Home गुन्हेगारी जगत ठाण्याच्या घटनेला धक्कादायक वळण;विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करणारा तो शिक्षक नाही

ठाण्याच्या घटनेला धक्कादायक वळण;विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करणारा तो शिक्षक नाही

318
0

ठाणे, 3 ऑगस्ट २०२३(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी) :- मोठ्या प्रमाणात शिक्षक विद्यार्थ्यानां बेदम मारहाण करताना व्हिडिओ वायरल होत आहे.माञ मारहाण करणारा तो शिक्षक नाही. ठाण्यातील बांदोडकर आणि जोशी बेडेकर महाविद्यालयात एन.सी.सी च्या विद्यार्थ्यांना बेदम मारहाण होत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला, त्यामुळे विद्यार्थी आणि पालक क्षेत्रात एकच खळबळ उडाली.

https://twitter.com/PrajechaVikas/status/1687428373143019520?t=LiQ2vKGQq1kOd1IBQohKeQ&s=09

जोशी बेडेकर कॉलेजच्या प्रांगणात बांदोडकर, बेडेकर आणि पॉलिटेक्निक या तिन्ही विभागांच्या विद्यार्थ्यांना संयुक्त रित्या एन.सी.सी च प्रशिक्षण देण्यात येत होते. या व्हिडिओ मध्ये प्रशिक्षणा दरम्यान विद्यार्थ्याना आर्मी आणि नेव्हीच्या प्रशिक्षण पूर्वीचे धडे देण्यात येत आहे, याच दरम्यान विद्यार्थ्यांकडून एखादी चूक झाल्यास त्यांना शिक्षाही करण्यात येते. मात्र ही शिक्षा अमानवी प्रकारची असल्याचं समोर आल्याने खळबळ उडाली, यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एन.सी.सी बाबत दहशत पसरली असून अनेकजण एन.सी.सी नकोच असे म्हणताना दिसत आहेत.ते शिक्षक ही नाहीत या विद्यार्थ्यांनी अजिबात काळजी करू नये, हे असले प्रकार आम्ही कोणीही खपवून घेणार नसल्याचं जोशी बेडेकर कॉलेजच्या प्राचार्या सुचित्रा नाईक यांनी खडसावून सांगितलं आहे. एनसीसीचे हेड असतात ते सिनियर विद्यार्थीच असतात, ते कोणी शिक्षक नसतात.मात्र हा लज्जास्पद घृणास्पद प्रकार आहे.एन.सी.सी च्या मार्फत जी चांगली कामं होतात ती झाकली गेली आहेत, असं सुचित्रा नाईक म्हणाल्या आहेत.शिक्षक नसताना झालेला हा प्रकार असून त्या विद्यार्थ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर हे असले प्रकार यापुढे होऊन नयेत म्हणून एक कमिटीची स्थापनाही आम्ही तात्काळ करत आहोत असे नाइक यानी सांगीतले. ज्या कोणा विद्यार्थ्यांबाबत असे प्रकार घडले असतील त्यांनी अजिबात घाबरून जाऊ नये, आम्हाला येऊन भेटावे. एनसीसी सोडण्याचा विचार अजिबात करु नये, असंही नाईक यांनी सांगितल आहे.

Previous articleदेशमुख पॅटर्न ची राज्यात चर्चा,करसंकलन विभागाची कामगिरी जोरात
Next articleविधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित, पुढील अधिवेशन ७ डिसेंबर रोजी नागपूर येथे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

11 − 6 =