Home ताज्या बातम्या समस्यांबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आयुक्त राजेश पाटील यांचे आदेश

समस्यांबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आयुक्त राजेश पाटील यांचे आदेश

122
0

पिंपरी, २८ जुलै २०२१(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- शहराला कोविड प्रतिबंधात्मक लसींचा पुरवठा कमी होत असल्याने लसीकरण मोहीम पूर्ण क्षमेतेने राबविता येत नसल्याचे मत आयुक्त राजेश पाटील यांनी व्यक्त केले.महानगरपालिकेच्या ब क्षेत्रीय कार्यालयात आयुक्त राजेश पाटील यांची प्रभाग अध्यक्ष, नगरसद्स्य, अधिका-यांसमवेत प्रभाग क्र. १८ आणि २२ मधील समस्यांबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी त्यांनी मत व्यक्त केले.

यावेळी प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, नगरसदस्य विनोद नढे, राजेंद्र गावडे, नगरसदस्या अपर्णा डोके, अश्विनी चिंचवडे, नीता पाडाळे, स्वीकृत नगरसदस्य विठ्ठल भोईर, क्षेत्रीय अधिकारी सोनल देशमुख तसेच स्थापत्य, विद्युत, पाणीपुरवठा, आरोग्य, वैद्यकीय, विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
उपस्थित नगरसदस्यांनी नदी सुधार प्रकल्प आणावा, रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यात यावीत, पालिकेने हाती घेतलेले प्रकल्प तातडीने पूर्ण करावेत, काळेवाडी येथील रस्ते सिमेंटचे करावेत, भारतमाता चौकात हातगाडीं संदर्भात कारवाई व्हावी, रस्त्यावरील अनधिकृत होर्डींग्जवर कारवाई करावी, पाणीपट्टीची बिले नागरिकांना वेळेवर मिळवीत, धूर फवारणी व्यवस्थापन नीट करावे, विद्युत खांबामध्ये विद्युत प्रवाह उतरत आहे आदी समस्या नगरसदस्यांनी मांडल्या.
आयुक्त राजेश पाटील म्हणाले, नगरसदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्यात येईल. तसेच त्यांनी संबंधित अधिका-यांना नगरसदस्यांनी मांडलेल्या समस्यांबाबत तातडीने कार्यवाही करावी असे आदेश दिले.
आयुक्त साहेब आपण प्रभाग क्र १६ आणि १७ कडे दुर्लक्ष करत आहात का अनेक समस्या ह्या प्रभागात सुद्धा आहेत,नगरसेवक वार्डात प्रभागात काही मोजका भाग सोडला तर कुठेच लक्ष देत नाहीत.

Previous articleआयुक्त राजेश पाटील पुनावळेतील कचरा डेपोची जागा ताब्यात घेण्याची हिंमत दाखवणार का?- नगरसेवक राजु बनसोडे
Next articleपुनर्वसन केलेल्या घरांची एन.ओ.सी द्यावी,कर्ज मिळवण्यास सहकार्य होईल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

4 × 5 =