Home ताज्या बातम्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेमुळे महाविकास आघाडी सरकारचा खरा चेहरा उघड-आमदार...

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेमुळे महाविकास आघाडी सरकारचा खरा चेहरा उघड-आमदार महेश लांडगे

50
0

पिंपरी,दि.25 ऑगस्ट 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची अटक ही केवळ राजकीय सूडापोटी झालेली असून, हा प्रकार निंदनीय आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाला गालबोट लावणारा आहे. यातून राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा खरा चेहरा समोर येईल, असे मत भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केले.

भाजपाच्या वतीने पिंपरीमध्ये राज्य सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. त्यावेळी आमदार लांडगे बोलत होते.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप करीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मंगळवारी अटक करण्यात आली. मात्र, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना चुकीच्या पध्दतीने अटक केली. याचा निषेध पिंपरी येथे करण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, महापौर माई उर्फ उषा ढोरे, माजी महापौर नितीन काळजे, राहुल जाधव, उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, संघटन सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अमोल थोरात, सरचिटणीस बाबू नायर, राजू दुर्गे, मोरेश्वर शेडगे, विजय फुगे, माजी उपमहापौर तुषार हिंगे, महाराष्ट्र युवती आघाडी सहसंयोजक वैशाली खाड्ये, युवा मोर्चा शहराध्यक्ष संकेत चोंधे, मुक्ता गोसावी, कविता करदास, कोमल शिंदे, प्रदीप बेंद्रे, शहर उपाध्यक्ष समीर जवळकर, प्रसिध्दी प्रमुख संजय पटनी, शेखर चिंचवडे, व्यापारी आघाडी अध्यक्ष राजेंद्र चिंचवडे, मंडलाध्यक्ष विजय सिनकर, गोपीकृष्ण धावडे, दीपक नागरगोजे, शहर चिटणीस गणेश ढाकणे, युवा मोर्चा प्रदेश सदस्य अजित कुलथे, संस्कृतीक आघाडी अध्यक्ष धनंजय शाळीग्राम आदी उपस्थित होते.

भाजपाने सूड भावनेने कुणावरही कारवाई केली नाही…
गेल्या पंचवार्षिकमध्ये राज्यात भाजपाची सत्ता होती. त्यावेळी भाजपाने कधीही बेजबाबदारपणे अशाप्रकारे राजकीय सूड बुद्धीतून कोणतीही कारवाई केली नाही. आम्हीदेखील आमची सत्ता आहे म्हणून विरोधाला विरोध अशाप्रकारे वागत नाही. आमचे पदाधिकारी प्रत्येकाशी नि:पक्षपातीपणे वागून काम करत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक झाली म्हणून जनादेश बदलणार नाही. उलट महा आघाडी सरकारचा खरा चेहरा समोर येणार आहे, असेही आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.

Previous articleकेंद्रीय मंञीनारायण राणेंना जामीन मंजूर; भाजप कार्यकर्त्यांन मध्ये आनंदाचे वातावरण
Next articleपिंपरी चिंचवड शहरात आल्यास टराटरा फाडण्याची नारायण राणेनां कोणी दिली धमकी ? राणेंच्या जीवाला धोका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

five + 4 =