शेख यांच्यासह माजी नगरसेवक संदीप चिंचवडे, आण्णा कुराडे, प्रवीण पवार, सुभाष चौधरी, प्रकाश परदेशी, रमेश भोरकर, संभाजी सूर्यवंशी, संदीप माने, अशोक पाटील, विश्वनाथ मोरे, ज्ञानेश्वर ननावरे, वसंत सोनार, राजेशिर्के, संपत शिंदे, निखिल दळवी, विकी गोडसे, आबीद शेख, रुपेश जोशी, सुनील मोरे, जावेद पठाण, आरबाझ शेख, मुज्जू खान, दिलवर सय्यद, महेश पानकर, दिनेश जगताप, नानासाहेब पिसाळ, इखलास सय्यद आदी उपस्थित होते.
प्रभाग क्र. 14 मधील अनेक सोसायट्यांमध्ये अंतर्गत रस्ते, सीमा भिंत, ड्रेनेज लाईन, पावसाळी गटार लाईन, पेव्हींग ब्लॉक बसविणे अशी कामे अद्यापपर्यंत करण्यात आली नाहीत. तसेच अनेक सोसायट्यांमध्ये अनियमित पाणी पुरवठा व अनियमित विद्युत पुरवठा आणि सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्याची कामे प्रलंबित असल्याच्या तक्रारी नागरिकांनी या बैठकीत सांगितले. त्याबाबत लवकरच आपण वरील विषयाशी संबंधित असणा-या महानगरपालिकेतील अधिका-यांच्या बैठका घेऊन याबाबत निर्णय घेऊन संबंधित कामे मार्गी लावू, असे आमदार अण्णा बनसोडे यांनी सांगितले.
या बैठकीत निरुपम हौसिंग सोसायटी, साई पूजा बाग, मयुर समृद्धी, गंगा अपार्टमेंट, मोरया पद्‌मांकुर, भालचंद्र अपार्टमेंट, एन. डी. टॉवर, शुभश्री हौसिंग सोसायटी, सीता रेसिडेन्सी, शिवदत्त रेसिडेन्सी, भक्ती देसाई हाईट्‌स, सोनिगरा क्लासिक आदी एकूण 45 सोसायट्यातील नागरिक व पदाधिकारी उपस्थित होते.
स्वागत प्रास्ताविक करताना नगरसेवक जावेद शेख म्हणाले की, 2014ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार अण्णा बनसोडे पिंपरीचे प्रथम महापौर म्हणून निवडून आले. त्यानंतर पाच वर्षात त्यांनी पिंपरी विधानसभा मतदारसंघात सर्वसामान्य नागरिकांना उपयोगी पडतील अशी अनेक कामे केली. मागील पाच वर्षात नेतृत्वात बदल झाल्यामुळे अनेक कामे प्रलंबित होती. मतदारांनी पुन्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी व आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर विश्वास व्यक्त करीत त्यांना निवडून दिले. मतदारांनी दाखविलेला विश्वास आमदार बनसोडे निश्चितच सार्थ ठरवतील अशी ग्वाही नगरसेवक शेख यांनी दिली.
सुत्रसंचालन इखलास सय्यद, आभार नानासाहेब पिसाळ यांनी मानले.

Previous articleजगू आनंदे!मनाची मशागत – डॉ. दत्ता कोहिनकर
Next articleअज्ञात गुडांन कडुन बौद्ध धर्म गुरु भन्ते संघबोधी यांना जीवे मारण्याची धमकी!!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

4 × 5 =