Home ताज्या बातम्या Breaking:- आमदार महेश लांडगेना धक्का:स्थायी समितीचे चेअरमन – नितीन लांडगे यांच्यासह चौघे(ACB)...

Breaking:- आमदार महेश लांडगेना धक्का:स्थायी समितीचे चेअरमन – नितीन लांडगे यांच्यासह चौघे(ACB) एसीबीच्या जाळ्यात

47
0

पिंपरी,18ऑगस्ट 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेत लाचालुचपत प्रतिबंधक विभागाकडून मोठी कारवाई

9 लाख रूपयांच्या लाच प्रकरणात पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेत लाचालुचपत प्रतिबंधक विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली असून स्थायी समितीचे चेअरमन – नितीन ज्ञानेश्वर लांडगे यांच्यासह त्यांचे स्वीय साहय्यक/वरीष्ठ लिपीक ज्ञानेश्वर पिंगळे , शिपाई अरविंद कांबळे आणि  संगणक ऑपरेटर राजेंद्र शिंदे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे . पुणे अ‍ॅन्टी करप्शनचे अधीक्षक राजेश बनसोडे आणि अप्पर अधीक्षक सुहास नाडगौडा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सध्या कारवाई सुरू असल्याचं सांगितलं आहे . मात्र , पुणे अ‍ॅन्टी करप्शनने 9 लाख रूपयांच्या लाच प्रकरणी पिंपरी – चिंचवड महापालिकेत मोठी कारवाई केली आहे.9 लाखाचे लाच प्रकरण असल्याने आणि थेट पालिकेच्या स्थायी समीतीच गळाला लागल्याने पिंपरी – चिंचवड आणि पुण्यात चर्चेचा विषय बनला आहे .अ‍ॅन्टी  करप्शनचे पथक पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेत ठाण मांडून बसले होते . कारवाई सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे . अरविंद कांबळे आणि राजेंद्र शिंदे या लिपिकांवर देखील कारवाई करण्यात आली आहे . 9 लाख रूपयांची मागणी करण्यात आली होती . 2 लाख रूपये पीए मार्फत स्विकारल्यानंतर कारवाई करण्यात आली आहे . याप्रकरणी पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेचे स्टँडींग कमीटीचे चेअरमन नितीन ज्ञानेश्वर लांडगे , त्यांचे पीए ज्ञानेश्वर पिंगळे , मनपा मधील लिपीक अरविंद कांबळे आणि संगणक ऑपरेटर  राजेंद्र शिंदे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात येत असल्याची माहिती अ‍ॅन्टी करप्शनकडून देण्यात आली आहे .

लाचपुचपत प्रतिबंधक विभागाने स्थायी समितीचे कार्यालय सील केले आहे. इतिहासात प्रथमच स्थायी समिती कक्षावर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचा छापा पडला असून मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. सत्ताधारी भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. 45 कोटी रुपयांचे विषय आजच्या बैठकीत मंजूर झाले होते.तदनंतर स्थायीकक्षात एकञ बसण्यास गेले असता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापा टाकला व हा प्रकार उघडकीस आणला

स्थायी समितीचे अध्यक्षपद नितीन लांडगे यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत थांबवून ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. लाचपुचपत प्रतिबंधक विभागाने स्थायी समितीचे कार्यालय सील केले आहे. नितीन लांडगे हे भाजपचे आमदार व शहराध्यक्ष महेश लांडगे यांचे निकटवर्थीय समर्थक म्हणून ओळखले जातात.

पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील(IAS)
आज जी स्थायी समिती विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जी कारवाई केली त्यात महापालिकेचे जे कर्मचारी आहेत त्यांच्यावर महापालिके कडुन देखील कारवाई केली जाईल.

स्टैंडीग कमीटी चेअरमन नितीन ज्ञानेश्वर लांडगे
PA – ज्ञानेश्वर पिंगळे
शिपाई = अरविंद कांबळे

संगणक ऑपरेटर राजेंद्र शिंदे

मागणी- नऊ लाख
स्विकारले – दोन लाख ( PA ) टेंडर मंजुर झाले , वर्क ऑर्डर काढणे करीता

Previous articleRPI चे शहरध्यक्ष धुराजी शिंदे नी पुनावळे कचरा डेपो ताब्यात घेण्यासाठी महापालिका आयुक्तांना काय दिला सल्ला ?
Next articleभाजपा आमदार महेश लांडगे, लक्ष्मण जगताप यांची भूमिका सत्य लवकर बाहेर येईल ; चेअरमन नितीन लांडगे यांना गोवण्याचा प्रयत्न

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

twenty − 1 =