Home ताज्या बातम्या पुण्यात आरपीआय(आठवले)गटाच्या शहराध्यक्ष पदी अशोक कांबळे यांची निवड

पुण्यात आरपीआय(आठवले)गटाच्या शहराध्यक्ष पदी अशोक कांबळे यांची निवड

0

महाराष्ट्रात पहिल्यांदाच झालेल्या पक्षाच्या शहराध्यक्षपदाच्या निवडणुकीत अशोक कांबळे यांनी भरघोस मतांनी विजय मिळविला. पक्षाचा शहराध्यक्ष निवडण्यासाठी पहिल्यांदाच निवडणूक होत असल्याने आणि शहरातील सुमारे तीन हजार सक्रिय सभासद मतदान करणार असल्याने याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. तब्बल अकरा उमेदवारांपैकी कांबळेंनी बाजी मारत ९५० पेक्षा जास्त मते मिळविली. त्या निमित्ताने गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त असलेल्या रिपब्लिकन पक्षाला (आठवले गट) पुण्यात एक चांगला शहराध्यक्ष मिळाला आहे. मात्र अशोक कांबळेंच्या या विजयामागे ‘त्रिकुट’ असून, त्यांनी केलेले नियोजन आणि मेहनत उपयोगाला आल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे.

उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव आणि वरिष्ठ नेते परशुराम वाडेकर यांच्या प्रयत्नातून आणि नियोजनातून अशोक कांबळे निवडून आले आहेत. पहिल्या क्रमांकाची मते अशोक कांबळे यांना मिळाली, तर दुसऱ्या क्रमांकावर अशोक शिरोळेंना मते मिळाली. त्याचबरोबर शैलेश चव्हाण, माजी शहराध्यक्ष महेंद्र कांबळे, संजय सोनवणे, बसवराज गायकवाड, संगीता आठवले, माहिपाल वाघमारे आदी रिंगणात होते. कांबळे यांच्या निमित्ताने उच्च शिक्षित, प्रामाणिक, निर्व्यसनी, प्रदीर्घ अनुभव आणि दांडगा जनसंपर्क असलेला, नगरसेवक म्हणून काम केलेला कार्यकर्ता निवडून आल्याचे समाधान आहे, असे डॉ. सिद्धार्थ धेंडे म्हणाले. संजय सोनावणे, बसवराज गायकवाड, महिपाल वाघमारे यांनीही माझ्यासह बाळासाहेब जानराव आणि परशुराम वाडेकर यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत अशोक कांबळे यांच्या विजयात वाटा उचलल्याचे डॉ. धेंडे म्हणाले. येत्या काळात आरपीआयचा विस्तार आणि शहरातील पक्षाचे स्थान बळकट करण्याचा प्रयत्न अशोक कांबळे करतील. त्यांना आम्हा सर्वांचा पाठिंबा राहील.

Previous article*ञिरत्न बौध्द महासंघ धम्मक्रांती बुध्दविहार विकासनगर,देहुरोड-काळेवाडी यांच्या विद्यामाने गुणवंत विद्यार्थी गुणगौरव संभारंभ पार पडला.*
Next article*’निर्भया’ प्रकरणी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत!* *शिक्षेची तात्काळ अंमलबजावणी करण्याची युवानेते अमित बच्छाव यांची मागणी*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

13 + three =