Home ताज्या बातम्या राष्र्टवादीला आणखी एक मोठा धक्का माजी आमदार आण्णा बनसोडे शुक़वारी भरणार अपक्ष...

राष्र्टवादीला आणखी एक मोठा धक्का माजी आमदार आण्णा बनसोडे शुक़वारी भरणार अपक्ष अर्ज

153
0

पिंपरी,दि.3 ऑक्टोबर 2019(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- पिंपरी राखीव मतदारसंघातून उद्या (शुक्रवारी) हजारो समर्थकांसह अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे पिंपरीचे प्रथम आमदार आण्णा दादू बनसोडे यांनी जाहिर केले. चिंचवड स्टेशन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, मागील विधानसभा निवडणुकीत मी अवघ्या दोन हजार मतांनी पराभूत झालो होतो. त्यानंतर देखील सलग पाच वर्ष मी मतदारांशी संपर्कात राहून माझे काम सुरु ठेवले आहे. या निवडणुकीत देखील मला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची उमेदवारी मिळण्याची खात्री होती. परंतू, मला का डावलले? याबाबत मीच स्वत: चकीत झालो आहे. ‘माझे काय चुकले’ हाच प्रश्न मी राष्ट्रवादीच्या पक्षनेतृत्वास विचारत आहे, असे माजी आमदार आण्णा बनसोडे यांनी सांगितले.
शुक्रवारी सकाळी 10 वाजता आकुर्डी खंडोबामाळ चौकातून आपल्या हजारो समर्थकांसह अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्यास जाणार आहे. लोकसभा निवडणुकीत मी पार्थ पवारांचे काम प्रामाणिकपणे केले होते. त्याचे बक्षीस म्हणूनच मला डावलले काय? असे वाटते. या विधानसभा निवडणुकीत माझ्याबरोबर पक्षातील व विरोधी पक्षातीलही अनेक नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदार आहेत. त्यांच्या पाठींब्यावरच मी निवडणुकीस उभा राहत आहे. आपण माघार घेणार नाही ना? असे विचारले असता समजावण्याची वेळ आता गेली आहे. मी अर्ज भरणार आहे, कोण सक्षम हे कळेलच. मी अजूनही ग्रासरूटलाच काम करीत आहे. मला शंभर टक्के विजयाची खात्री आहे. आपल्याबरोबर किती नगरसेवक आहेत असे विचारले असता, ते उद्या तुम्हाला रॅलीत दिसेल, असेही आण्णा बनसोडे म्हणाले.

Previous articleराष्र्टवादीला मोठा धक्का;शेखर ओव्हाळ पिंपरी विधानसभे मधुन लढणार अपक्ष
Next articleवंचीत बहुजन आघाडीचे इच्छुक उमेदवार असलेले दिपक जगताप शुक्रवारी भरणार अपक्ष अर्ज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

4 × two =