Home ताज्या बातम्या अज्ञात गुडांन कडुन बौद्ध धर्म गुरु भन्ते संघबोधी यांना जीवे मारण्याची धमकी!!!

अज्ञात गुडांन कडुन बौद्ध धर्म गुरु भन्ते संघबोधी यांना जीवे मारण्याची धमकी!!!

58
0

पाषाण,दि.6 नोव्हेंबर 2019(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-
धम्माकुंर महाविहार पाषाण सुसखिंड रोड पुणे

येथे पुज्य भदंत संघबोधी हे वास्तव्यास आहेत,सदर त्याठिकाणी गेले 20 वर्षापासुन पंचधातुच्या 50 फुट बुद्धमुर्तीचे कामकाज चालु असुन त्या ठिकाणी आज दि.6 नोव्हेबंर 2019 रोजी सकाळी- 6.00 वा तीन तरुण बिअर पित धम्मांकुर विहाराच्या आवारात आले काही खाली ओमनी गाडीत बसुन राहिले,व ज्या ठिकाणी बुद्ध मुर्ती बसवणार आहेत तिथ जाऊन पंचशील धम्मध्वजाची तोडफोड करत धम्मध्वजाचा लोखंडी पाईप वाकवला ,ते दृश्य पाहुन भदंत संघबोधी त्या कडे धावले असता, त्या अज्ञात गुडांनी भन्तेजी सोबत धक्काबुक्की करत,जातीवाचक शिवीगाळ करुन,तु इथला मेन आहे,तु झेंडा का लावला काढुन टाक नाहीतर तुला मारुण टाकु अशी धमकी देत तुला बघुन घेऊ बोलत तेथुन पसार झाले.व भदंत संघबोधी यांनी विहाराच्या उपासकांना व काही सामाजीक कार्यकर्ते व नेते यांना कळवले असता सर्वजन विहारात जमा होऊन हिंजवडी पोलिस स्टेशन मध्ये जाऊन गुन्हा भादवि कलम ५०६ दाखल करण्यात आला,पुढील तपास हिजंवडी पोलिस स्टेशनचे पोलिस करत आहेत,वरिष्ठ पोलिस निरिक्षक यंशवत गवारी,व क्राईम पोलिस निरिक्षक अजय जोगदंड, पोलिस उपनिरीक्षक कविता रुपनर यांनी त्वरीत दखल घेतली,व पोलिस निरीक्षक गवारी यांनी आज पासुन पोलिस संरक्षण देण्यात येईल असे सांगितले,या वेळी श्रीमंत शिवशरण,अर्जुन शेळके,अरुण साकळे,विजय पंडीत,नादुलगावकर,पि.एस मिलारकर,स.तु.सुरवसे,नंदु सवाई,रमेश चिमुरकर,अरुण आहिरे,राहुल दहिरे,प्रमोद गरड,परमेश्वर कांबळे,पञकार नाना गायकवाड,संपादक-विकास कडलक,सरपंच राजेंद्र भोसले आदी.उपस्थित होते.अधिक माहिती साठी- पुंज्य भंदत संघबोधी महास्थविर, मो.8375045385

Previous articleआमदार अण्णा बनसोडे यांनी जाणून घेतल्या नागरिकांच्या समस्या
Next articleअनुसूचित जातीच्या आरक्षणात अ, ब, क, ड या चार प्रवर्ग निर्मितीसाठी सर्वोच्च न्यायालयाचा महिन्याभरात निर्णय अपेक्षित-माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

four × 1 =