Home ताज्या बातम्या भारतात प्रथमच चिंचवडला..! अमिताभ बच्चन यांच्या अक्षरमुद्रणातून रेखाटलेल्या ७७ छायाचित्रांचे भव्य...

भारतात प्रथमच चिंचवडला..! अमिताभ बच्चन यांच्या अक्षरमुद्रणातून रेखाटलेल्या ७७ छायाचित्रांचे भव्य प्रदर्शन

87
0

पिंपरी,दि.११आॅक्टोबंर २०१९(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- महानायक अमिताभ बच्चन यांच्या ७७ व्या वाढदिवसानिमित्त अंशुल क्रिएशनच्या वतीने अक्षरमुद्रणातून चितारलेल्या त्यांच्या ७७ छायाचित्रांचे प्रदर्शन शुक्रवार ( ता.११)पासून भारतात प्रथमच चिंचवड येथे भरत आहे.
११ आॅक्टोबर या अमिताभ बच्चन यांच्या वाढदिनाचे औचित्य साधून या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून येथील रामकृष्ण मोरे कलादालनात १४ आॅक्टोबर पर्यंत हे प्रदर्शन सर्वांना विनामूल्य पाहता येणार आहे.चिंचवड येथील श्रृती गणेश गावडे या तरुणीने अक्षरमुद्रणातून( Typographic illustration) हि सारी छायाचित्रे रेखाटली आहेत.
अमिताभ यांच्या गाजलेल्या पिक्चरांची नावे सुक्ष्म अक्षरात लिहून ही सारी चित्रे तिने काढली आहेत.अंशुल क्रिएशनचे विजय जगताप यांनी या प्रदर्शनाच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला आहे

Previous articleसुनील शेळके यांनी केला भाजपा विरोधात यल्गार
Next articleरिपब्लिकन पक्षाला विश्वासात घेऊनच वाटचाल करणार – आमदार चाबुकस्वार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

1 + nine =