Home ताज्या बातम्या आंध्रप्रदेश सरकार प्रमाणे महाराष्र्ट सरकारनेही कोरोना रुग्णाचा इलाज मोफत करावा- राहुल डंबाळे

आंध्रप्रदेश सरकार प्रमाणे महाराष्र्ट सरकारनेही कोरोना रुग्णाचा इलाज मोफत करावा- राहुल डंबाळे

60
0

पुणे,दि.04 मे 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी-अमोल डंबाळे):- कोरोनाने सर्व महाराष्र्टात थैमान घातले असुन सर्व कामकाज काही प्रमाणात ठप्प झाले आहे तरे काही ठिकाणी हातावर पोट असणार्‍या समुहाची दैनीय अवस्था झाली आहे त्यामुळे आज आंबेडकरी चळवळीतील काही नेते कार्यकर्ते यांनी बैठक घेत सरकारला जाग करुन जनतेला संकट मुक्त करण्याच्या विचारावर बैठक घेतली

covid-19 च्या प्रादुर्भावामुळे करावे लागणार्या उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकारने करावा अशी आग्रही मागणी आज रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीने करण्यात येत आहे. आंध्रप्रदेश सरकार त्यांच्या राज्यातील कोरोना रुग्णांचा शासकीय तसेच खाजगी रुग्णालयातील उपचारांचा खर्च स्वतः करणार असल्याचा महत्वकांशी निर्णय मुख्यमंत्री वायएसआर जगन रेड्डी यांनी घेतला आहे त्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने देखील असाच निर्णय घेऊन जनतेला दिलासा द्यावा अशी अपेक्षा बैठकीत सर्वानी व्यक्त केली.

covid-19 च्या अनुषंगाने नागरिकांना मिळणाऱ्या उपचारांबाबत रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीने सर्वसमावेशक भूमिका घेणाऱ्या कार्यकर्त्यांची बैठक आज आयोजित करण्यात आली होती यावेळी शहरातील आणि जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती हाताळण्यात मध्ये स्थानिक प्रशासन पूर्णता अपयशी ठरलेले आहे. याबाबत बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली.

दरम्यान पुण्यामध्ये शासकीय हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन पुरवठा न झाल्यामुळे काही रुग्णांना आपला जीव गमवावा लागला असल्याची धक्कादायक प्रकरण समोर आले असून याच्या बाबत पुणे महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन सादर करून आठ दिवस झाल्यानंतरही त्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याचे लक्षात आल्याने याबाबत नापसंती व्यक्त करून ऑक्सिजन अभावी जीव गमवावा लागलेल्या लोकांच्या न्यायासाठी पुणे पोलीस आयुक्त यांच्याकडे तक्रार करण्यात येणार असल्याचा घेण्यात आला. त्यानुसार आजच बंडगार्डन पोलीस ठाणे येथे कायदेशीर तक्रार दाखल करुन त्यावर कारवाई करण्यासाठी पोलिस आयुक्तांची भेट घेण्यात येणार आहे.

दरम्यान मागील चार दिवसांपासून पुणे शहरातील लसीकरण केंद्र लस पुरवठ्या अभावी बंद असल्याने पुणेकर नागरिकांच्या जीवितास अशी धोका करणाऱ्या केंद्र सरकारचा तीव्र निषेध नोंदवण्यात येऊन पुढील चोवीस तासांमध्ये पुरवठा सुरळीत करून सर्व लसीकरण केंद्रे पूर्ण क्षमतेने सुरू करावेत याबाबत केंद्र सरकारशी पत्रव्यवहार करण्यात येईल येत आहे.

आजच्या बैठकीमध्ये माजी नगरसेवक प्रशांत अण्णा मस्के, भीम छावा संघटनेचे संस्थापक श्याम गायकवाड यांच्यासह इतर पदाधिकारी सहभागी झाले होते.

Previous articleदेहुरोड पोलिस स्टेशनच्या हाद्दीतुन दोन सराईत गुन्हेगारांना पोलसांनी केल तडीपार
Next articleअखेर त्या तीन लाचखोर डाॅक्टरानवर खंडणी व फसवुणीकीचा गुन्हा दाखल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

4 × 5 =