Home ताज्या बातम्या देहुरोड पोलिस स्टेशनच्या हाद्दीतुन दोन सराईत गुन्हेगारांना पोलसांनी केल तडीपार

देहुरोड पोलिस स्टेशनच्या हाद्दीतुन दोन सराईत गुन्हेगारांना पोलसांनी केल तडीपार

61
0

देहुरोड,दि.04 मे 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गुन्हे करणारे गुन्हेगार यांचा अभिलेख तपासून त्यांच्यावर मोका व एम पी डी ऐ कायद्यांतर्गत परिणामकारक कारवाई करण्याचे आदेश माननीय पोलीस आयुक्त साहेब पिंपरी चिंचवड यांनी दिले असून त्याप्रमाणे कारवाई सुरू करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने देहूरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत रेकाॅर्डवरील दोन सराईत गुन्हेगारांना अनुक्रमे एक वर्ष व दोन वर्ष तडीपार करण्यात आले.तडीपार आरोपी अरविंदकुमार राजकुमार (वय-21वर्ष) राहणार मरीमाता मंदिर एम बी कॅंम्प किवळे देहूरोड याला महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 चे कलम 56 (1)(अ)(ब) प्रमाणे आनंद भोईटे-उपआयुक्त परिमंडळ 2 पिंपरी चिंचवड यांच्या कार्यालयीन तडीपार आदेश क्रमांक-9/2021 दिनांक- 02 मे 2021 प्रमाणे पुणे जिल्ह्याच्या हद्दीतून (12महिने) एक वर्षाकरिता तडीपार करण्यात आले आहे.सदर तडीपार आरोपी याने त्याचे नातेवाईक अंबरनाथ ठाणे या ठिकाणी राहत असून त्यांच्याकडे राहण्याची इच्छा दर्शवली व सदर नातेवाईकांनी जबाबदारी स्वीकारल्याने दोघांची खातरजमा करुन देहूरोड पोलिस स्टेशनचे पोलीस नाईक जगताप व पोलीस शिपाई यादव यांनी तडीपार आरोपी अरविंदकुमार राजकुमार याला आंबरनाथ जिल्हा- ठाणे या ठिकाणी सोडले आहे.

तसेच आरोपी आकाश उर्फ गोट्या अमरीष धोत्रे (वय-24 वर्ष)राहणार मरीमाता मंदिरजवळ गांधीनगर देहूरोड पुणे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 56 (1)(अ)(ब) प्रमाणे पोलीस उपायुक्त परिमंडळ-2 आनंद भोईटे यांच्या कार्यालयीन तडीपार आदेश क्रमांक-4/ 2021 दिनांक 24 एप्रिल 2021 प्रमाणे पुणे जिल्ह्याच्या हद्दीतून दोन वर्षाकरिता(24महिने) तडीपार करण्यात आले आहे.
नगर सावेडी अहमदनगर या ठिकाणी तडीपार आरोपी याचे नातेवाईक असल्याने व त्या नातेवाईकांनी आरोपीची जबाबदारी स्वीकारल्याने तडीपार आकाश उर्फ गोट्या अमरीष धोत्रे याला निर्मल नगर सावेडी अहमदनगर येथे देहूरोड पोलिस स्टेशनचे पोलीस नाईक जगताप व यादव हे सोडून आले सदरील गुन्हेगारीला चाप बसवण्यासाठी माननीय पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश साहेब यांच्या आदेशान्वये संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरात आनंद भोईटे उप आयुक्त परिमंडळ-2 यांच्या कार्यालयीन आदेशा प्रमाणे देहूरोड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रेकाॅर्डवरील सराईत गुन्हेगार यांना तडीपार करण्यात आले आहे अशी माहिती देहूरोड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास सोंडे यांनी दिली

Previous articleदेहुरोड-अटल गुन्हेगार राहुल संजय टाक वर एम पी डी ऐ अंतर्गत स्थानबद्ध ची कार्यवाही
Next articleआंध्रप्रदेश सरकार प्रमाणे महाराष्र्ट सरकारनेही कोरोना रुग्णाचा इलाज मोफत करावा- राहुल डंबाळे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

sixteen − 12 =