किवळे-आदर्शनगर,दि.06 मे 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- महाराष्र्टात महिला आत्याचाराचे प्रकार वाढत असुन त्यात अल्पवयीन मुलीना धाक दाखवुन गैर प्रकार वाढत आहेत असाच एक अल्पवयीन मुलीचा विनयभंग करत धमकीचा प्रकार देहुरोड पोलिस ठाणेच्या हाद्दीत भीमाशंकर काॅलनी,पलाश अपार्ट मेंट समोर आदर्शनगर किवळे या ठिकाणी दि.05 मे 2021 रोजी दुपारी 12.30 वा घडला असुन अरोपीवर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.
16 वर्षाच्या पीडित मुलीला 13 एप्रिल 2019 रोजी लग्न करण्यास नकार दिल्याच्या कारणावरून मनात राग धरून आरोपीने पुणे वरुन येऊन पीडित मुलीच्या घरासमोर जाऊन तू माझ्या नावाची तक्रार का दिली आहेस मला पोलिस स्टेशन मधून फोन आला होता असं बोलून आरोपी याने पीडित मुलीला शिवीगाळ दमदाटी करून व तिचा हात पकडून तिला तिला घराबाहेर असलेल्या झाडाची कुंडी उचलून तिच्या दिशेने फेकून तू माझ्याशी लग्न कर दुसर्याशी लग्न केलं तर तुला व तुझ्या आई वडिलांना मारून टाकेल अशी धमकी देत पीडित मुलीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल अशी जवळीक साधून तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक घृणस्पद प्रकार घडला असून पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी अर्जुन संजय साठे (वय 27) राहणार फुलेवाडा पुणे याच्या विरोधात देहूरोड पोलीस स्टेशन मध्ये गु.रजि.238/2021 354,354(अ),336,504,506 पोस्को 8,12 अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून आरोपीला अटक केली आहे,सदर घटनेचा तपास महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक कुंदा गावडे मॅडम यांच्याकडे असून पुढील तपास देहुरोड पोलिस करीत आहेत.