Home ताज्या बातम्या कोेकणी युवकांनी शिक्षणाबरोबर उद्योग व्यवसायात प्रगती करावी- अशोक कदम

कोेकणी युवकांनी शिक्षणाबरोबर उद्योग व्यवसायात प्रगती करावी- अशोक कदम

71
0


पिंपरी,दि.२९ आॅगस्ट २०१९(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी) – कोकणी युवकांनी आता उच्च शिक्षणाकडे आपले ध्येय केंद्रित करावे परंतु त्याच बरोबर नोकरीच्या मागे न लागता उद्योग व्यवसायामध्ये आपली प्रगती करावी. असे मत कोकण खेड तालुका अठरागांव संस्थेचे अध्यक्ष अशोक कदम यांनी मांडले. अठरागांव संस्थेच्या मेळाव्यात बोलत होते.     कोकण खेड तालुका अठरागांव संस्थेचा स्नेहमेळावा नुकताच संततुकारामनगर येथील आचार्य आत्रे सभागृहात उत्साहात संपन्न झाले. त्यावेळी तो बोलत होते. यावेळी संस्थेचे सचिव अनंत कदम, पशुसंवर्धन खसत्याचे डेप्युटी डायरेक्टर देवेंद्र जाधव, सुरेश जाधव, पांडूरंग कदम, कॅप्टन श्रीपत कदम, मनोहर यादव, वैजयंती कदम, राजेश्री यादव तसेच संस्थेच पदाधिकारी व कोेकण खेड तालुका अठरागांवचे रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थिती होते.     यावेळी बोलताना कदम म्हणाले की, कोकणी युवकांने उच्च शिक्षण घेतले पाहिजे. आज कोकणात देखिल उच्च शिक्षणाच्या अनेक सोयी सुविधा निर्माण झाल्या आहेत. तसेच आज कोकणातील युवक उच्च पदापर्यंत पोहचला आहे. याचे अभिमान वाटते. त्यांचीच प्रेरणा घेऊन आजच्या पीढीने शिक्षणात प्रगती करावी. तसेच शिक्षणाबरोबरच उद्योगामध्ये देखिल आपली प्रगती करावी असे मत त्यांनी यावेळी मांडले.     कार्यक्रमाच्या सुरूवातीला महिलांचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. तसेच दहावी, बारावी तसेच महाविद्यालयीन परिक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.     यावेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविक अनंत कदम यांनी केले. सुत्रसंचालन प्रदिप जंगम व सौ. रेशमा चव्हाण यांनी केले.

Previous articleभोसरी विधान सभेत वंचीत कडुन मुस्लिम युवा चेहर्‍याला संधी मिळणार
Next articleखेड्यांच्या विकासातून देशाच्या विकासाला हातभार लाभेल : राज्यपाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

4 + eight =