Home अमरावती दर्यापुर मतदारसंघात सावळे विरूध्द सावळे निवडणुक रिंगणात

दर्यापुर मतदारसंघात सावळे विरूध्द सावळे निवडणुक रिंगणात

34
0

दर्यापुर,( प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी अमरावती-सतीश वानखेडे ):- महाराष्र्टात विधानसभा निवडणुकांच्या चर्चा राज्यभर आता रंगु लागल्या आहेत, याच चर्चेच्या उधानात अनेक इच्छुकांची नावे समोर येत आहेत, विविध पक्षाकडून उमेदवारी मिळविण्यासाठी अनेक दिग्गज प्रयत्न करतांना दिसत आहेत, कोणत्या मतदारसंघात कुणाची वर्णी लागेल तो येणारा काळच सांगेल.
असे असले तरी दर्यापुर मतदारसंघातली निवडणुक मात्र एक चर्चेचा विषय बनणार आहे.
त्यालाही कारणही तसेच आहे,कारण मेट्रो सिटी समजण्यात येणा-या पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक ८,इंद्रायणी नगर भोसरी मधुन निवडून आलेल्या विद्यमान नगरसेविका सिमा रविंद्र सावळे या ता.दर्यापुर मतदारसंघ जिल्हा अमरावती येथून भाजपच्या तिकिटावर निवडणुक लढण्याचा दाट शक्यता आहे.
परंतु त्यांच्याविरोधात त्यांचेच पती रविंद्र लक्ष्मण सावळे हे ही निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे त्यांचेच पती रविंद्र सावळे यांनी प्रजेचा विकास शी बोलतांना सांगितले.
पुढे बोलतांना त्यांनी सांगितले की सिमा सावळे यांचे पिंपरीत प्राबल्य असतांना आता त्या माझ्या नावावर दर्यापुर मतदारसंघातून निवडणुक का लढत आहेत व आम्ही दोघेही दोघांच्या सहमतीने विभक्त झाले असताना सरास माझ्या नावाचा वापर का करतात असा प्रश्न उपस्थित करून त्याबद्दल शंकाही उपस्थित केली.माझ्याच स्वत:च्या गावातुन निवडणुक लढवुन माझ्या नावाचा व अडनावाचा वापर करून निवडून येण्याचे षडयंत्र दिसुन येत असून ते मी हाणुन पाडणार आहे व मी ही दर्यापुर मतदारसंघातून सिमा सावळेच्या विरोधात निवडणुक लढणार असल्याचेही रविंद्र सावळे यांनी म्हटले.त्यामुळे ही निवडणुक सावळे विरूध्द सावळे अशी रंगणार का हा एक चर्चेचा विषय ठरणार असुन,दर्यापुर मतदार संघात रविंद्र सावळेनी कंबर खचली असुन भेटीगाटीनां सुरवात केली.

Previous articleपिंपरी विधानसभेची जागा सोडण्यासीठी उद्धव ठाकरेना आर.पी.आय(A)पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने पञ
Next articleजावेद शेख यांनी राजकीय गुरु आझामभाई पानसरे यांचा निवडणुकपुर्व घेतला अर्शिवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

3 × two =