मुंबई दि.८ सप्टेबंर २०१९(प्रजेचा विकास न्युज प्रतिनीधी):-आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेना महायुती चे सरकार निवडून येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. या विधानसभा निवडणुकित रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार निश्चित निवडून येतील असा विश्वासाचा शब्द महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्द फडणवीस यांनी रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेश च्या कार्यकर्ता मेळाव्यात दिला. भाजप सेनेचे सरकार आले तर संविधान बदलणार आरक्षण हटवणार असा विरोधी पक्ष आरोप करीत असतो त्यांना सांगा आता या आरोपाची टेप जुनि झाली. संविधान हे आमचे गीता बायबल कुराण आहे.आता संविधान कोणी बदलू शकत नाही;एस सी एस टीचे आरक्षण कोणी बदलू शकत नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. रामदास आठवलें सारखे नेते महायुती सोबत असताना जन्मात कोणी आरक्षण बदलण्याचा विचार करू शकत नाही . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधानाची शपथ घेऊन कामकाज सुरू केले आहे. त्यामुळे कोणीही कधीही संविधान बदलणार नाही आणि आरक्षण हटविणार नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ववरळी येथील एस एस सी आय च्या डोम हॉल मध्ये रिपाइं च्या मुंबई प्रदेश च्या मेळाव्यात मुख्यमंत्री बोलत होते.यावेळी विचरामंचावर राज्याचे कॅबिनेट मंत्री महादेव जानकर;ना .सुरेश खाडे;राज्यमंत्री अविनाश महातेकर; खासदार राहुल शेवाळे; सौ सिमाताई आठवले; पूज्य भन्ते राहुल बोधी गौतम सोनवणे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
कलम 370 जेंव्हा संविधानात समाविष्ट करायचे होते तेंव्हा महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला विरोध केला होता. आता 70 वर्षांनी कलम 370 रद्द केल्या मुळे त्या काळात या 370 कलम ला डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी जो विरोध केला होता त्या विरोधाला न्याय मिळाला आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. इंदूमिल ची जमीन महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला देण्यास काँग्रेस सरकार ने चालढकल करीत खोटी कारणे दिली मात्र पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी केवळ 3 दिवसांत इंदूमिल ची जमीन महामानवाच्या स्मारकाला हस्तांतरीत केली. येत्या डिसेंबर 2020 पर्यंत इंदूमिल मध्ये महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक पूर्ण होईल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.मुंबईत प्रवेश करताच महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा दिसेल असे भव्य स्मारक उभारू असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.संविधानानुसार राज्य कारभार करीत असून शेवटच्या माणसाला न्याय देण्यासाठी राज्यात समतेचे राज्य निर्माण करायचे आहे. ना . रामदास आठवले हे फक्त रिपाइं चे किंवा एका गटाचे नेते नसून सम्पूर्ण देशाचे नेते आहेत. दूरदृष्टी असणारे सर्वांना सोबत घेऊन सर्वांना न्याय देण्याची विशाल दृष्टी असणारे नेते आहेत असा गौरव मुख्यमंत्र्यानी रामदास आठवले यांचा केला.
काँग्रेस आघाडी सरकार बजेट मध्ये अनुसूचित जाती जमाती चा निधी दाखवत होते. मात्र प्रत्यक्ष खर्च केले जात नव्हते. अनुसूचित जाती जमाती चे बजेट अन्य खात्यांना; सिंचनाला वळविले जात होते. आमचे महायुती सरकार अनुसूचित जाती जमातीचा बजेट मधील निधी एक ही रुपया अन्य ठिकाणी वळविणार नाही तसेच खर्च न झालेला निधी पुढील वर्षी खर्च केला जाऊ शकेल असा कायदा आम्ही केला आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.
येत्या विधानसभा निकडणुकीत रिपब्लिकन पक्ष भाजप शिवसेना सोबत राहील. सेना भाजप ने एकत्र राहावे ही माझी ईच्छा आहे. रिपाइं ला 10 जागा मिळाव्यात ही मागणी रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष ना रामदास आठवलेंनी यावेळी केली.भाजप शिवसेना रिपाइं महायुती एकत्र लढल्यास विधानसभा निवडणुकित महायुती ला 240 जागा जिंकता येतील असा विश्वास ना आठवलेंनी व्यक्त केला.
प्रमोशन मध्ये रिझर्वेशन चा कायदा महाराष्ट्र सरकारने करावा अशी मागणी आठवलेंनी केली. जम्मू काश्मीर मध्ये उद्योगपतींनी उद्योग उभारावेत. सरकार ने नदी जोड प्रकल्प राबविल्यास महापूर आणि दुष्काळ दूर होऊन महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल असे ना रामदास आठवले म्हणाले. यावेळी रिपाइं चे अनेक मान्यवर नेते उपस्थित होते.
प्रचंड पाऊस असूनही मुंबईतील रिपाइं चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मेळाव्यास उपस्थित होते.
Home ताज्या बातम्या विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार निश्चित निवडून आणणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस