पिंपरी,दि. ०९ मार्च २०२१(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- पिंपरी-चिंचवड शहरात आज दि. ९ मार्च रोजी ६३५ जणांना कोरोनाची बाधा झालेली असुन. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ४७९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ०२ पुरुष – भोसरी (४० वर्षे), चिखली (५४ वर्षे) येथील रहिवासी आहेत. पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०३ पुरुष – खेड (८५ वर्षे), खराडवाडी (६१ वर्षे), पौड (५० वर्षे) येथील रहिवासी आहेत. पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ११००७० वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १०३२३२ वर पोहोचली आहे.
आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १८६१ जणांचा मृत्यू झालेला आहे. अ – ६४, ब – ९६, क – ८६, ड – ११९, इ – ९५, फ – ५९, ग – ६७, ह – ४९, एकुण – ६३५ अशी आहेत.