Home ताज्या बातम्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा आदर्श भावी पिढीने जोपासावा – महापौर ढोरे

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा आदर्श भावी पिढीने जोपासावा – महापौर ढोरे

60
0

पिंपरी, दि.३० एप्रिल २०२१(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- गरीबीतही आनंदी जीवन जगण्याच्या मूलमंत्र सांगत ग्रामगीतेच्या माध्यमातून शिकवण देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा आदर्श भावी पिढीने जोपासावा असे प्रतिपादन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. या निमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेस महापौर ढोरे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या या अभिवादन कार्यक्रमास स्थायी समिती सभापती अॅड. नितीन लांडगे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, आयुक्त राजेश पाटील, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.

महापौर उषा ढोरे म्हणाल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात प्रत्यक्ष सहभाग घेतला होता. ब्रिटीशांच्या अन्यायाविरुध्द आवाज उठविण्याचे काम त्यांनी केले होते. तुकडोजी महाराज हे भक्ती आणि शक्तीचा अनोखा संगम होते. अज्ञान, अंधश्रध्दा निर्मूलनासाठी त्यांनी केलेले कार्य अजरामर आहे. त्यांची “ राजास जी महाली सौख्ये न प्राप्त झाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या ” ही कविता अत्यंत गाजलेली आहे.

Previous articleदेहविक्री करणा-या महिलांच्या खात्यामध्ये “७ कोटी” रुपयांचे अर्थसहाय जमा
Next articleकोरोनाची संभाव्य तिसरी लाट गृहीत धरून काटेकोर नियोजन करा-उपमुख्यमंत्री अजित पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

two × 3 =