Home ताज्या बातम्या डाॅ.एस.बी मुजुमदार व डाॅ.स्वाती मुजुमदार यांचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या कडुन...

डाॅ.एस.बी मुजुमदार व डाॅ.स्वाती मुजुमदार यांचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या कडुन कौतुक

58
0

किवळे,दि.17 ऑगस्ट 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-सिंबायोसिस कौशल्य आणि व्यावसायिक विद्यापीठ किवळे, पुणे हे महाराष्ट्रातील पहिले कौशल्य विद्यापीठ आहे. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल माननीय श्री भगतसिंह कोश्यारी यांनी मंगळवार 17 ऑगस्ट 2021 रोजी विद्यापीठास भेट दिली . या भेटी दरम्यान त्यांनी विद्यापीठाच्या आवारामधील व्यासायिक भागीदारांनी प्रस्थापित केलेल्या रिटेल , ब्युटी वेलनेस आणि अभियांत्रिकी विभागाचे शैक्षणिक कारखाने , कौशल्य प्रयोगशाळा यांची पाहणी केली आणि या अभ्यासक्रमांच्या माध्यमातुन जागतिक पायाभूत सुविधा , कौशल्य घटक बघून ते प्रभावित झाले . डॉ एस बी मुजुमदार- कुलपती यांनी माननीय राज्यपालांचे स्वागत आणि सत्कार करून सिंबायोसिस ची यशोगाथा सांगितली.डॉ स्वाती मुजुमदार, प्र- कुलपती यांनी विद्यापीठाच्या दृष्टीने ध्येय आणि उध्दीष्टे यांची माहिती दिली. कौशल्य शिक्षणाचे महत्व सांगितले. डॉ अश्विनी कुमार शर्मा-कुलगुरू यांनी विभागस्तरीय अभ्यासक्रमांची माहिती दिली.या विद्यापीठामध्ये 3000 पेक्षा जास्त विदयार्थी अभियांत्रिकी,व्यवस्थापन , डेटा सायन्स , स्थापत्य , ब्युटी वेलनेस या विभागस्तरीय अभ्यासक्रमांचे शिक्षण घेत आहेत.वार्षिक इंटर्नशिप हा या अभ्यासक्रमाचे एक अविभाज्य घटक आहे . माननीय राज्यपालांनी मजबूत व्यावसायिक हितसंबंध आणि दर वर्षी होणाऱ्या 100% इंटर्नशिप आणि प्लेसमेंटच्या यशाबद्दल विद्यापीठाची प्रशंसा केली,तसेच डाॅ.एस.बी मुजुमदार व डाॅ.स्वाती मुजुमदार यांचे पोठ भरुन कौतुक केले,डाॅ.स्वाती मुजुमदार यांनी भेटल्या नंतर विद्यापीठाबद्दल माहिती दिली,त्यांचे धन्यवाद करत मला या विद्यापीठाला भेट देण्याची संधी मिळाली मी माझे सोभाग्य मानतो अशा शब्दात कौतुक केले.येथुन युवाना उद्योजक बनवले जाते.त्यामुळे देशाची सेवा घडते.ह्या विश्व विद्यालयची गरज आहे.

कोविड 19 सारख्या जागतिक महामारीच्या आव्हानात्मक काळातही हे यश विद्यापीठाने राखले . माननीय राज्यपालांनी कुलपती डॉ एस बी मुजुमदार यांची दूरदृष्टी आणि डॉ स्वाती मुजुमदार यांनी महाराष्ट्रात प्रस्थापित केलेल्या अद्वितीय जागतिक दर्जाच्या कौशल्य विद्यापीठाचे कौतुक केले . या विद्यापीठातून बाहेर पडलेले विद्यार्थी त्यांच्या व्यवसायात पहिल्या दिवसापासून साधनसंपन्न होऊन त्यांच्या संघटनेसाठी , समाजासाठी आणि राष्ट्रासाठी सकारात्मक योगदान करतात . या विद्यापीठात स्व – व्यवसाय प्रारंभ करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या उत्कृष्ठ कौशल्य प्रशिक्षणाचे ही राज्यपालांनी पोठ भरून कौतुक केले . विद्यापीठाच्या कार्यक्रम संचालकांशी संवाद साधत , तिथल्या गुणवान आणि दीर्घ व्यावसायिक अनुभव असलेल्या अध्यापकांचेही राज्यपालांनी अभिनंदन केले.या वेळी ज्युनिअर काॅलजचे प्राचार्य भावना नरसिंगगोजु तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आदी.स्टाफ उपस्थित होते.

Previous articleआमदार सुनिल शेळके यांची मावळ शिक्षण प्रतिष्ठान संस्थेच्या अध्यक्षपदी एकमताने निवड
Next articleRPI चे शहरध्यक्ष धुराजी शिंदे नी पुनावळे कचरा डेपो ताब्यात घेण्यासाठी महापालिका आयुक्तांना काय दिला सल्ला ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

eight − six =