Home ताज्या बातम्या अजित दादांच्या वाढदिवसानिमित्त विविधकार्यक्रम घेत शेखर ओव्हाळ यांच जोरदार शक्तीप्रदर्शन

अजित दादांच्या वाढदिवसानिमित्त विविधकार्यक्रम घेत शेखर ओव्हाळ यांच जोरदार शक्तीप्रदर्शन

130
0

पिंपरी,दि.२२जुलै२०१९(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी) :- महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, विधिमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त शेखर ओव्हाळ युवा मंचच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या हस्ते ‘पिंपरीचा शिलेदार’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. शहराच्या जडण घडणीत योगदान देणाऱ्या राजकीय, सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या पिंपरी विधानसभेतील विविध मान्यवरांचा गौरव धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला. या निमित्ताने शहरातील ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे यांची ग्रंथतुला करण्यात आली.
पिंपरी विधानसभेतून निवडणुकीसाठी इच्छुक असलेले राष्ट्रवादीचेेे प्रमुख दावेदार माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने जोरदार शक्तिप्रदर्शन केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.या वेळी धनंजय मुंडे म्हणाले, पिंपरी-चिंचवडचा सर्वांगिण विकास पवार साहेबांच्या व अजिदादांच्या संकल्पनेतून विकासाची विट या शहरात ठेवल्याने आज जगाच्या पाठीवर हेवा वाटेल असा पिंपरी-चिंचवडचा विकास साकारण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने पिंपरी-चिंचवड शहराचा विकास करूून देखील निवडणुकांच्या वेळी मतांसाठी खाली बघण्याची वेळ आली याचं दुर्दैव्य म्हणावं लागेल. 

आझमभाई यांच्या ग्रंथतुला विषयी बोलताना मुंडे म्हणाले, मी विद्यार्थिदशेत असताना सिंबॉयसिस कॉलेजमध्ये शिक्षण घेताना कॉलेज मधील कॅम्पस मध्ये दररोज आझम पानसरे यांचा विषय असायचा. मागील महत्त्वाच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला नसता तर ते आज पिंपरी चिंचवड, पुण्याचे नव्हे तर महाराष्ट्राचेे मोठे नेते झाले असते.

माझं अन् पिंपरी-चिंचवडचं नातं जवळचं आहे. १९७२ पासून मराठवाड्यात दुष्काळ पडत असून दुष्काळ पडल्यानंतर अनेक शेतकरी तरुण पोटाची खळगी भरण्यासाठी, रोजगारासाठी पिंपरी चिंचवड शहरात येतात. शहरवासीयांनी मराठवाड्याच्या लोकांना खरा आधार दिल्याने मी शेवटच्या श्वासापर्यंत पिंपरी-चिंचवड करांचे उपकार विसरणार नाही असे मुंडे यांनी यावेळी सांगितले. 

धनुभाऊ मी ही तुमच्यासारखा भाषण करेल…. शेखर ओव्हाळ

शेखर ओव्हाळ प्रास्ताविकासाठी उभे राहिले असता काही वेळ भावुक झाल्याने डोळ्यातून अश्रू येत असताना विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी व्यासपीठावर उठून त्यांना धीर दिला. यानंतर ओव्हाळ म्हणाले, मी कधीच स्वार्थासाठी राजकारण केले नाही, मला जनतेची सेवा करायची आहे. यामुळे मी उभा आहे, भविष्यात मला संधी मिळाल्यास धनुभाऊ सारखा मी ही जनतेच्या प्रश्नावर विधानसभेत आक्रमकपणे भाषण करेल,जनतेचे प्रश्न मांडेल.

या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते आझम पानसरे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, मोरेश्वर भोंडवे, नाना काटे, प्रशांत शितोळे, राजू मिसाळ, शमीम पठाण, नगरसेविका सुलक्षणा शिलवंत धर, प्रज्ञा खानोलकर, प्रसाद शेट्टी, राष्ट्रवादीचे प्रवक्ते फजल शेख, मेहबूब शेेेख, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर, माजी उपमहापौर मोहम्मद पानसरे, ज्ञानेश्वर कांबळे, गोपाल देवांग, माजी नगरसेविका मंदाकिनी ठाकरे, सविता साळुंखे, अमिना पानसरे, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वर्षा जगताप आदी मान्यवरांसह नागरिक उपस्थित होते.

Previous articleविसापुर कारागृहातुन पळालेल्या गुन्हेगाराच्या देहुरोड पोलिसांनी १२ तासात अवळल्या मुसक्या
Next articleलोकशाहीर अण्णा भाऊंच्या टपाल तिकिटाचे गुरुवारी प्रकाशन मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऐतिहासिक सोहळा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

twenty − 17 =