लोहा,दि.२६ आॅगस्ट २०१९(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी लोहा-गोविंद पवार):- पृथ्वीवर प्रत्येक जीव स्वतःच्या अस्तित्वासाठी सुरक्षिततेसाठी व आपलं साम्राज्य टिकून ठेवण्यासाठी संघटन करून राहतो मानवाची तर ती जन्मजात प्रवृत्ती आहे.मानव हा समाजशील प्राणी असून तो संघटित राहूनच प्रगती करतो असे प्रतिपादन सुप्रसिद्ध विचारवंत प्रा.अजित जाधव यांनी केले.
अहमदपूर येथील कुणबी मराठा संघटना अहमदपूरच्या 21 व्या वर्धापन दिनानिमित्त कुणबी मराठा मेळावा व कुणबी मराठा संघटनेच्या नुतन पदाधिकाऱ्यांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी प्रा. अजित जाधव बोलत होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य माधवराव जाधव, कुणबी समाजाचे नेते लक्ष्मण मदरसे निलंगा,सरपंच सावित्रीताई पडोळे, प
डाॅ.व्यंकटराव कदम, सत्यवान भोसले, दादाराव दाडगे, पी.एस.आय सोनाली कदम, संग्राम गायकवाड, नुतन तालुका अध्यक्ष विकास बोबडे, शहराध्यक्ष गुणाजी भगत,आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना प्रा.अजित जाधव म्हणाले की एका क्रियेवर संघटित माणसांची प्रतिक्रिया एकच असते दोन संघटित माणसे अख्ख जग बदलू शकतात परंतु स्वतःला अगोदर बदलून घ्यावे लागेल.असे सांगताना ते म्हणाले की छत्रपती शिवरायांनी स्वतः स्वराज्य निर्माण करून रयतेसाठी लोककल्याणकारी स्वराज्य निर्माण केलं शिवाजी महाराज स्वतः कुणबी मराठा असले तरी त्यांनी अठरापगड जातीला एकत्र घेऊन स्वराज्याची निर्मिती केली आज शिवरायांच्या स्वराज्याची जगात चर्चा होते हे सांगताना ते म्हणाले की माणूस जन्माला येतो तेव्हा श्वास असतो नाव नसतं पण ज्यावेळी माणसे मरतात त्यावेळी श्वास नसतो पण त्याचं नाव अजरामर असतं
अध्यक्षीय समारोप करताना माधव जाधव म्हणाले की माझ्या रक्तात राजकारण नाही तर समाजकारण आहे दुसर्यांचा द्वेष करण्यापेक्षा आपण स्वतःला सुधारून इतरांना सुधारणे काळाची गरज असल्याचेही ते म्हणाले संकटाच्या वेळी प्रत्येकाने प्रत्येकाला मदत करणे ही काळाची गरज असल्याचेही ते म्हणाले दरवर्षी वधु वर परिचय मेळावा घेतला जाईल त्याचा होणारा खर्च अर्धा भार मी उचलून समाजाने अर्धा उचलल्यास आपल्या लेकीबाळी चे लग्न पुण्यात कसलाच अडथळा येणार नाही ही खरी समाजाची बांधिलकी असल्याचेही सांगून ते म्हणाले की कुणबी मराठा संघटना अहमदपूर आज जिवंत ठेवण्याचे काम संग्राम गायकवाड व त्यांच्या टीमने केले त्याचा आज हा वटवृक्ष होताना आपण पाहतोय असे माधव जाधव यांनी सांगितले या कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा गोविंद भगत यांनी केले कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन प्रा. मारोती बुद्रुक पाटील यांनी केले व आभार विषय तज्ञ ज्ञानोबा सुकरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वामनराव वाडकर, माधवराव परचंडे, गजानन हाडोळे, बालाजी शिंदे, श्रीनाथ सावंत माधवराव भगत, किरण आटोळकर, कैलास भगत विशाल भगत कुमार पाटणकर आदींनी प्रयत्न केले.