Home ताज्या बातम्या जावेद शेख यांनी राजकीय गुरु आझामभाई पानसरे यांचा निवडणुकपुर्व घेतला अर्शिवाद

जावेद शेख यांनी राजकीय गुरु आझामभाई पानसरे यांचा निवडणुकपुर्व घेतला अर्शिवाद

90
0

चिंचवड,दि.१३ सप्टेबंर २०१९(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी): – पिंपरी चिंचवड शहरातील चिंचवड विधानसभेतून ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन पार्टी म्हणजेच AIMIM कडुन इच्छुक उमेदवार जावेद शेख यांनी पिंपरी चिंचवड शहराचे राजकारणातील सर्वासर्व मानले जाणारे जेष्ठ नेते आझम भाई पानसरे यांची घेतली भेट चिंचवड विधानसभा लढविण्याबाबत सांगितले.आझाम भाई पानसरे यांच्याशी चर्चा करताना त्यांनी सकारात्मक चर्चेतून प्रतिसाद देऊन जावेद शेख यांना चिंचवड विधानसभेतून निवडणूक लढवण्यासाठी जेष्ठ नेते आझम भाई पानसरे यांनी आशीर्वाद दिले,व चिंचवड मध्ये बदल घडेल असे सांगितले
आझामभाई पानसरे यांच्या सोबत चर्चा करुन चिंचवड विधानसभेची रणनिती आखली,चिंचवड विधानसभा हि अनेक दिग्गजांना जड जाणारी विधानसभा आहे,लक्ष्मण जगताप हे मागील आणि आत्ताचे आमदार आहेत आणि त्यांना हरवणे सध्यातरी शक्य नाही,व त्यातच ह्या पहिल्यादांच AIMIM पक्षाकडुन जावेद शेख मैदान उतरत आहेत,त्यामुळे मुस्लिम मतदान शेख घेणारच व त्यासोब मागास मत पण घेणार असा आत्मविश्वास शेख यांनी दाखवला असुन,त्यांना AIMIM पक्ष जावेद शेख यांच्यावर चिंचवड विधानसभेची जबाबदारी टाकतील का व टिकीट त्यांच्या पारड्यात पडेल का या कडे सर्वाचे लक्ष असुन चिंचवड विधानसभेत नक्कीच जावेद शेख यांच्या मुळे बदल पाहिला मिळेल.

Previous articleदर्यापुर मतदारसंघात सावळे विरूध्द सावळे निवडणुक रिंगणात
Next articleराष्ट्रवादीचे छ.उदयनराजे भोसले यांचा भाजपमध्ये प्रवेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

eight + fifteen =