Home ताज्या बातम्या BREAKING NEWS – शिवसेना गटनेतेपदाचा राहुल कलाटे यांचा राजीनामा ; पक्षांतर्गत कुरघोडी...

BREAKING NEWS – शिवसेना गटनेतेपदाचा राहुल कलाटे यांचा राजीनामा ; पक्षांतर्गत कुरघोडी 2019 की 2021

0

पिंपरी,दि.16 मार्च 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-पिंपरी चिंचवड महानगर पालिकेतील नगरसेवक राहुल कलाटे यांनी शिवसेना गटनेतेपदाचा (दि.16 मार्च) आज विभागीय आयुक्तांनकडे राजीनामा सपुर्द केला.पक्षांतर्गत गटबाजी ही उफळल्याने अंतर्गत कलह स्थायी समिती सदस्य पदावरुन दिसुन आला त्यामुळे राहुल कलाटेंवर नाराज होत,शिवसेनेतील एका गटातील पदाधिकार्‍यांनी पक्ष श्रेष्टींना तक्रार करत राहुल कलाटेंना जबाबदारीतुन मुक्त करा अशी तक्रार केली होती त्या अनुषंगाने राहुल कलाटे यांना राजीनामा देण्याचे आदेश भ्रमणध्वनी द्वारे संदेश प्राप्त झाल्याने कलाटेनी पक्ष श्रेष्टींना 25 फेब्रुवारी 2021 रोजी राजीनामा पाठवला होता.त्यांचा रिप्लाय सेना भवनातुन 14 मार्च 2021 ला सेनाभवनातुन मेल द्वारे जबाबदारीतुन मुक्त होण्याचा आदेश मिळाल्याने पक्ष शिस्त पाळत आज 16 मार्च 2021 रोजी राजीनामा दिला.

राहुल कलाटे यांनी चार वर्ष पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत शिवसेना गटनेते पद भुषवले,व चिंचवड विधान सभा लढवत सव्वालाखाच्या पुढे मते मिळवली त्यामुळे राहुल कलाटे यांचे वर्चस्व वाढत आहे.व सद्याचे मावळचे खासदार असणारे बारणे गटाचे वर्चस्व कमी होत असल्याने अंतर्गत गटबाजी मुळे राहुल कलाटे ना गटनेते पदावरुन मुक्त केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

राजीनाम्यानंतर काय बोले राहुल कलाटे
राजीनामा दिल्यानंतर राहुल कलाटेंनी पञकार परिषद घेत पञकारांशी संवाद साधला.सर्व आरोप हे खोटे असून पक्षश्रेष्ठींवर कोणत्याही प्रकारची नाराजी नसल्याचं मत कलाटे नी यावेळी व्यक्त केल.आता पर्यंत पक्षासाठी उल्लेखनीय काम केले आहे इथून पुढे ही काम करण्याची इच्छा असल्याचेही त्यांनी सांगितले.पद म्हणुन कोणतीही नाराजी नसून पक्षाने काम करण्याची संधी दिली त्याला न्याय देण्याचे काम ही केलं असल्याचा खुलासा केला. विरोधी पक्षनेत्याची भूमिका कायम ठेवणार,राष्र्टवादी प्रवेशा बाबत पञकारांनी विचारल्याने कलाटे म्हणाले राष्ट्रवादी मध्ये जाण्याचा अद्याप तरी विचार नसून पक्ष पुढे जे आदेश देईल त्यावर काम करु अंतर्गत विरोधकांना वेळ आल्यावर उत्तर देऊ पक्षांने जे काम करण्याची संधी दिली त्या बदल पक्षाचा मी ऋणी आहे.असे मत व्यक्त केले.

राहुल कलाटे यांनी पञकार परिषदेत 24 फेब्रुवारी 2021 रोजी राजीनामा साठी मोबाईलवर संदेश आल्याचे म्हटले माञ त्यांच्याच लेटरहेडवर 24 फेब्रुवारी 2019 ला मोबाईल संदेश आल्याचा संदर्भ त्यांच्या सहीनिशी असल्याच्या राजीनामा पञात दिसत आहे त्यामुळे राजीनामा सञ गोंधळलेले अवस्थेत दिसत आहे

Previous articleस्वर्गीय श्री फकिरभाई पानसरे शैक्षणिक संस्थेच्या फिजियोथेरपी कॉलेज मध्ये दोन दिवसीय परिषद संपन्न
Next articleरोजगार क्षमता असलेल्या ‘वस्त्रोद्योगा’ला बळ देण्यासाठी राज्य शासन सकारात्मक – उपमुख्यमंत्री अजित पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

3 × 5 =