Home ताज्या बातम्या राष्ष्ट्रवादीकडून शेखर ओव्हाळ यांची पिंपरी विधानसभेसाठी उमेदवारी निश्चित! अजित पवार आणि जयंत...

राष्ष्ट्रवादीकडून शेखर ओव्हाळ यांची पिंपरी विधानसभेसाठी उमेदवारी निश्चित! अजित पवार आणि जयंत पाटलांकडून ग्रीन सिग्नल

63
0

पिंपरी,दि.२९ आॅगस्ट २०१९(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी)अजित पवार आणि जयंत पाटलांकडून ग्रीन सिग्नल
राष्ष्ट्रवादीकडून शेखर ओव्हाळ यांची पिंपरी विधानसभेसाठी उमेदवारी निश्चित!
राष्ट्रवादीच्या नगरसेवकांकडून ओव्हाळ यांच्या नावाचा आग्रह; 
 पिंपरी विधानसभा मतदार संघात आपल्या धडाडीच्या विकासकामांमुळे चर्चेत आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते शेखर ओव्हाळ यांची विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी निश्चित झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी- चिंचवडमधील नगरसेवकांनी पिंपरीसाठी ओव्हाळ यांच्या नावाचा आग्रह धरल्यामुळे तसेच पक्षनिष्ठा, प्रचारात घेतलेली आघाडी, सामाजिक कार्याची तळमळ, युवावर्गात लोकप्रिय ठरलेल्या शेखर ओव्हाळ यांचा सर्वबाजूंनी विचार करून ज्येष्ठ नेते अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून ग्रीन सिग्नल मिळाला असून ओव्हाळ यांना निवडणुकीच्या दृष्टीने कामाला लागणण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सातारा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित शिवसुराज्य यात्रेचा समारोप आज (गुरुवार) सातारा येथे झाला. तत्पूर्वी शहरातील राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकारी व नगरसेवकांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व खासदार अमोल कोल्हे यांची भेट घेऊन ओव्हाळ यांच्या उमेदवारीबाबत चर्चा केली. याप्रसंगी पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते नाना काटे, नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, राजू मिसाळ, जावेद शेख, प्रभाकर वाघेरे, प्रशांत शितोळे, प्रसाद शेट्टी, शाम लांडे, रोहितअप्पा काटे, राजू बनसोडे यांच्यासह पक्षाचे पिंपरीतील अन्य नगरसेवक तसेच वरिष्ठ पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. या सर्व मंडळींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसेच स्टार प्रचारक खा. अमोल कोल्हे यांची भेट घेऊन शेखर ओव्हाळ यांना पिंपरी मतदारसंघासाठी उमेदवारी देण्याचा आग्रह धरला. शेखर ओव्हाळ यांची पक्षनिष्ठा, विजयी होण्याची पात्रता, तरुण आणि धडाडीचे नेतृत्व, इतरांपेक्षा प्रचारात घेतलेली आघाडी, विकासाचा दृष्टीकोण, सामाजिक कार्य, सर्वाना सोबत घेउन काम करण्याची हातोटी या बाबी लक्षात घेऊन तसेच मतदारसंघातील तरुणांचे, ज्येष्ठांचे तसेच महिला वर्गाचे ओव्हाळ यांना मिळत असलेले पाठबळ या सर्वच बाबींचा विचार करून ओव्हाळ यांच्या नावावर उमेदवारीसाठी शिक्कामोर्तब करण्यात आले. तसेच विधानसभेच्या दृष्टीकोनातून कामाला लागण्याच्या सूचनाही वरिष्ठांकडून करण्यात आल्या.
शेखर ओव्हाळ यांच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेसला एक सक्षम आणि संवेदनशील आणि विजयाची खात्री असणारा उमेदवार लाभणार असल्यामुळे पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
फोटो-शेखर ओव्हाळ यांनी यावेळीही आपली संवेदनशीलता दाखविली असून कोल्हापूर येथील पुरग्रस्तांसाठी 1 लाख रुपयांचा धनादेश राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खा. अमोल कोल्हे यांच्याकडे सुपूर्द केला. याप्रसंगी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अमोल मिटकरी, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, आ. शशिकांत शिंदे, आ. मकरंद पाटील उपस्थित होते. यापूर्वीही अनेकवेळा ओव्हाळ यांनी पूरग्रस्तांसाठी विविध प्रकारची मदत पाठविली आहे. 

शेखर ओव्हाळ यांनी यावेळीही आपली संवेदनशीलता दाखविली असून कोल्हापूर येथील पुरग्रस्तांसाठी 1 लाख रुपयांचा धनादेश राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खा. अमोल कोल्हे यांच्याकडे सुपूर्द केला.
Previous articleबायकोचा खुन करुन,नवर्‍याची आत्महत्या
Next articleभोसरी विधान सभेत वंचीत कडुन मुस्लिम युवा चेहर्‍याला संधी मिळणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

thirteen + 2 =