शिरुर,दि.03 मे 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी-कलिंदर शेेख):- शिरुर पोलिसांची कार्यवाही 26 एप्रिल 2021 रोजी गुप्त बातमी दारा मार्फत शिरुर पोलिसांना डि.बी पथकाचे शेख व खुटमाटे यांना माहिती मिळाली की मौजे न्हावरे गावामध्ये साखर कारखाना ते आलेगाव पांगा रोड लगत शेतातील पाली मध्ये गांजा विक्री साठी साठवण्यात येत आहे.त्या नुसार वरीष्ट पोलिस निरिक्षक यांना माहिती देऊन त्यांच्या आदेशाने पोसई पडवळकर,पो.हवलदार संतोष साठे,पो.नाईक मुकुंद कुडेकर,पोलिस अमलदार इब्राहिम शेख,व महिला पोलिस अमलदार शितल गवळी,नायब तहसीलदार यादव व त्यांचे दोन कर्मचारी (पंच) यांनी सापळा रचुन छापा टाकला असता,सदर 78 किलो गांजा सापडला.पोलीस आमदार प्रशांत खुटमाटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शिरूर पोलीस स्टेशन येथे आरोपी 1-सुनील रूपराव पवार (वय-20 वर्ष), 2-आकाश सर्जेराव पवार (वय-20 वर्ष),3-विशाल कैलास मोहिते (वय-18 वर्ष),4-प्रकाश सर्जेराव पवार (18-वर्षे) सर्व राहणार टाकरखेड तालुका- चिखली, जिल्हा-बुलढाणा यांनी 78 किलो वजनाचे 35 पुढे किमान रुपये 16 लाख 38 हजार रुपये किमतीचा “गांजा”अमली पदार्थ घाऊक व किरकोळ विक्री करण्याच्या उद्देशाने व स्वतःच्या फायद्यासाठी जवळ बाळगले व साठवणूक केल्याच्या स्थितीत मिळून आल्याने त्यांच्यावर एन डी पी कायदा 1985 चे कलम 8 (क),20,22 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्याचा अधिक तपास डॉ.अभिनव देशमुख पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, मिलिंद मोहिते अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग पुणे,राहुल धस उपविभागीय पोलिस अधिकारी दौंड विभाग, अमृत देशमुख उपविभागीय पोलिस अधिकारी दौंड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रविण खानापुरे हे करीत आहेत