Home ताज्या बातम्या पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या अधिकार्‍यांचा व ठेकेदारांचा भोंगळ कारभार मिना काॅलनीत...

पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या अधिकार्‍यांचा व ठेकेदारांचा भोंगळ कारभार मिना काॅलनीत एक वर्ष उलटले तरी नवीन पाईप लाईन टाकुण सुध्दा घरातील नळांना कनेक्शन अजुन जोडलेले नाही

189
0

विकासनगर(१४जुन२०१९,प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या अधिकार्‍यांचा व ठेकेदारांचा भोंगळ कारभार पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या प्रभाग क्र-१६ विकासनगर किवळे येथील मिनाकाॅलनीत एक वर्षापुर्वी (जुन २०१८) पासुन येत आहे नळाला घाण पाणी,काॅलनीतील नागरीकांनी तक्रार करुन घाण पाणी कुठुन कुठे पर्यंत येते हे तपासुन तब्बल दोन महिन्यानी नवीन पाईप लाईन टाकण्यात आली परंतु घरातील नळाला अजुनही कनेक्शन जोडले नाही.जुन्या पाईप लाईन मधुनच पाणी नळाला येते,त्यामुळे नळाला सुरवातीला पाणी सोडुन द्यावे लागते,व आता परत पावसाळा सुरु झाला,म्हणजे परत नागरीकांना घाण पाण्याला सामोरे जावे लागणार,नविन पाईपलाईन टाकल्या नंतर घरातील नळांना कनेक्शन न जोडता खड्डे बुजवुन त्यावर ब्लाॅक बसवण्यात आले,ठेकेदारांने व पि.चि.महानगर पालिका कर्मचारी व अधिकार्‍यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे,त्यामुळे पालिका या अधिकार्‍यांवर व ठेकेदारावर कार्यवाही करणार का?
व अजुन किती दिवस लागणार आहेत नविन पाईपलाईनला कनेक्शन जोडण्यास.

Previous articleदेहूरोड कॅन्टोंन्मेट भाजपचे नगरसेवक विशाल खंडेलवाल यांच्या वर गोळीबार
Next articleविकासनर मध्ये अज्ञात इसमाचा धुडगुस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

4 × three =