Home ताज्या बातम्या स्वर्गीय श्री फकिरभाई पानसरे शैक्षणिक संस्थेच्या फिजियोथेरपी कॉलेज मध्ये दोन दिवसीय परिषद...

स्वर्गीय श्री फकिरभाई पानसरे शैक्षणिक संस्थेच्या फिजियोथेरपी कॉलेज मध्ये दोन दिवसीय परिषद संपन्न

0

पिंपरी,दि.16 मार्च 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनीधी):- स्वर्गीय श्री फकिरभाई पानसरे शैक्षणिक संस्थेच्या फिजियोथेरपी कॉलेज च्या वतीने रीहॅब इ कॉन 221 (Rehab-e-Con 2021) या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ही परिषद झूम या आभासी व्यासपीठावर संचालिका डॉ. झोया पानसरे, विश्वस्त निहाल पानसरे, संचालक डॉ. श्याम अहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती.

परिषदेच्या पहिल्या दिवशी फिजियोथेरपी क्षेत्रातील नावाजलेल्या तज्ज्ञ व्यक्तींची व्याख्याने झाली. यात डॉ. भावना म्हात्रे, मुंबई; डॉ. संजय परमार, धारवाड; डॉ. सुदीप काळे, नवी मुंबई; डॉ. मनीषा राठी, पुणे आणि डॉ. अरुण जी मैया, मणिपाल यांचा समावेश होता. परिषदेच्या दुसऱ्या दिवशी फिजियोथेरपी विषयाशी निगडित 75 शोधनिबंधांचे सादरीकरण झाले. यात देशभरातून आलेल्या सुमारे 160 शोधनिबंधांपैकी 75 शोधनिबंधांची निवड वैज्ञानिक समितीकडून करण्यात आली होती. तसेच यातील प्रथम व व्दितीय क्रमांक काढून एकूण 16 जणांना गौरवण्यात आले. कॉलेजचे प्राचार्या डॉ. वर्षा कुलकर्णी यांनी प्रस्ताविक केले. यावेळी संस्थेच्या संचालिका डॉ. झोया पानसरे, फिजियोथेरपी कॉलेजचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या परिषदेत देशभरातील 500 फिजियोथेरपिस्टनी सहभाग घेतला होता. परिषदेचे आयोजन तसेच अंमलबजावणी अतिशय उत्तम रीतीने केल्याचा अभिप्राय देशभरातून आला. परिषदेसाठी कॉलेजमधून डॉ. वीरेंद्र मेश्राम, डॉ. श्वेता पाचपुते, डॉ. गार्गी भालेकर, डॉ. पल्लवी चिचोलीकर, डॉ. रुचिता किल्लेदार, डॉ. श्रुती मुळावकर, डॉ. नेह देशपांडे व राजू शिंगोटे यांनी संयोजन केले.

Previous articleMPSC- सुधारित तारखेनुसार राज्य सेवा पूर्व परीक्षा 21 मार्चला होणार;विद्यार्थ्याच्या अंदोलनाला यश
Next articleBREAKING NEWS – शिवसेना गटनेतेपदाचा राहुल कलाटे यांचा राजीनामा ; पक्षांतर्गत कुरघोडी 2019 की 2021

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

twelve + 12 =