Home पिंपरी-चिंचवड रिपब्लिकन पक्षाला विश्वासात घेऊनच वाटचाल करणार – आमदार चाबुकस्वार

रिपब्लिकन पक्षाला विश्वासात घेऊनच वाटचाल करणार – आमदार चाबुकस्वार

87
0


    
पिंपरी,दि 8 आॅक्टोबंर 2019(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- माझे सारे आयुष्यच दलित चळवळीत गेले असून आपल्या समाजाच्या, प्रगतीचे आणि विकासाचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी मी कटीबद्ध असून रिपब्लिकन पक्षाला विश्वासात घेऊनच माझी वाटचाल राहणार असल्याची भावना पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना-भाजप-आरपीआय महायुतीचे उमेदवार आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांनी आज येथे व्यक्त केली.

     रिपब्लिकन पक्ष (आठवले) पिंपरी चिंचवड शहरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक आज पिंपरी येथे आयोजित करण्यात आली होती. शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस चंद्रकांता सोनकांबळे यांच्यासह रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी मोठया संख्येने यावेळी उपस्थित होते.

     याप्रसंगी सर्व कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करून मोठया मताधिक्याने चाबुकस्वार यांना विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला. आपल्या भाषणात चंद्रकांता सोनकांबळे यांनी म्हटले की, कार्यकर्त्यांनी बळ व ताकद देण्याचे काम आमदारांनी करावे तसेच आपण महायुतीचे आमदार होणार असल्याने सत्तेच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या प्रत्येक बाबींमध्ये समान संधी रिपब्लिकन कार्यकर्त्यांना मिळावी असे नमूद केले.

यावेळी के. एम. बुक्तर (उपाध्यक्ष, प.महा.), रमेश चिमूरकर (सचिव, प.महा.), सम्राट जकाते (उपाध्यक्ष, प.महा.), सुधाकर वारभुवन (सचिव, प.महा.), कमलताई कांबळे (अध्यक्षा, महिला आघाडी, पिं. चिं), अल्ताफभाई शेख (अध्यक्ष, अल्पसंख्यांक आघाडी), अजीजभाई शेख (अध्यक्ष, वाहतूक आघाडी, आरपीआय), प्रणव ओव्हाळ (अध्यक्ष, युवक आघाडी, पिं.चिं.), दत्ता ठाणांबीर (सरचिटणीस, युवक आघाडी, पिं.चिं.), बाळासाहेब रोकडे (युवा नेते), सिकंदर सुर्यवंशी (युवा नेते), केतन कांबळे (अध्यक्ष, पिंपरी विधानसभा), अजय झुंबरे, लिंबराज कांबळे, भारत बनसोडे, भाऊसाहेब रोकडे, दयानंद वाघमारे, प्रमोद वाघमेतर व सर्व नेते पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. 

Previous articleभारतात प्रथमच चिंचवडला..! अमिताभ बच्चन यांच्या अक्षरमुद्रणातून रेखाटलेल्या ७७ छायाचित्रांचे भव्य प्रदर्शन
Next articleभोसरीची “दादा”गिरी संपवून भय व भ्रष्टाचारमुक्त मतदारसंघासाठी विलास लांडेंना पाठिंबा; निगडीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रुपचा निर्णय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

eight + two =