Home ताज्या बातम्या वंचित बहूजन आघाडी ता.कारंजा (लाड) व तहसीलदार हरणे साहेब यांच्या प्रयत्नाने ग्राम...

वंचित बहूजन आघाडी ता.कारंजा (लाड) व तहसीलदार हरणे साहेब यांच्या प्रयत्नाने ग्राम सोमठाना येथील आमरण उपोषन मागे

125
0

कारंजा (प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी)

वंचित बहूजन आघाडी ता.कारंजा (लाड) व तहसीलदार हरणे साहेब यांच्या प्रयत्नाने ग्राम सोमठाना येथील आमरण उपोषन मागे

नेहमी होणाऱ्या अपघाताला कंटाळून रोडला गतिरोधक बसवावे या मागणीसाठी सोमठाना वासी हे आमरण उपोषनाला आज पासून बसले होते. वंचित बहूजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रथम उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन चर्चा केली व उपविभागीय अधिकाऱ्यांनी तात्काळ तहसिलदार हरणे साहेब यांना वंचित बहूजन आघाडीच्या कार्यकर्त्यांसोबत उपोषन मागे घेण्या करिता पाठवले या ठिकानी बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत फोनवरून चर्चा करून दोन दिवसात गतिरोधक बसविण्याचे आश्वासन दिले व आश्वासनाची पुर्ण करण्याची हमी तहसीलदार साहेब यांनी घेतल्यामुळे व आश्वासन पुर्ण न झाल्यास वंचित बहूजन आघाडी याठीकाणी तिव्र आंदोलन करेल यामुळे उपोषण कर्त्यांनी आपल आंदोलन मागे घेतल. यावेळी तहसीलदार हरणे साहेब, वंचित बहूजन आघाडीचे जि.उपाध्यक्ष राजाभाऊ चव्हाण, तालुकाध्यक्ष भारत भगत, युवक तालुकाध्यक्ष सचिन खांडेकर, शहराध्यक्ष देवराव कटके, ता.संघटक शेषराव चव्हान, ता.सचिव दिपक वानखडे. यांच्यासह गावातिल प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.

Previous articleजयंती महोत्सवानिमित्तआज मंगळवारी आनंद शिंदे यांचा भिमगीतांचा कार्यक्रम-आयोजक शेखरभाऊ ओव्हाळ
Next articleसंभाजी बारणे यांच्या उपक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

9 − seven =