Home ताज्या बातम्या भोसरी विधान सभेत वंचीत कडुन मुस्लिम युवा चेहर्‍याला संधी मिळणार

भोसरी विधान सभेत वंचीत कडुन मुस्लिम युवा चेहर्‍याला संधी मिळणार

40
0

भोसरी,दि.२९आॅगस्ट २०१९(प्रजेचा विकास न्युज प्रतिनीधी):-भोसरी विधानसभेत अनेक दिग्गज नेते व गाववाल्यांची मक्तेदारी असणारे सर्व नेते त्यांच्या गोंधळातच असतात.व नवीन मुस्लिम चेहरा येत असुन वंचीत बहुजन आघाडी भोसरी विधान सभेत बद्दल घडवणार हे चिञ दिसत आहे,मुख्यमंञी मिडियाशी बोलताना म्हटले होते की भाजपा विरुद्ध वंचीत बहुजन अघाडी असा सामना होईल,भोसरी विधानसभेत ही तसेच चिञ दिसत आहे,भोसरी विधान सभा मध्ये एच ए ग्रांऊण्ड वर अॅड बाळासाहेब आंबेडकर बोले होते पिंपरी चिंचवड शहरातील भोसरीतील मक्तेदारांची मक्तेदारी मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही,त्यामुळे नविन युवा मुस्लिम चेहरा उद्योजक शहानवाज जब्बार शेख यांना वंचीत बहुजन आघाडीतुन रिंगणात उतरवण्यात येणार आहे अशी चर्चा कार्यकर्त्यान मध्ये आहे,शहनवाज शेख यांची चांगला वक्ता,सभ्य चेहरा व सामाजीक नेता अशी ओळख आहे,निगडी भोसरी परिसरात मुस्लिम व मागासवर्गाची लोकसंख्या आहे,मुस्लिम मतदान शहानवाज शेख घेतीलच पण मागासवर्गाचे ही मतदान घेतील,शहानवाज शेख हे पिंपरी चिंचवड परिसरातील उद्योजक असुन त्यांची व्यापारी संघाशी ही चांगलेच मिळते जुळते आहे.त्यामुळे वंचीत बहुजन आघाडी ला नक्कीच फायदा होईल व शहानवाज शेख हे बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वातच काम करतील,पक्ष श्रेष्ठींच्या आदेशाची वाट पहात आहेत,व मतदार संघात भेटीगाठी चालुच आहे पण पक्ष श्रेष्ठींचा आदेश येताच,प्रचाराचा नारळ फोडुन प्रचार कार्याचा वेग वाढवतील.भारिप व एम आय एम सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी त्यांचे सातत्य आहे,जनतेच्या सेवे साठी मुस्लिम समाज हमेशा पुढे उभा असुन,भोसरीतुन ही मुस्लिम चेहरा बाहेर येत आहे

Previous articleराष्ष्ट्रवादीकडून शेखर ओव्हाळ यांची पिंपरी विधानसभेसाठी उमेदवारी निश्चित! अजित पवार आणि जयंत पाटलांकडून ग्रीन सिग्नल
Next articleकोेकणी युवकांनी शिक्षणाबरोबर उद्योग व्यवसायात प्रगती करावी- अशोक कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

1 × 4 =