Home ताज्या बातम्या पोलिसांचा शिवजंयती दिवशीच देशी विदेशी दारु बेकायेदेशीर विक्रेत्याच्या दुकानावर छापा

पोलिसांचा शिवजंयती दिवशीच देशी विदेशी दारु बेकायेदेशीर विक्रेत्याच्या दुकानावर छापा

63
0

सोलापूरः(प्रजेचा विकास न्युज प्रतिनीधी):- शिवजयंती उत्सवा दरम्यान बुधवार पेठ येथे देशी विदेशी दारूवर छापा टाकून लाखाच्यावर बाटल्या जप्त करण्यात आले. दिनांक १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी
वेळेस (ड्राय डे) मिरवणूक बंदोबस्त दरम्यान गोपनीय माहिती काढून पो.उप निरीक्षक भीमसेन जाधव व पथकातील पोलीस कर्मचारी यांना इसम नामे अजय पांडुरंग सोनवणे वय ३०वर्षे, रा. मिलिंद नगर, बुधवार पेठ, मेहता टॉवर मागे, सोलापूर हा घरासमोर देशी, विदेशी दारूच्या बाटल्या विक्री करत असताना मिळून आला. त्याच्या कब्जात एकूण १,०६५ नग बाटल्यांची किंमत अंदाजे १ लाख १६ हजार २५४ रूपये इतकी आहे.म्हणून त्याचे विरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी अधि. कलम ६५ (ई) प्रमाणे फौजदार चावडी पो.ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे.यावेळी कामगीरी पथक पो.उप निरीक्षक भीमसेन जाधव, पो.हे.कॉ.शांताराम वाघमारे, संजय पवार, दीपक राऊत, पो.ना.आप्पा पवार, संतोष पापडे, चालकपो.कॉ.प्रफुल गायकवाड यांनी केली.

Previous articleखासदार अमर साबळे यांचा सोलापुर दौरा
Next articleजय महाराष्ट्र तरुण मंडळ जुनी लक्ष्मी विष्णू मिल चाळ च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जंयती साजरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

18 + eighteen =