Home ताज्या बातम्या महिला युवतींकरिता उद्योजकता परिचय वेबीनार

महिला युवतींकरिता उद्योजकता परिचय वेबीनार

33
0

पुणे दि. 05 जुलै 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एम सी ई डी) मार्फत आणि महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन, आयुक्त कार्यालय पुणे यांच्या सहकार्याने महिला, युवतींना पहिल्या पिढीचे यशस्वी उद्योजक बनण्यासाठी ऑनलाईन उद्योजकता परिचय वेबीनार दिनांक ०६ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी १०.३० वाजता आयोजित केलेला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या महिला उद्योजकता धोरण आणि महिला उद्योजकता कक्ष या अंतर्गत उद्योजकता परिचय उपक्रम गूगल मीट द्वारे आयोजित केलेला आहे. महिला सक्षमीकरण, महिला सशक्तीकरण आणि महिला उद्योजकता धोरण या उद्देशाने या ऑनलाईन उपक्रमामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे.
इच्छुक महिला युवती यांनी आपले संपूर्ण नाव, मो. नं., ईमेल आय डी, प्रस्तावित उद्योग याची माहिती punepomced3@gmail.com या ईमेलवर अथवा ईमेल आय डी नसल्यास व्हॉट्स अप ९४०३०७८७५२ / ९४०३१३१२९२ अथवा एस एम एस ७०४५१७२७३६ / ७४००११०५८० या क्रमांकावर पाठवावी असे आवाहन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र पुणे कार्यालय यांच्या वतीने करण्यात आले आहे.
माहिती प्राप्त झाल्यानंतर गूगल मीट लिंक तात्काळ पाठविण्यात येईल. सर्व इच्छुक महिला युवती उमेदवार आणि भावी यशस्वी महिला उद्योजक यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी सौ. भारती सोसे राज्य समन्वयक महिला उद्योजकता विकास कक्ष महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र औरंगाबाद येथे ९४०३६८३१७३ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Previous articleLIVE ::पिंपरी चिंचवड महानगरपालिका अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधन पर्व-2021(समारोप दिवस-5 वा)
Next articleमहाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा ९ऑगस्ट ऐवजी १२ ऑगस्ट २०२१ रोजी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

1 × 5 =