Home ताज्या बातम्या भिमातीर भागांतील खडणीखोरांशी माझा काही संबंध नाही:-भागप्पा अण्णा हरिजन

भिमातीर भागांतील खडणीखोरांशी माझा काही संबंध नाही:-भागप्पा अण्णा हरिजन

53
0

सोलापूर/ विजापूर,दि.२५ आॅगस्ट२०१९(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- भिमातीर भागातील खंडणीखोरांशी माझा कसलाही संबंध नाही असे स्पष्टीकरण भागप्पा अण्णा हरिजन यांनी विजापूर येथे प्रस्तुत प्रतिनिधी शी बोलतांना दिले आहे. संपुर्ण कर्नाटक राज्यात व विजापूर जिल्ह्यात नाव लौकिक असलेले व चर्चेत असलेले दलित व बहुजन चळवळीत सक्रिय असणारे व अन्याय अत्याचारविरुद्ध लढा देणारे व प्रत्येक समाजासाठी झटणारे आणि गोरगरिबांच्या कल्याणासाठी अहोरात्र परिश्रम घेणारे मा.भागप्पाअण्णा हरिजन यांच्या नावाचा दुरुपयोग करून व गैरफायदा घेत विजापूर जिल्ह्यातील काही हरामखोर व चुटूरफुटूर व समाजकंटक लोक काही प्रतिष्टीत व व्यापारी उद्योजक व सदण शेतकरी आणि राजकीय व्यक्तींना नाहक त्रास देऊन व त्यांना धमकी देऊन त्यांच्याकडून मी भागप्पा अण्णा हरिजन यांचे लोक आहोत. असे म्हणून विजापूर जिल्ह्यातील अनेक ठीकाणातून व कर्नाटक राज्यातील अनेक जिल्ह्यातुन मोठ्या प्रमाणावर खंडणी व लाखो रुपयांची वसुली करत आहेत. तरी या प्रकरणाशी व अशा वसुली साठी किंवा अशा कोणत्याही प्रकाराशी मा.भागप्पाअण्णा हरिजन यांचा कोणताही आणि कसल्याही व काहीही आणि कोणत्याच प्रकारचा संबंध नाही तरी जनतेने या आवाहनाची नोंद घ्यावी असे आवाहन विजापूर येथे स्वतः मा. भागप्पा अण्णा हरिजन यांनी मीडियाशी बोलतांना जाहीर केले आहे. तरी जनतेच्या हितासाठी व जनतेची फसगत होऊ नये म्हणून या माहिती दव्वारे आम्ही हे जाहीर आवाहन करीत आहोत असे मानव सेवा फौंडेशन अक्कलकोट चे अध्यक्ष दत्ताभाऊ कांबळे आणि गुलबर्गा चे अरुणभाऊ भरणी तसेच राजु कांबळे व भाई गणेश आलेगावकर यांनी केले आहे. भागप्पाअण्णा हरिजन हे स्वतः सामाजिक कार्यात आणि समाजाच्या कामासाठी नेहमीच झटणारे आणि अन्याय व अत्याचारा विरुद्ध लढणारे व्यक्ती असून त्यांच्या नावाचा दुरुपयोग करून किंवा गैरवापर करून कोण जर त्यांच्या नावावर वसुली किंवा असले गुन्हे करत असतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यास पोलिस प्रशासन मोकळे आहे. असे ही त्यांनी म्हटले आहे. आहेत.

Previous articleपालकांनो सावधान मुलांना कुठले शिक्षण देताय ? -डॉ. दत्ता कोहिनकर माईंड पॉवर ट्रेनर
Next articleसंघटन करून राहणे ही माणसाची जन्मजात प्रवृत्ती- प्रा. अजित जाधव.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

fifteen + one =