Home ताज्या बातम्या खेळाडूंनी व्यसनापासून दूर रहावे; शेखर ओव्हाळ याचे मत राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त...

खेळाडूंनी व्यसनापासून दूर रहावे; शेखर ओव्हाळ याचे मत राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त प्रशिक्षक, क्रीडा संघटक आणि पंच यांचा गौरव

44
0

पिंपरी, दि.27आॅगस्ट 2019(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- खेळांमध्ये जात-धर्म पाहिला जात नाही. त्यामुळे आपल्या देशात सर्वच खेळासह हॉकीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. विद्यार्थी व शिक्षकांनी शिक्षणासोबत खेळाला महत्व दिले पाहिजे. यश प्राप्त करण्यासाठी खेळाडूंनी सर्व प्रकाराच्या व्यसनापासून दूर रहावे, असे मत पिंपरी विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रबळ दावेदा शेखर ओव्हाळ यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त प्राधिकरण, निगडीत झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमात पुणे मुष्टियुद्ध असोसिएनचे मदन कोठुळे, आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध प्रशिक्षक अजितसिंग कोचर तसेच, सचिन शिंगोटे, नेहा बारकुल, प्रभूदेवा मुन्नस्वामी, गणेश देवकुळे, अपूर्वा कळमकर, वैशाली चिपलपट्टी, जानवी बारावकर, कुस्तीपटू अभिषेक फुगे यांचा गौरव करण्यात आला. या वेळी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस अजितसिंग कोचर व मदन कोठुळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
शेखर ओव्हाळ म्हणाले की, भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी वाढीसाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. शाळा व महाविद्यालयात हॉकी खेळ सक्तीचा करून त्यांचे प्रशिक्षण दिले पाहिजे. हॉकी खेळासाठी चांगले प्रशिक्षक व सुविधा पुरविली जावे. या हेतूनेच शहरातील सर्व राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव करून त्यांचा अनुभवाचा लाभ शहरातील नवोदित खेळाडूंना मिळवून दिला जाणार आहे. शेखर ओव्हाळ यांच्या हस्ते या मान्यवरांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

Previous articleअवाजाचे स्वर भाषा महाराष्र्टाचे सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे याच्या तवेरा गाडीचा अपघात,तवेरा गाडीने डंपरला दिली धडक
Next articleभाजपा चे शिवाजीनगर विधानसभा अध्यक्ष यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

three + 1 =